सध्या सर्व पक्षांच्या प्रचार सभांमध्ये संविधानाचा मुद्दा केंद्रस्थानी आहे. याचा परिणाम मतदारांवर दिसून येत आहे. हरियाणा आणि पंजाबमधील शेतकरीही भाजपावर नाराज असल्याचे चित्र आहे. “लोकतंत्र खतरे में है”, असे कुरुक्षेत्रमधील नागरिक बोलताना दिसत आहेत. “लोकतंत्र खतरे में है, ये लोकतंत्र बचाने की लढाई है (लोकशाही धोक्यात आहे आणि ही लोकशाही वाचवण्यासाठीची लढाई आहे),” असे हरियाणातील कैथल जिल्ह्यातील लांबा खेरी गावातील शेतकरी महावीर लांबा म्हणतात. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या प्रचार सभेमध्ये महावीर लांबा सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांनी दिली भाजपाच्या विरोधात बहिष्काराची हाक

किमान आधारभूत किंमतीसाठी (एमएसपी) कायदा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपाच्या विरोधातील मोहिमांमध्ये लांबा आघाडीवर आहेत. २०२०-२१ मध्ये आणि या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनात त्यांचा सहभाग होता. पंजाब आणि हरियाणातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी भाजपाच्या विरोधात बहिष्काराची हाक दिली आहे. त्यांचे नेते आणि उमेदवार घोषणाबाजी आणि काळे झेंडे दाखवत आहेत. हरियाणातील सर्व १० लोकसभा जागांसाठी २५ मे रोजी मतदान होणार आहे. २०१९ मध्ये भाजपाने या सर्व जागा जिंकल्या होत्या. मात्र यंदा शेतकर्‍यांच्या रोषाचा परिणमण निवडणूक निकालावर दिसू शकतो.

mla kisan kathore meet cm eknath shinde
स्थानिक शिवसैनिक विरोधात, मात्र कथोरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; चर्चांना उधाण, शिवसैनिक भूमिका बदलणार का याकडे लक्ष
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Former corporator of NCP Ajit Pawar group Nana Kate will contest as an independent
पिंपरी : चिंचवडमध्ये महायुतीत बंडखोरी, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नाना काटे अपक्ष लढणार
latur district, Congress Deshmukh family, Nilangekar family
काँग्रेसमध्ये देशमुख यांना एक न्याय व निलंगेकरांना दुसरा याबद्दल असंतोष
Mahayuti Bhandara, Narendra Bhondekar,
भंडाऱ्यात महायुतीतील नाराजीच्या ठिणगीचे वणव्यात रुपांतर! नरेंद्र भोंडेकर यांच्याविरोधात इच्छुकांची अपक्ष लढण्याची तयारी
article Shiv Sena MLA Shahaji Bapu Patil denies links to cash seizure
उलटा चष्मा : डोंगर, झाडी, बंडले…
nirmalatai vitekar
पाथरी मतदारसंघात ‘विटेकर विरुद्ध वरपूडकर’ जुनाच सत्तासंघर्ष नव्या रूपात
Udhayanidhi Stalin vs L Murugan
स्टॅलिन हे नाव तमिळ आहे का? हिंदीच्या सक्तीकरणाला विरोध करणाऱ्या उदयनिधींना भाजपा मंत्र्याचे उत्तर

हेही वाचा : Queen Vs Shehzada: कंगणा रणौत आणि विक्रमादित्य सिंह यांच्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांचा निवडणुकीवर काय परिणाम होणार?

कुरुक्षेत्र मतदारसंघात भाजपाने जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड (जेएसपीएल) चे चेअरमन नवीन जिंदाल यांना उमेदवारी दिली आहे, जे या मतदारसंघात (२००४, २००९) दोन वेळा काँग्रेसचे माजी खासदार राहिले आहेत. जिंदाल २०१४ ची निवडणूक भाजपा उमेदवाराकडून हरले आणि २०१९ मध्ये त्यांनी निवडणूक लढवली नाही. २०१९ मध्ये विद्यमान मुख्यमंत्री भाजपाचे नायब सिंह सैनी यांनी काँग्रेसच्या निर्मल सिंह यांचा ३.८४ लाख मतांनी पराभव केला होता.

भाजपाच्या व्होटबँकेला तडा?

यावेळी कुरुक्षेत्रातील विरोधक शेतकरी आंदोलकांच्या भूमिकेमुळे उत्साही असल्याचे दिसत आहेत. आप उमेदवार सुशील गुप्ता हरियाणात निवडणूक लढवणारे पक्षाचे एकमेव नेते आणि इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत, तसेच इंडियन नॅशनल लोक दलचे उमेदवार अभय सिंह चौटालादेखील निवडणुकीत उभे आहेत.

कुरुक्षेत्रमध्ये अभय चौटाला हे ‘आप’साठी अडचणीचा विषय आहेत, तर जननायक जनता पक्षाचे (जेजेपी) उमेदवार पाला राम सैनी भाजपाच्या व्होटबँकेत, विशेषत: सैनी समाजातील (ओबीसी) लोकसंख्येच्या सुमारे ८% लोकसंख्येला तडा देऊ शकतात. दुष्यंत चौटाला यांच्या नेतृत्वाखालील जेजेपी या वर्षी १२ मार्चपर्यंत राज्यातील भाजपाच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारचा भाग होता. जेजेपी आणि भाजपाची युती तुटली आणि भाजपाने मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या जागी सैनी यांची नियुक्ती केली होती.

