मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आणखी एका स्वीय सचिवाला भाजपने उमेदवारी जाहीर केली. पक्षाने तिसऱ्या यादीत २५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली असून आतापर्यंत १४६ उमेदवार जाहीर केले आहेत. भाजप अजून तीन ते चार जागा लढण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमदार दादाराव केचे यांचे तिकीट कापून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माजी स्वीय सहाय्यक सुमित वानखेडे यांना आर्वी मतदारसंघातून, बोरीवलीत आमदार सुनील राणे यांना उमेदवारी नाकारून प्रदेश सचिव संजय उपाध्याय, तर पक्षांतर्गत तीव्र विरोध असूनही वर्सोव्यातून भारती लव्हेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी मंत्री प्रकाश मेहता हे घाटकोपर पूर्वमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र त्यांना उमेदवारी न देता आमदार पराग शहा यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे. भाजपने चार विद्यामान आमदारांना तिसऱ्या यादीत उमेदवारी नाकारली आहे.

u

महायुतीच्या जागावाटपात भाजपने आतापर्यंत १४६, शिवसेना (शिंदे गट) ६५ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ४९ अशा एकूण २६० जागांसाठीचे उमेदवार सोमवारी रात्रीपर्यंत जाहीर केले.

हेही वाचा : काँग्रेसचे माजी मंत्री अनीस अहमद यांना वंचितची उमेदवारी, मुस्लीम मतांच्या विभाजनामुळे भाजपला फायदा?

देवेंद्र फडणवीस यांचे तत्कालीन स्वीय सचिव अभिमन्यू पवार हे २०१९ मध्ये विधानसभेवर निवडून आले होते. यंदा दुसरे स्वीय सचिव सुमित वानखेडे यांना पक्षाने अमरावती जिल्ह्यातील आर्वी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. आर्वीमधून निवडणूक लढविण्यासाठी वानखेडे हे गेली दीड-दोन वर्षे तयारी करीत होते. विद्यामान आमदार दादाराव केचे यांना उमेदवारी नाकारून पक्षाने वानखेडे यांना उमेदवारी दिली.

नागपूर मध्यमधून आमदार विकास कुंभारे यांना उमेदवारी नाकारून विधान परिषदेचे आमदार प्रवीण दटके यांना उमेदवारी देण्यात आली. चंद्रपूरमधून अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना भाजपने दोन दिवसांपूर्वी पक्षात प्रवेश दिला होता आणि आता उमेदवारी जाहीर केली. त्यांच्या उमेदवारीस मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र विरोध जाहीर केला होता. पण त्यांच्याच हस्ते जोरगेवार यांचा पक्षप्रवेश करून भाजपने त्यांना उमेदवारीही दिली. माळशिरसमधून विद्यामान आमदार राम सातपुते लातूरमधून डॉ. अर्चना पाटील चाकूरकर, अर्णीमधून माजी आमदार राजू तोडसाम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

हेही वाचा : धुळ्यात ठाकरे गटाला मोठा धक्का

बोरीवलीत बंडखोरी?

बोरीवलीतून राणे यांना उमेदवारी नाकारून संजय उपाध्याय यांना जाहीर झाल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. माजी खासदार गोपाळ शेट्टी हे बोरीवलीतून लढण्यास इच्छुक होते. पण भाजपने त्यांना लोकसभेप्रमाणेच विधानसभेसाठीही उमेदवारी नाकारल्याने त्यांचे समर्थक संतप्त झाले आहेत. भाजपने अपमानास्पद वागणूक दिल्याने शेट्टी यांनीही आक्रमक भूमिका घेतली असून ते अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा विचार करीत आहेत. वर्सोवामधून लव्हेकर यांना पुन्हा उमेदवारी देण्यास भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध होता. दिव्या ढोलेंसह काही जण इच्छुक होते. मात्र भाजपने लव्हेकर यांना पुन्हा निवडणूक रिंगणात उतरविले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm devendra fadnavis secretary sumit wankhede bjp candidate from arvi print politics news css