कोल्हापूर : कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून दीपक केसरकर यांची कारकीर्द उण्यापुऱ्या वर्षभराची. या अवधीत त्यांनी कोल्हापूरचा, कोल्हापूरच्या तमाम घटकांचा साधासुदा नव्हे तर थेट आंतरराष्ट्रीय दर्जाचा विकास करण्याचा विडा उचलला. कोल्हापूरचे पर्यटन, शाहू मिल, महालक्ष्मी मंदिर आदी आदी प्रकल्पांबाबत ते बोलण्यात मुळीच कमी पडले नाहीत. ‘वचने किम् दरिद्रता’ असा त्यांचा टोलेजंग घोषणांचा बाणा राहिला. त्यापैकी एकही काम तडीस गेले असते तर सन्मान मिळाला असता. उलट अनेक बाबतीत पालकमंत्री म्हणून केसरकर हे वादग्रस्त ठरल्याने राजीनाम्याची मागणी वेळोवेळी होत राहिली.

राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर कोल्हापूरचे पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागेल ही कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात हा कारभार शेजारच्या कोकणातील दीपक केसरकर यांच्याकडे गेल्यावर्षी सप्टेंबरच्या अखेरीस सोपवला. तेव्हापासूनच त्यांच्या घोषणाबाजीचा सुकाळ सुरू झाला. सलामीलाच केसरकर यांनी कोल्हापूर आणि जयपूर येथे मंदिरे, राजेवाडे, वारसा हक्क स्थळे यात साम्य असल्याने कोल्हापूरचा पर्यटन विषयक विकास जयपूरच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याची घोषणा केली. पुढील महिन्यात कोल्हापूरचा ऐतिहासिक दसरा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याची दुसरी चमकदार घोषणा केली. राजर्षी शाहू महाराज मिलमध्ये असाच आंतरराष्ट्रीय विकास केला जाईल. त्याचे काम तीन महिन्यांत सुरू होईल, अशी घोषणा मे महिन्यात केली. महालक्ष्मी मंदिर – परिसराचा भूमिगत विकास आंतरराष्ट्रीय निविदा काढून करणार असल्याचे केसरकर यांनी म्हटले होते. या दिव्य संकल्पनेबाबत कोल्हापूरकरांसह माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनीही पालकमंत्र्यांनी अशा विकासाच्या घोषणा करताना किमान जनता, अन्य लोकप्रतिनिधींना विचारात तरी घ्यावे, असा टोला लगावला होता. यापैकी एकाही कामाची साधी वीट रचली गेलेली नाही हे आणखी एक वैशिष्ठय.

Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
Congress leader rahul Gandhi rally in nanded
आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादा तोडू! नांदेडमधील सभेत राहुल गांधींकडून मोदी लक्ष्य
yogi adityanath criticize congress and mahavikas aghadi
योगी आदित्यनाथ म्हणाले “काँग्रेस नेतृत्वातील ‘मविआ’ची नियत साफ नाही”
maharashtra assembly election 2024 rahul gandhi criticized pm modi at campaign rally
पंतप्रधानांना संविधानाची जाणच नाही; गोंदिया येथील प्रचारसभेत राहुल गांधी यांची टीका
nitin gadkari
Nitin Gadkari: ‘भाजपाचं पिक वाढलंय, त्यावरही फवारणी करण्याची गरज’, नितीन गडकरींचा इशारा कुणाकडे?
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर

हेही वाचा – अमरावतीत यशोमती ठाकूर आणि डॉ. अनिल बोंडे आमने-सामने

फसलेले नियोजन

पालकमंत्री केसरकर यांनी जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष. येथेही त्यांना विरोधक, सर्व लोकप्रतिनिधींना समान न्याय देता आला नाही. इतकेच काय सत्ताधारी पक्षाच्याच निमंत्रित सदस्यांनीच केसरकर विश्वासात घेत नसल्याची तक्रार करीत राजीनामा देऊन बाहेर पडण्याची मानसिकता व्यक्त केली होती. याचा तपशील समाज माध्यमातून बाहेर पडल्यावर गोंधळ उडाला होता. जिल्हा नियोजन समितीत विरोधकांना पुरेसा निधी दिल्या जात नसल्याच्या तक्रारी जिल्ह्यातील विरोधी आमदारांनी सातत्याने केल्या होत्या. जानेवारीत झालेल्या राज्य नियोजन मंडळाच्या बैठकीत जिल्ह्यासाठी ३०२ कोटींचा वाढीव निधी मागितला जाईल, अशी घोषणा केसरकर यांनी केली. पण त्यात ते काहीच भर घालू शकले नाहीत.