कुरुक्षेत्र : शेतकरी आंदोलनाचे केंद्र

हरियाणातील कुरुक्षेत्र २०२०-२१ पासून शेतकऱ्यांच्या निषेधाचे केंद्र आहे. इथूनच रद्द केलेल्या तीन केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलनाची सुरुवात झाली होती. आता, या भागातील शेतकरीही विरोधी पक्षांच्या लोकतंत्र, संविधान आणि तानाशाहीबद्दल बोलताना दिसत आहेत. “एकीकडे चीन आपल्या हद्दीत घुसून जमीन बळकावत आहे आणि इकडे शेतकऱ्यांना त्यांच्याच देशात फिरण्यापासून रोखले जात आहे,” असे महावीर लांबा म्हणाले.

केजरीवाल यांच्या रोड शोमध्ये असलेले शेतकरी राजेंद्र सिंह म्हणाले, “देशात हुकूमशाही असल्याचे दिसते. पूर्वी एखाद्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर कारवाई व्हायची. पण आता एखाद्या व्यक्तीला आधी अटक केली जाते आणि नंतर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो.” दुसरे स्थानिक शेतकरी सुरेश राणा म्हणाले, “शेतकरी नवीन जिंदालच्या विरोधात नाहीत कारण ते फक्त भाजपामध्ये सामील झाले आहेत. बहुतेक शेतकरी आंदोलनादरम्यान बळाचा वापर केल्यामुळे नाराज आहेत.” हरियाणातील प्रमुख शेतकरी संघटनेचे भारतीय किसान युनियन (चदुनी) अध्यक्ष गुरनाम सिंह चदुनी यांनी अभय चौटाला यांना पाठिंबा दिला आहे. स्थानिक काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे की, चदुनी यांचे नातेवाईक आणि समर्थकांचा एक गट गुप्ता यांना समर्थन देत आहे.

राज्यघटना बदलण्याची भीती

इंडिया आघाडीतील जागा वाटप कराराचा एक भाग म्हणून, काँग्रेस हरियाणातील लोकसभेच्या एकूण १० जागांपैकी ९ जागा लढवत आहे, कुरुक्षेत्रची जागा आप पक्षाला देण्यात आली आहे. गुप्ता हे राज्यसभेचे माजी खासदार आहेत. त्यांचा प्रचार मुख्यतः राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसवर अवलंबून असल्याचे दिसते, कारण मतदारसंघात ‘आप’ला फारसा जनाधार नाही.

कुरुक्षेत्रच्या ब्रह्म सरोवर येथील करोरान गावचे रहिवासी प्रवीण धीमान यांनी केंद्रात पुन्हा भाजपाची सत्ता आल्यास राज्यघटना बदलण्याची भीती व्यक्त केली आहे. परंतु, याच गावातील स्थानिक श्रीकांत शर्मा नरेंद्र मोदी सरकारच्या कामगिरीचा उल्लेख केली. ते म्हणाले, “अयोध्येतील राम मंदिर आणि कलम ३७० रद्द करणे हे केवळ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य झाले आहे.”

भाजपाला कोणत्या समुदायाचा पाठिंबा?

हरियाणातील भाजपा सरकार आपल्या प्रचार सभांमध्ये विविध सामाजिक कल्याणकारी योजनांवर बोलत आहे, मात्र सरकारी नोकर भरतीच्या पारदर्शकतेचा मुद्दा यात केंद्रस्थानी आहे. जिंदाल आणि गुप्ता हे दोघेही बनिया-अग्रवाल आहेत. या भागात एकूण लोकसंख्येपैकी ४.५ टक्के लोक या समुदायाचे आहेत. भाजपाला ओबीसी, पंजाबी आणि ब्राह्मण समुदायांतील मतदारांचा पाठिंबा आहे, तर काँग्रेस-आप युतीला जाट, शीख आही दलित समुदायाचा पाठिंबा आहे.

हेही वाचा : भाजपाने स्वीकारले राहुल गांधींचे आव्हान; पंतप्रधान मोदी नव्हे तर ‘हा’ युवानेता चर्चेत सहभागी होणार

भाजपाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, पक्षाच्या सर्वेक्षणानुसार जिंदाल यांना सर्वात योग्य उमेदवार म्हणून उतरवण्यात आले होते. परंतु, त्यांच्या प्रचारात विरोधी पक्ष दावा करत आहेत की ते निवडणूक लढवण्यास इच्छुक नव्हते. काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर काही तासांतच त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. कोळसा खाण वाटप प्रकरणावरून भाजपाने जिंदाल यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा संदर्भ देत, हरियाणा आपचे उपाध्यक्ष अनुराग धांडा म्हणाले, “भाजपने नवीन जिंदालसाठी कोणते वॉशिंग मशीन वापरले हे स्पष्ट केले पाहिजे.”