भंडारा : अत्यंत अटीतटीच्या लढतीत भंडारा गोंदिया मतदार संघावर अखेर काँग्रेसने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. बदलत्या परिस्थितीत भाजप नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. काँग्रेसने चार विधानसभेतील आघाडी ही आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपसाठी धोक्याची घंटा आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार असलेल्या दोन विधानसभेतच भाजप वजा होणे ही भाजपसाठी चिंतनाची बाब आहे.

लोकसभेचा निकाल जाहीर होताच आता विधानसभेचे वादळ घोंगावू लागले आहे. लोकसभेचा निकाल जाहीर होताच विधान सभेची आकडेमोड करण्यास सुरुवात झाली आहे. भंडारा गोंदिया मतदार संघात भंडारा, साकोली, तुमसर, अर्जुनी मोरगाव, तिरोडा आणि गोंदिया असे एकूण सहा विधानसभा क्षेत्र आहेत. सहापैकी भंडारा, साकोली, तुमसर आणि अर्जुनी मोरगाव या ४ विधानसभा क्षेत्रात डॉ. पडोळे यांनी तर गोंदिया आणि तिरोडा या २ विधान सभा क्षेत्रात मेंढे यांनी आघाडी घेतली. मागील वेळीच्या तुलनेत मेंढे यांना साधारणतः एक लाख मतांचा फटका बसला. ज्यात भंडारा जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मिळून सुमारे ५९ हजार मतांनी वजाबाकी झाली.

shinde shiv sena door open to bjp rebels in navi mumbai
भाजपविरोधी बंडखोरांना शिंदे गटाचे दार खुले? पालिकेत वर्चस्व मिळवण्यासाठी व्यूहरचना
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Mallikarjun kharge loksatta
धनखड सरकारचे प्रवक्ते! मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; हा जाट समुदायाचा अपमान भाजपचे प्रत्युत्तर
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
BJP, municipal corporation, Mahavikas Aghadi,
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची महापालिकेची तयारी, महाविकास आघाडीची पराभूत मानसिकता मात्र कायम
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
Vinayak Raut, BJP , former MP Vinayak Raut,
भाजपचे मताधिक्य गुणवत्तेवर नसून चोरी करून, माजी खासदार विनायक राऊत यांची टीका
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान

आणखी वाचा-निकालानंतर बंगालमध्ये भाजपा कार्यकर्ते घर सोडून पक्ष कार्यालयात ठाण मांडून का बसलेत?

भंडारा जिल्ह्यातील भंडारा विधानसभेत सध्या अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर, तुमसर क्षेत्रात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आ. राजू कारेमोरे तर साकोली विधानसभेत नाना पटोले आमदार आहेत. लोकसभा निकालाअंती विधान सभा निहाय आकडेवारी बघता या तीनही विधान सभा क्षेत्रात काँग्रेसने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा भाजप आणि एकंदरीतच महायुतीतील मित्र पक्षासाठी देखील मोठे आव्हान असणार आहे.

भंडारा – पवनी विधान सभा क्षेत्रात सुनील मेंढे तब्बल २३ हजार मतांनी मागे पडले. भंडाऱ्यात सुनील मेंढे मागे जाण्याचे मुख्य कारण भाजपचे नाराज कार्यकर्ते आणि पदाधिकारी असल्याचे आता उघडपणे बोलले जात आहे. शिवाय मेंढे आणि डॉ. परिणय फुके यांच्यातील अंतर्गत धुसफूसही कारणीभूत ठरलीच. पक्षश्रेष्ठीसमोर एकत्र असल्याचा आभास निर्माण केला गेला तरी तिकीट न मिळाल्यामुळे फुके आणि त्यांच्या समर्थकांनी मेंढे यांना साथ दिलीच नाही. शिवाय शिंदे समर्थक अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर, नाना पंचबुधे यांनीही मेंढेंना पाहिजे तशी साथ दिली नाहीच. येथे भाजप आणि मित्रपक्षांनी मेंढे यांना तोंडघशी पाडलेच मात्र मतदारांची नाराजीही त्यांना भोवली. नगराध्यक्षपदाच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात त्यांची निष्क्रियता आणि आश्वासनांची पूर्तता करण्यात ते सपशेल अपयशी ठरले. शहरातील रस्ते, पाणी, अतिक्रमण, पार्किंगची समस्या, उद्याने या मुद्यावरून मतदारांनीही येथे त्यांना नाकारले. भंडाऱ्यात काँगेसची आघाडी बघता येथे आता अपक्ष उमेदवारलाही जड जाणार हे मात्र निश्चित.

