सांगली : सांगलीत हिंदू गर्जना सभेत बोलत असताना माजी पालकमंत्री तथा मिरजेचे विद्यमान आमदार सुरेश खाडे यांनी मिरज मतदार संघाचा उेख मिनी पाकिस्तान करून नसती आफत ओढवून घेतली आहे. सलग चार निवडणुका जिंकून आल्यानंतर त्यांना आता मिरज म्हणजे मिनी पाकिस्तान वाटू लागले आहे, यामागे धर्मांधता आहे की मंत्रीपदापासून वंचित राहिल्याची सल त्यांच्या मनात ठासून भरली आहे हे सध्या तरी कळायला मार्गं नाही. मात्र, त्यांच्या या विधानामुळे मिरजेत अस्वस्थता मात्र निर्माण झाली असून समाजातील दोन्ही घटकाकडून याबद्दल आ. खाडे यांचा निषेध होत आहे.

महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी आ. खाडे यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत असहकार्याची भूमिका घेतली आहे, तर महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिवसेना ठाकरे या पक्षांनी खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर सामुदायिक राष्ट्रगीत म्हणत या वक्तव्याचा निषेध केला आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

आणखी वाचा-Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू ते भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष; कोण आहेत रवींद्र चव्हाण?

जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाची पुनर्रचना २००९ च्या निवडणुकीपुर्वी झाली. तत्पुर्वी जत या राखीव मतदार संघातून पश्‍चिम महाराष्ट्रात पहिले भाजपचे आमदार म्हणून खाडे हे निवडून आले. यानंतर मिरज मतदार संघ राखीव मतदार संघ होताच, त्यांनी मिरजेकडे मोर्चा वळवला. तत्पुर्वी या मतदार संघाचे नेतृत्व हाफिज धुत्तरे यांनी केले होते. 2009 च्या निवडणुकीपुर्वी गणेशोत्सवा दरम्यान शिवसेनेच्या स्वागत कमानीवरील अफझलखान वधाच्या चित्रावरून मिरज दंगल उसळली. या दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर आ. खाडे यांना मिरजेत संधी मिळाली. ही संधी सलग चार निवडणुकीमध्ये मिळाली. विरोधकांमध्ये ऐक्नय नसल्याने त्यांना आमदारकीची संधी मिळाली असली तरी विरोधकामध्ये एकमेकाचे हिशोब चुकते करण्याच्या नादात अप्रत्यक्ष मदत खाडे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून झाली.

आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेले उमेदवार आणि मतांची जुळणी कशी करायची याचा हातखंडा वापरत खाडे यांनी मिरज मतदार संघावर मांड ठोकली. यातून जेष्ठत्वाच्या आणि मागासवर्गिय चेहरा यामुळे दोन वेळा मंत्री पदाची संधीही मिळाली. मात्र, मंत्रीपदाची संधी भाजपच्या पक्ष विस्ताराला कितपत उपयुक्त ठरली हे पक्षाला आणि त्यांच्या नेत्यांनाच माहिती.

आणखी वाचा-शिवसेना ठाकरे गटाचे नागपुरात स्वबळ किती? निष्ठावानांकडे कायम दुर्लक्ष केल्याने पक्षाची घसरण

लोकसभा निवडणुकीवेळी भाजपच्या उमेदवारांना अपक्ष उमेदवारापेक्षा २५ हजार मते कमी मिळाली. मात्र, ही कमी झालेली मते पुन्हा भाजपकडे वळविण्यात खाडे यांची कसोटी लागली. विधानसभा निवडणुकीवेळी मिरजेतील मिरासाहेब दर्ग्यासाठी मोठा निधी दिला असल्याचा गाजावाजा त्यांनी केला. अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांना त्यांनी मदतीचा हातही दिला. यामुळे धर्मनिरपेक्ष नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे मुस्लिम मतदारही पाहत आले आहेत. मिरजेतील धार्मिक एकोपा हा कधीही विचलीत झालेला नाही. आता या महिनाअखेरीस मिरजेतील सुप्रसिध्द मिरासाहेब यांचा ६५० वा उरूस आहे. या उरूसात संगीतरत्न अब्दुल करीम खॉसाहेब यांच्या ९१ व्या पुण्यतिथीनिमित्त अनेक दिग्गज कलाकार आपली कला मिरासाहेबांच्या चरणी अर्पण करणार आहेत. या संगीताला ना जात, ना धर्म.

Story img Loader