आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधक एकत्र आले आहेत. त्यासाठी विरोधकांनी राष्ट्रीय पातळीवर इंडिया नावाने आघाडी केली आहेत. या आघाडीत एकूण २८ पक्ष आहेत. यामध्ये पश्चिम बंगालमधील प्रतिस्पर्धी तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि सीपीआय (एम) हे पक्षदेखील या आघआडीत आहेत. भाजपाला पराभूत करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे या आघाडीकडून सांगितले जात आहे. असे असतानाच आता सीपीआय (एम) पक्षाचे सरचिटणीस सीताराम येच्युरी यांनी केलेल्या विधानानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि सीपीआय (एम) या पक्षांची युती होणार का? असे विचारले जात आहे.

डावे पक्ष आणि काँग्रेस एकत्र येणार?

सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेस पक्षदेखील पश्चिम बंगालध्ये सीपीआय (एम) पक्षाशी असलेली युती तोडण्याच्या मानसिकतेत नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सीपीआय (एम) आणि काँग्रेस पक्ष तृणमूल काँग्रेसशी युती करण्याची शक्यता कमी आहे. तसेच डावे पक्ष आणि काँग्रेस लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र येण्याची शक्यता जास्त आहे, असे म्हटले जात आहे.

vinod tawde
जागावाटपात ठाकरे गटाकडून काँग्रेसची खेळवणूक, विनोद तावडे यांचा आरोप
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
s Jaishankar
देशाची प्रतिमा मलिन करणे अयोग्य, मणिपूरप्रकरणी परराष्ट्र मंत्र्यांचे विरोधकांना खडेबोल
BJP leader Vasantrao Deshmukh on Jayashree Thorat
Jayashree Thorat: “माझी लाडकी बहीण म्हणायचं आणि लेकीवर भर सभेत..”, भाजपा नेत्याच्या अश्लाघ्य विधानानंतर विरोधकांचा संताप
kolhapur, maha vikas aghadi, mahayuti,
कोल्हापुरात आघाडी, महायुतीत बंडाचे झेंडे !
BJP MLA Rajesh Chaudhary Family Members Created Ruckus in Hospital
VIDEO : भाजपा आमदाराचा भाऊ-पुतण्याची गुंडगिरी, रुग्णालयाची तोडफोड; डॉक्टर व नर्सना लाथाबुक्क्यांनी मारहाण
sanjay raut allegation on amit shah
Sanjay Raut : “…तर अमित शाह महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू करतील”, संजय राऊतांचा गंभीर आरोप!
MLA Mahale criticize Rahul Bondre that including Fadnavis name in voter list is publicity stunt not vote winning move
“…हा तर आघाडीचा रडीचा डाव अन् स्टंटबाजी,” भाजप आमदार श्वेता महालेंचे प्रत्युत्तर; म्हणाल्या….

“तृणमूल काँग्रेसशी युती होण्याचा प्रश्नच नाही”

शुक्रवारी (३ नोव्हेंबर) सीताराम येच्यूरी माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी बोलताना त्यांनी तृणमूल काँग्रेस तसेच ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. आम्ही इंडिया आघाडी म्हणून एकत्र आलो आहोत, मात्र पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसशी युती होण्याचा प्रश्नच नाही, असे येच्युरी म्हणाले.

“तृणमूल काँग्रेस भाजपासाठी पर्याय असू शकत नाही”

“युतीमध्ये सामील होण्यासाठी सर्वांसाठी दरवाजे खुले आहेत. मात्र तृणमूल काँग्रेस हा भाजपासाठी पर्याय असू शकत नाही. आम्ही याआधीही ते सांगितलेले आहे, भविष्यातही आम्ही तेच सांगू. जेव्हा वेळ येते तेव्हा तृणमूल काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) म्हणजेच भाजपाशी तडजोड करतो. भूतकाळात तृणमूल काँग्रेसने या तडजोडी केलेल्या आहेत. असे असताना तृणमूल काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीत काय करतो आहे? हा पक्ष इंडिया आघाडीत असेल तर आम्ही तिथे काय करतोय? आमचा उद्देश काय आहे? असे अनेक प्रश्न तुम्ही विचाराल. आम्ही भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलो आहोत,” अशी प्रतिक्रिया येच्युरी यांनी दिली.

“तृणमूल काँग्रेस तसेच भ्रष्टाचाराविरोधात लढावे लागणार”

“तृणमूल काँग्रेस हा भ्रष्टाचारी, जनताविरोधी, लोकशाहीविरोधी पक्ष आहे. पश्चिम बंगालमध्ये लोकशाही पद्धतीने पार पडणारी मतदान प्रक्रिया नष्ट करण्यात आली आहे. पण याविरोधातच आम्हाला लढा द्यायचा आहे. आम्हाला लोकांमध्ये जावे लागेल. आम्हाला एकीकडे भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेला पराभूत करावे लागेल. तसेच दुसरीकडे आम्हाला लोकशाही, लोकशाहीचे अधिकार, लोकांचे अधिकार यासाठी तृणमूल काँग्रेस तसेच भ्रष्टाचाराविरोधात लढावे लागणार आहे,” असेही सीताराम येच्युरी म्हणाले.

“तृणमूल काँग्रेस आणि भाजपा यांच्याविरोधातील लढा सुरूच ठेवणार”

येच्युरी यांच्या प्रतिक्रियेनंतर सीपीआय (एम) च्या पश्चिम बंगालमधील एका नेत्याने प्रतिक्रिया दिली. “येच्युरी यांनी तृणमूल काँग्रेसशी युतीची शक्यता फेटाळून लावली आहे. येच्युरी यांच्या भूमिकेमुळे आम्हाला तयारी करण्यास वाव मिळेल. आम्ही तृणमूल काँग्रेस आणि भाजपा यांच्याविरोधातील लढा सुरूच ठेवणार आहोत,” असे हा नेता म्हणाला.

काँग्रेसलाही तृणमूलशी युती नको

येच्युरी यांच्या या प्रतिक्रियेनंतर क्राँग्रेस पक्षातील नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. कारण काँग्रेस हा पक्षदेखील पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसशी युती करण्याच्या मानसिकतेत नाही. काँग्रेसचे नेते कौस्तुभ बागची यांनी पक्षश्रेष्ठींना एक पत्र लिहून तृणमूल काँग्रेसशी युती करू नये, अशी विनंती केली आहे.

आम्हाला सीपीआय (एम)ची गरज नाही- तृणमूल काँग्रेस

दरम्यान, येच्युरी यांच्या या भूमिकेनंतर तृणमूलचे नेते कुणाल घोष यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सीपीआय (एम) हा पक्ष भाजपाचा एजंट आहे. हा पक्ष भाजपाची बी टीम आहे. सीपीआय (एम) पक्षाची मते वाढावीत यासाठी भाजपाने अनेकवेळा प्रयत्न केलेला आहे. जेव्हा जेव्हा भाजपा अडचणीत असते, तेव्हा तेव्हा सीपीआयएमने मदतीचा हात पुढे केलेला आहे. आम्हाला सीपीआय (एम) पक्षाची गरज नाही. आम्ही आमची लढाई लढू शकतो,” असे तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले