छत्रपती संभाजीनगर : विधान परिषद निवडणुकीमध्ये कॉग्रेस पक्षातील फटीर आमदारांमध्ये भाजपचे राज्यसभा सदस्य खासदार अशोक चव्हाण यांच्या निकटवर्तीय आमदारांचा समावेश असल्याचा आरोप करण्यात येत आहे. जितेश अंतापूरकर हे आमदार निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीबरोबर नव्हते, असे विधान परिषदेती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले.
हेही वाचा >>> नगरमध्ये भाजपचे विवेक कोल्हे राष्ट्रवादीच्या वाटेवर ?
नांदेड जिल्हाध्यक्ष हनुमंतराव बेटमोगरे यांनीही आमदार जितेश अंतापूरकर यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये कॉग्रेस पक्षाचा प्रचार केला नाही. त्यांना भेटून व पक्षाध्यक्षांचा निरोप देऊनही त्यांनी काहीही काम केले नसल्याचा अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे पाठविला आहे. जितेश अंतापूरकर हे देगलूर मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केले नाही, असा आरोप आता होऊ लागला आहे.
हेही वाचा >>> कंत्राटी भरतीवरून टीकेची झोड, सुशिक्षित तरुणांचे शोषण थांबवण्याची विरोधी पक्षांची मागणी
कॉग्रेसमधून कोणती आठ मते फुटली याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चेत असून अंतापूरकर यांचे नावही चर्चेत आले आहे. नांदेड कॉग्रेस अध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, विधान परिषद निवडणुकीमध्ये त्यांनी काय केले हे आम्हाला माहीत नाही. पण दोन महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीत त्यांनी कॉग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण् यांच्यासाठी प्रचार केला नाही. त्यांनी प्रचारात सहभागी व्हावे यासाठी आपण त्यांची भेट घेतली. प्रदेशाध्यक्षांचा निरोप त्यांना दिला. पण त्यांनी साधी कोपरसभा घेतली नाही. मोठ्या प्रचार सभेलाही हजेरी लावली नाही. त्यामुळे तसा अहवाल पाठविला आहे. जर विधान परिषद निवडणुकीत काही झाले असेल तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.