Meghalaya Assembly Election 2023: मेघालय विधानसभा निवडणूक २०२३ मध्ये नॅशनल पीपल्स पार्टी बहुमतापासून अतिशय थोड्या फरकाने दूर राहिली असली तरी त्यांच्या एनपीपी (National Peoples Party) या पक्षाला २६ मतदारसंघांत विजय मिळाला आहे. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत एनपीपीचे २० आमदार होते. यावेळी त्यात वाढ झालेली दिसते. पक्षाला मिळालेल्या या विजयाच्या वाट्यामध्ये पक्षाचे तरुण तडफदार नेते आणि मुख्यमंत्री कोनराड संगमा यांचा मोलाचा वाटा आहे. एनपीपीला यावेळच्या निवडणुकीत चांगल्या जागा मिळाल्या असल्या तरी मागचा पाच वर्षांचा सत्ताकाळ त्यांच्यासाठी सोपा नव्हता. अनेक आघाड्यांवर त्यांना संकटांना तोंड द्यावे लागले. राज्यातील दबावगटांसमोर मवाळ भूमिका घेतल्यामुळे संगमा यांच्यावर बरीच टीका झाली. तसेच राज्य सरकारवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोपदेखील करण्यात आले. तरीही यावेळी एनपीपीला जास्त जागा मिळाल्या याचा अर्थ मेघालयमधील समकालीन राजकीय नेतृत्वात संगमा यांचे स्थान उंचावले आहे असे दिसते.
Meghalaya Election 2023 : कोनराड संगमांची स्वबळावर निवडणूक लढण्याची रणनीती यशस्वी; एनपीपी दुसऱ्यांदा सरकार स्थापन करणार
Meghalaya Politics: कोनराड संगमा यांनी स्वबळावर निवडणूक लढवत २०१८ पेक्षाही जास्त जागा जिंकून एनपीपी राज्यात सर्वात मोठा पक्ष असल्याचे दाखवून दिले.
Written by पॉलिटिकल न्यूज डेस्क
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-03-2023 at 16:52 IST
TOPICSनिवडणूक निकाल २०२४Election Resultsनिवडणूक २०२४Elections 2024भारतीय जनता पार्टी बीजेपीBharatiya Janata Party Bjpमेघालय विधानसभा निवडणूक २०२३
मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Conrad sangmas strategy of going alone pays off npp emerges as single largest party in meghalaya kvg