पालकमंत्री हटावचे नारे

महालक्ष्मी मंदिर शेजारी असलेल्या भवानी मंडपातील दोन महत्त्वाच्या वास्तुप्रकरणी तर केसरकर यांना पुरते बदनाम व्हावे लागले. मेन राजाराम हायस्कूलच्या इमारतीवर पालकमंत्री केसरकर यांचा डोळा असल्याची तक्रार करीत माजी विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन उभे केले. त्यावर त्याचे स्थलांतर करण्याचा आपला कोणताही प्रयत्न नसल्याचा खुलासा केसरकर यांना करावा लागला असला तरी त्यांचा हा डाव उधळून लावल्याची चर्चा रंगलीच. ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ आपल्याच सहकाऱ्यांनी घशात घातला, त्यावर आंदोलन उभारले तरी केसरकरांच्या चेहऱ्यावरील रेषा नेहमीप्रमाणे तसूभरही हलली नव्हती. शेतकरी संघाची इमारत नवरात्रीसाठी अधिग्रहित करण्याचा मुद्दाही वादग्रस्त ठरला. शेतकरी संघाचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाजूचे, पण त्यांच्यासह तमाम विरोधकांनी या मुद्द्यावरून मोर्चा काढत केसरकर चले जावं अशा घोषणा देत राजीनाम्याची मागणी केली. खेरीज, सत्तेत थोरला भाऊ असलेल्या भाजपनेच पालकमंत्री केसरकर यांनी राजीनामा द्यावा यासाठी आंदोलन छेडले होते. जिल्ह्यातील दलित वस्ती निधीला स्थगिती दिल्याने ठाकरे सेना आणि वंचित बहुजन आघाडीने दीपक केसरकर चले जावो, असे आंदोलन जानेवारीत हाती घेतले होते.

एकाकी झुंज

यावर्षी सुरुवातील ओढ दिलेला पाऊस नंतर चांगला पडू लागला. पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली. अचूक माहितीची खात्री न करताच पालकमंत्री केसरकर यांनी पाऊस थांबला नाही तर, पंचगंगा नदीचे पाणी वाढू शकते, असा धोक्याचा इशारा दिल्याने कोल्हापुरातील नदीकाठी घबराटीचे वातावरण निर्माण झाले. पाणी पातळी धड धोका पातळीच्याही पुढे गेली नाही. त्यावर शिर्डी येथे शालेय शिक्षण मंत्री असलेले केसरकर यांनी प्रार्थना केली अन् कोल्हापुरातील पूर टळला, असे तारे तोडल्याने टीकेचा भडीमार झाला. गतवर्षी कोल्हापूर जिल्ह्यात आनंदाचा शिधा उशिरा पोहोचला. त्यावरून केसरकर टीकेचे धनी झाले. तुळशी विवाहपर्यंत दिवाळी असते. त्यामुळे काहींना शिधा घरी उशिरा पोहोचला, असे म्हणत वेळ मारून न्यायची वेळ त्यांच्यावर आली.

हेही वाचा – Israel Hamas War : ‘हे’ सहा शक्तीशाली देश इस्रायलच्या बाजूने, तर सात राष्ट्रांचा पॅलेस्टाईनला पाठिंबा?

कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ हा दीर्घकाळ प्रतीक्षेचा विषय. याप्रश्नी सकारात्मक उपाय काढण्याचा प्रयत्न केला जाईल अशी घोषणा केसरकर यांनी डिसेंबर महिन्यात करूनही त्याबाबत पुढे काहीच घडले नाही. त्यावर कोल्हापूर हद्दवाढ कृती समितीने या घोषणाबाजीवर टीका केली. विशेष म्हणजे दीपक केसरकर यांच्यावर विविध घटकांकडून टीकेचे वाग्बाण सोडले जात असताना प्रतिपालकमंत्र्यांसह एकही शिंदे सैनिक त्यांच्या समर्थन, बचावासाठी पुढे आला नाही. गोतावळा जमला तो भरभरून ओरबाडण्यासाठीच.

पालकमंत्रिपदाच्या माध्यमातून कोल्हापूरची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले. जयपूरच्या धर्तीवर कोल्हापूरचा विकास करण्याच्या ज्या संकल्पना मांडल्या त्याचा पाठपुरावा करत राहीन. कुठेही असलो तरी कोल्हापूरवर माझे बारीक लक्ष राहील. अपूर्ण कामांबाबत नवे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा केली आहे. ते अतिशय मेहनती आहेत. त्यांनी संबंधित कामे पूर्ण करण्याची ग्वाही दिली आहे. – दीपक केसरकर, मावळते पालकमंत्री,