मालेगाव : सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळत गेल्याने भाजपचा बालेकिल्ला अशी प्रतिमा निर्माण झालेल्या धुळे लोकसभा मतदार संघात यावेळी झालेल्या अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपवर मात करण्याचा चमत्कार केला आहे. वंचित आघाडी वा एमआयएम सारख्या पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात नसल्याने काँग्रेसच्या हक्कांच्या मतांचे विभाजन टळले. मालेगाव मध्य या मुस्लिमबहुल विधानसभा मतदार संघाने काँग्रेसवर मतांचा अक्षरश: पाऊस पाडला. त्याचे पर्यवसान अर्थातच भाजपच्या पराभवात झाले.

भाजपचे सुभाष भामरे आणि काँग्रेसच्या शोभा बच्छाव या दोन डॉक्टरांमध्ये यावेळी धुळ्यात अत्यंत चुरशीचा सामना झाला. या लढाईत काँग्रेसच्या बच्छाव यांना अवघ्या तीन हजार ८३१ मतांनी विजय मिळाला. यापूर्वी झालेल्या दोन निवडणुकांमध्ये मालेगाव मध्य या विधानसभा मतदार संघाने काँग्रेसच्या झोळीत एकगठ्ठा मतदान टाकणे आणि अन्य पाचही विधानसभा मतदार संघांनी भाजपला आघाडी देऊन त्यावर मात करणे, अशी परंपरा तयार झाली होती. आताही भाजपचे भामरे यांना मालेगाव मध्य या विधानसभा मतदार संघाव्यतिरिक्त अन्य पाचही विधानसभा मतदार संघांमध्ये मताधिक्य मिळाले खरे, परंतु हे मताधिक्य मालेगावातून काँग्रेसला मिळालेल्या मताधिक्यावर मात करू शकेल एवढे राहिले नाही. २०१४ च्या निवडणुकीत एकट्या मालेगाव मध्य मतदार संघाने काँग्रेसला एक लाख २८ हजाराचे मताधिक्य दिले होते, तर अन्य पाच मतदार संघांनी भाजपला दोन लाख ५७ हजाराचे मताधिक्य दिले. २०१९ च्या निवडणुकीत एकट्या मालेगाव मध्य मतदार संघाने काँग्रेसला एक लाख २१ हजाराचे मताधिक्य दिले होते. त्याचवेळी अन्य पाच मतदार संघांनी भाजपला जवळपास साडे तीन लाखाचे मताधिक्य दिले होते. त्यामुळे भाजपचा विजय सहज सुलभ झाला होता. यावेळी मात्र फासे उलटे पडले. अन्य पाच विधानसभा मतदार संघांमधून भाजपने काँग्रेसवर मिळविलेले एकूण मताधिक्य एक लाख ८९ हजार ६२३ पर्यंत गेले असताना मालेगाव मध्य मतदार संघाने काँग्रेसला तब्बल एक लाख ९४ हजार ३२७ मतांची आघाडी दिली. गेल्या दोन निवडणुकांच्या तुलनेत मालेगाव शहर वगळता अन्य पाच मतदारसंघांमधील आघाडी यावेळी लक्षणीयरित्या घटल्याने भाजपचे स्वप्न भंग पावले, असेच स्पष्ट होत आहे.

Malegaon Central Assembly Constituency, Mahayuti Candidate, Maha Vikas Aghadi
Malegaon Assembly Constituency : मालेगावात उमेदवारच नसल्याने महायुतीची निवडणुकीपूर्वी हार
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Happy Diwali Wishes 2024 Wishes in Marathi
Diwali Wishes 2024 : प्रियजनांना द्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक हटके मराठी मेसेज
Manoj Jarange Patil Nomination Back Decision Impact on Eknath Shinde Shivsena
Manoj Jarange Patil : माघार घेताना जरांगे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना धक्का
Congress Sadr Ejaz Beg in Malegaon Central Constituency Assembly Election 2024 Image Caption:
Malegaon Central Constituency : महायुतीचा महाविजय! मालेगाव मध्यची जागा एमआयएमने जिंकली
malegaon shivsena leader advay hire, advay hire political career, advay hire arrested
अद्वय हिरे यांची आतापर्यंतची राजकीय वाटचाल वादग्रस्त
Raju Todsam, Kisan Wankhede
आर्णी व उमरखेडमध्ये भाजपकडून विद्यमान आमदारांना डच्चू; रिपाईं (आ)चेही स्वप्न भंगले
Mulik joins Tingre for campaign in Wadgaon Sheri seat
आमदारकीचा शब्द मिळताच कट्टर विरोधक झाला मित्र, कुठे घडला हा प्रकार !

हेही वाचा… २६ व्या वर्षी राजकारणात तर ३६ व्या वर्षी मंत्री; कोण आहे मोदी सरकारमधील सर्वांत तरुण मंत्री?

मालेगावात एकूण दोन लाख पाच हजार एवढे मतदान झाले. त्यापैकी काँग्रेसला एक लाख ९८ हजार ८६९ मते मिळाली. भाजपला येथून जेमतेम साडे चार हजारांचा टप्पा गाठणे शक्य झाले. विशेष म्हणजे अन्य पाच विधान सभा मतदार संघ मिळून मतदानाची एकूण टक्केवारी ५९ टक्के असताना मालेगावची हीच टक्केवारी ६८ म्हणजे तुलनेने तब्बल नऊ टक्क्यांनी अधिक आहे. मालेगावमधील हा मतदानाचा टक्का केवळ दोन टक्क्यांनी घसरला असता तरी धुळ्यात काँग्रेसला विजय मिळणे दुरापास्त ठरले असते. त्यामुळे मालेगाव मध्य मतदार संघानेच या निवडणुकीत धुळ्यात काँग्रेसला तारले.

Story img Loader