आणखी वाचा-राजकीय क्षितीजावर अस्त ते पुन्हा दमदार ‘एंट्री’; चंद्राबाबू नायडूंनी ‘टीडीपी’ला कशी दिली उभारी?

तुमसर आणि मोरगाव अर्जुनी या दोनही विधानसभेत मेंढे अनुक्रमे ९ हजार आणि २० हजार ८०० मतांनी मागे पडले. या दोन्ही विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे काँग्रेसचे आमदार असून त्यांची निष्क्रियताच मेंढेंच्या पथ्यावर पडल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे ही निवडणूक प्रफुल पटेलांसाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. त्यामुळेच मेंढेंना विजयी करण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. स्वतः उमेदवार असल्याप्रमाणे त्यांनी मेंढेंचा प्रचार केला. मात्र त्यांच्याच सरदारांची निष्क्रियता मेंढेच्या पराभवास कारणीभूत ठरली. शिवाय पारंपरिक राष्ट्रवादीच्या निष्ठावंतानी भाजप उमेदवाराकडे पाठ फिरवली आणि त्यांची मतेही काँग्रेसकडे वळली. त्याचाही फटका भाजप उमेदवाराला बसला. या दोन आमदारांमुळे प्रफुल पटेलांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली ते वेगळेच.

विशेष म्हणजे तुमसरात माजी आमदार तथा विकास फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चरण वाघमारे यांनी पडोळे यांना त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांसह समर्थन देत त्यांचा प्रचार केला. मात्र येथे पडोळेंना अपेक्षित आघाडी मिळवून देण्यात वाघमारेंना यश आलेले नाही. याचे परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत नक्कीच दिसतील. या निवडणुकीत सहाही विधानसभांपैकी सर्वांचे लक्ष लागून होते ते नाना पटोले गृहमतदार संघ असलेल्या आणि ‘रेकॉर्ड ब्रेक’ मतदान झालेल्या साकोली विधान सभेकडे. या क्षेत्रात डॉ. पडोळे यांनी सर्वाधिक २७ हजार ३०० मतांनी आघाडी घेतली. विशेष म्हणजे भंडारा लोकसभा क्षेत्रात प्रचाराचे केंद्रबिंदू साकोली विधानसभा क्षेत्र होते. प्रचाराची खरी रणधुमाळी या क्षेत्रात दिसून आली. काँग्रेसचे राहुल गांधी आणि भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांची प्रचारसभा साकोलीतच झाली होती. साकोलीतील सर्वाधिक बावणे कुणबी आणि लाखनी व लाखांदूर तालुक्यातील झाडे कुणबी यांनीही नानांना कौल दिला. त्यामुळे नानांना आपला गड राखण्यात यश आले. या निमित्ताने नानांचे कट्टर प्रतिस्पर्धी डॉ. परिणय फुके यांची प्रतिष्ठा मात्र धुळीस मिळाली.

आणखी वाचा- निवडणुकीतील अपयशानंतर पश्चिम बंगाल भाजपाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; कारण काय?

साकोलीला स्वतःची कर्मभूमी म्हणविणाऱ्या फुके यांना मेंढेंना येथे उभारी मिळवून देता आली नाही. साकोली विधान सभेत नानांचे श्रेष्ठत्व सिद्ध झाल्यानंतर आता आगामी विधानसभा डॉ. फुके लढतील का ? लढले तरी तग धरू शकतील का ? की काढता पाय घेतील हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.

गोंदिया विधानसभा क्षेत्रात अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षातील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते तर तिरोडा विधानसभा क्षेत्रात भाजपचे आ. विजय रहांगडालेंसह समर्थकांनी सुनिल मेंढे यांना आघाडी मिळवून देण्यात प्रयत्नाची पराकाष्ठा केली, मात्र २०१९ च्या तुलनेत गोंदिया व तिरोड्यात आघाडी कमीच आहे. अनुक्रमे ३८ हजार व १८ हजारांनी ते यावेळी या क्षेत्रात वजा आहेत. बॅलेट मतदानातही मेंढे माघारले. मेंढेंना ३८११ तर पडोळेंना ५७३५ मते मिळली.भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसची साथ असताना मताधिक्यात वाढ होईल असे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. या निकालाचे पडसाद आगामी विधानसभा निवडणुकीवर उमटणार हे मात्र निश्चित.

Story img Loader