लातूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व पंजाबचे माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा डॉ. अर्चना शैलेश पाटील चाकूरकर शनिवारी मुंबई येथे भाजप पक्षात प्रवेश करणार आहेत .राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून डॉक्टर अर्चना पाटील या भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा होती.

हेही वाचा : हिंगोलीत हेमंत पाटील परंपरा खंडित करणार का ?

मागील महिन्यात शिवराज पाटील चाकूरकर यांचे कट्टर समर्थक मंत्री बसवराज पाटील मुरूमकर यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर या चर्चेने अधिक जोर घेतला होता. आता प्रवेशाची निश्चित तारीख ठरल्यामुळे डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांच्या प्रवेशाला मूर्त रूप येणार आहे .या प्रवेशामुळे लातूर ,धाराशिव, नांदेड या जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलतील असे मानले जाते. शिवराज पाटील चाकुरकर यांचे पाठीराखे खूप आहेत. ते मतदान भाजपच्या पदरी पडेल, असा दावा केला जात आहे.

Story img Loader