A Vijayaraghavan’s Critisism On Rahul And Priyanka Gandhi : वायनाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वड्रा यांच्या विजयावर पॉलिटब्युरो सदस्य ए विजयराघवन यांनी आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यामुळे केरळसह देशभरातील राजकीय वातावरण पेटले आहे. अशात आता ए विजयराघवन यांच्या विधानाचे सीपीआयने (एम) समर्थन केले आहे. लोकसभा निवडणुकीने केरळमध्ये डाव्या लोकशाही आघाडीला केवळ एक जागा मिळाली होती. त्यानंतर सीपीआय(एम) मुस्लिम समर्थक प्रतिमेपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
या प्रकरणावर बोलताना डाव्या लोकशाही आघाडीचे (एलडीएफ) संयोजक टी पी रामकृष्णन म्हणाले की, “त्यांच्या पक्षाच्या सहकाऱ्याची विधाने सांप्रदायिक नव्हे तर समाजाचे जातीयवादी शक्तींपासून संरक्षण करण्यासाठी होती.” दुसरीकडे सीपीआय(एम) चे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पी के स्मृती म्हणाले, “विजयराघवन यांची विधाने पक्षाच्या धोरणावर जोर देतात. “ते काहीही असो… हिंदू सांप्रदायिकता असो वा मुस्लिम अतिरेक, सीपीआय(एम) त्याच्या विरोधात कठोर भूमिका घेईल.”
सीपीआयचे (एम) नेते विजयराघवन यांनी गेल्या आठवड्यात “कट्टरपंथी मुस्लीम आघाडीच्या” पाठिंब्याशिवाय राहुल दिल्लीला पोहोचू शकले नसते. त्याचबरोबर वायनाड पोटनिवडणुकीत प्रियांका गांधींच्या प्रचारफेऱ्या झाल्या. त्यांच्या त्या प्रचारफेऱ्यांमध्ये सर्वात पुढच्या व मागच्या रांगेत कोण होते माहितीय ना? अल्पसंख्याकांमधील सर्वात वाईट अतिरेकी विचारांचे लोक. हे अतिरेकी विचारांचे लोक काँग्रेस नेतृत्वाबरोबर आहेत”, असे म्हटले होते.
विजयराघवन हे मुस्लीमबहुल मलप्पुरम जिल्ह्यातील असून, ते केरळमधील सर्वात प्रभावशाली सीपीआयच्या (एम) नेत्यांपैकी एक आहेत. डावी लोकशाही आघाडी २०२१ मध्ये सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलेली, त्यामध्ये विजयराघवन यांचा मोठा वाटा होता. त्यांची पत्नी आर बिंदू सध्या केरळच्या उच्च शिक्षण मंत्री आहेत.
विजयराघवन यांच्यासाठी हे वाद काही नवीन नाहीत. ते सातत्याने काँग्रेस आणि आययूएमएलवर टीका करत असतात. २०२१ मध्ये, त्यांनी “अल्पसंख्याक जातीयवाद हा कट्टरतावादाचा एक प्रकार” असल्याचे म्हटले होते. पुढे त्यांना हे विधान मागे घ्यावे लागले होते.
शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेले, विजयराघवन यांनी सीपीआयची (एम) विद्यार्थी संघटना, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाद्वारे राजकारणात प्रवेश केला. पुढे आणीबाणीच्या काळात त्यांच्या ते राज्य नेतृत्वापर्यंत पोहोचले. शालेय शिक्षणानंतर, त्यांनी हॉटेल्स आणि बेकरीमध्ये काम केले. इस्लामिक इतिहासात पदवीधर होण्यापूर्वी पोलिसांतही काही काळ काम केले. १९८९ मध्ये, विजयराघवन यांनी पलक्कड लोकसभा मतदारसंघातून यशस्वी निवडणूक पदार्पण केले, त्यानंतर त्यांनी १९९९ आणि २००४ मध्ये दोनदा राज्यसभा खासदार म्हणून काम केले.
पुढे, २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते अनुक्रमे कोझिकोड आणि पलक्कडमधून पराभूत झाले. जून २०१८ ते एप्रिल २०२२ दरम्यान, विजयराघवन यांनी डाव्या लोसशाबी आघाडी संयोजक म्हणून काम केले. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीच्यी एका वर्षानंतर, कन्नूरमध्ये झालेल्या सीपीआय(एम) पक्षाच्या अधिवेशनात विजयराघवन यांना पॉलिट ब्युरोमध्ये बढती दिली.