सांगली : लोकसभा, विधानसभा या निवडणुकीपेक्षा जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत आपले महत्त्व वाढावे यासाठी भाजपमधील अनेक वरिष्ठ नेतेमंडळी जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. येत्या आठ-दहा दिवसात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून या निवड जाहीर केल्या जाण्याची शक्यता असून या पदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. लोकसभेपेक्षा महापालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची उमेदवारी देत असताना जिल्हाध्यक्षपदाला महत्व असल्याने या पदासाठी मोठे नेतेही या शर्यतीत उतरल्याने चुरस वाढली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
यापूर्वी ग्रामीण जिल्हाध्यक्षपद माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्याकडे होते. गेली सहा वर्षे त्यांच्याकडे हे पद असताना शहरी तोंडावळा असलेला भाजप निमशहरी व ग्रामीण भागात पोहोचला. महापालिका तर ताब्यात आलीच, पण याचबरोबर तासगाव, इस्लामपूर नगरपालिकेतही भाजपने सत्ता काबीज केली. जिल्हा परिषदेत अपक्ष, शिवसेना आणि रयत विकास आघाडीला सोबत घेऊन पाच वर्षे सत्ता हाती ठेवली. दहापैकी आठ पंचायत समितीची सत्ता भाजपने मिळवली. यामागे देशमुख यांचे प्रयत्न महत्त्वाचे ठरले. मात्र, आता त्यांना जिल्हाध्यक्ष पदामध्ये फारसे स्वारस्य दिसत नाही. सांगली लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक लढविण्याची त्यांची तयारी असून यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यदाकदाचित पक्षाने भाकरी फिरवण्याचा विचार केलाच तर आपल्या नावाचा विचार केला जाईल, असा विश्वास त्यांना वाटत असल्याने ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदापेक्षा मोठी संधी खुणावत आहे. यामुळेच त्यांनी या पदाच्या शर्यतीपासून स्वत:ला दूर ठेवले आहे.
हेही वाचा – एनडीए आघाडीची २५ वर्षे; भाजपाला बहुमत प्राप्त होताच एक एक घटक पक्ष एनडीएतून फेकले गेले
शहर जिल्हाध्यक्षपद दीपक शिंदे यांच्याकडे आहे. त्यांचे वास्तव्य ग्रामीण भागातील असले तरी पक्षाने शहरातील कार्यकर्त्यांना डावलून त्यांना ही संधी दिली. मात्र, त्यांच्याच कालावधीत महापालिकेत पक्ष संख्याबळावर मातब्बर असतानाही राष्ट्रवादीने भाजपमध्ये फूट पाडून महापौरपद पटकावले. याबद्दल पक्षानेही त्यांना फारशी विचारणा केली नाही, अथवा कार्यकर्त्यांनीही त्यांना बोल लावले नाहीत. सांगली, मिरजेतील दोन्ही आमदार भाजपचे असूनही पक्षात फूट पडते हे शहर जिल्हाध्यक्षापेक्षा दोन आमदारांचेच अपयश मानले जाते.
हेही वाचा – कर्नाटकची पुनरावृत्ती मध्य प्रदेशमध्ये होणार? राहुल गांधी म्हणतात, आम्ही १५० जागा जिंकू
राज्यात भाजप सत्तेत असल्याने आणि आगामी काळ हा निवडणुकीचा असल्याने जिल्हाध्यक्षपदाला महत्त्व आहे. यामुळे अनेक दिग्गज या शर्यतीत आहेत. ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशीकांतदादा भोसले-पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, माजी उपाध्यक्ष पप्पू उर्फ शिवाजी डोंगरे, शिराळ्याचे सत्यजित देशमुख ही मंडळी तर इच्छुक आहेतच, पण याचबरोबर पक्षाचे जिल्हा स्तरावरील निर्णय आपल्या हाती राहावेत यासाठी खुद्द खासदार संजयकाका पाटील यांचेही इच्छुकांच्या यादीत नाव आहे. दहा महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीवेळी याचा फायदा करून घेता येईल, असा त्यांचा होरा असावा. तर शहर जिल्हाध्यक्षपदासाठीही इच्छुकांची भाउगर्दी दिसत आहे. अलिकडच्या काळात हिंदुत्ववादी चेहरा निर्मितीचा प्रयत्न करणारे माजी आमदार नितीन शिंदे, महापालिकेतील भाजपचे नगरसेवक युवराज बावडेकर, प्रकाश ढंग यांची नावे चर्चेत आहेत. चार वर्षांपूर्वी शहर जिल्हाध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळणारे नगरसेवक शेखर इनामदार यांचेही नाव शहर जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीत आहे. ते स्वत: फारसे इच्छुक नसले तरी आगामी निवडणुकीत शहरातील भाजपची व्यूहरचना करण्यात त्यांचा अनुभव पक्षासाठी लाभदायी ठरेल या हेतूने त्यांचे नाव या शर्यतीत दिसून येत आहे.