प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) योजनेमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा अहवाल राष्ट्रीय पातळीवर देखरेख (National Level Monitoring – NLM) सदस्यांनी तयार केला आहे. पीएमएवाय-जी योजनेच्या अंमलबजावणीचे मूल्यांकन केल्यानंतर हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. पश्चिम बंगालमध्ये योजनेचा लाभ देण्यासाठी राजकीय पक्ष कमिशन घेतात, बिहारमध्ये पंचायतीचे सदस्य लाच घेतात, राजस्थानमध्ये ग्रामसचिव निधी देण्यास अडवणूक करतो आणि मध्य प्रदेशमध्ये सरपंच बळजबरीने या योजनेतील निधी ताब्यात घेतो, अशा अनेक प्रकरणांचा उल्लेख एनएलएमने आपल्या अहवालात केला आहे. भाजपाप्रणीत केंद्र सरकारची ही महत्त्वकांक्षी योजना आहे, ज्याअंतर्गत लाभार्थ्यांना पक्के घर बांधण्यासाठी निधी पुरवठा केला जातो. दिल्लीस्थित सीएमआय सोशल रिसर्च सेंटरने यासंबंधी तीन अहवाल तयार केले असून ग्रामीण विकास मंत्रालयाला सुपूर्द केले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा