वृत्तसंस्था, नवी दिल्ली
जम्मू-काश्मीर तसेच हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी होणार आहे. दोन्ही विधानसभांची प्रत्येकी ९० सदस्यसंख्या आहे. सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून दोन्हीकडे तिहेरी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : चावडी: आता शांत झोप लागणार का?

हरियाणामध्ये यंदाच्या निवडणुकीत ‘किसान, जवान आणि पहलवान’ या तीन घटकांनी विशेष महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. भाजपला सलग तिसऱ्यांदा विजयी होण्याची आशा असून काँग्रेसचे नेते मात्र सत्तांतर होणारच असा विश्वास व्यक्त करत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर या राज्यात काँग्रेस आणि भाजपचा प्रथमच थेट सामना होत आहे. हरियाणामध्ये एकूण १,०३१ उमेदवारांनी निवडणूक वढवली, त्यापैकी १०१ महिला आहेत. राज्यात एकूण ६७.९० टक्के मतदान झाले. जम्मू-काश्मीरमध्ये ८७३ उमेदवारांनी निवडणूक लढवली. तेथे २०१४ विधानसभेच्या तुलनेत कमी म्हणजे ६३.४५ टक्के मतदान झाले. बहुसंख्य मतदानोत्तर चाचण्यांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये त्रिशंकु विधानसभेचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेस आघाडीला जास्त जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Counting of votes in jammu and kashmir and haryana today print poitics news css