Delhi Assembly Elections 2025 : दिल्ली विधानसभेची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. मात्र, आतापासून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्लीच्या निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्षासह काँग्रेस आणि भाजपा अशी चुरशीची लढत या तीन पक्षात होण्याची शक्यता आहे. मात्र, आता दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत मायावती यांचा बहुजन समाज पक्षही उतरणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘बसपा’कडून तिकीट वाटपापासून ते प्रचारापर्यंत मोठी रणनीति आखली जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दिल्ली विधानसभेची रंगत आणखी वाढण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या दिल्लीच्या विविध विधानसभा मतदारसंघात सध्या सर्वच पक्षांकडून सभा, मेळावे, रॅलीसह मतदारसंघात आढावा घेतला जात आहे. अनेक दिग्गज नेत्यांचे मतदारसंघात दौरेही वाढले आहेत. त्यामुळे दिल्लीत निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे.

मायावती यांच्या बसपाला गेल्या काही वर्षांपासून पाहिजे तसं यश मिळत नाहीये. अनेक निवडणुकीत बसपाला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. आता बहुजन समाज पक्ष दिल्ली विधानसभा निवडणुका लढवणार आहे. या निवडणुकीची रणनीती राष्ट्रीय समन्वयक आकाश आनंद यांच्यासह वरिष्ठ नेत्यांवर सोपवण्यात आली आहे.दिल्लीत पक्षाचं स्थान मजबूत करण्याचं पक्षाचं उद्दिष्ट आहे. आकाश आनंद हे रविवारी पूर्व दिल्लीतील कोंडली (एससी-राखीव) विधानसभा मतदारसंघात रॅलीद्वारे निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात करणार आहेत. तसेच मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी रस्त्यावरील सभांसह अशा आणखी जाहीर सभांना येत्या आठवड्यात घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

AAP Delhi Election Results 2025 Live Updates in Marathi
AAP Delhi Election Results 2025 Highlights : केजरीवाल, सिसोदियांपाठोपाठ सत्येंद्र जैनही पराभूत
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
BJP Delhi Election Results 2025 Live Updates in Marathi
BJP Delhi Election Results 2025 Highlights: भाजपाने दिल्लीत बहुमताचा आकडा केला पार, ‘आप’ दारून पराभव
Delhi Assembly Election Exit Poll Results 2025
Delhi Exit Polls: दिल्लीत २७ वर्षांनंतर भाजपाचं कमबॅक, एक्झिट पोल्सचे अंदाज काय सांगतात?
Delhi assembly elections 2025 news in marathi
दिल्ली’साठी आज मतदान; तिरंगी सामन्यात मतटक्क्यावर सत्तेचे गणित
Delhi assembly elections 2025
Delhi assembly elections 2025: केजरीवाल, सिसोदिया, आतिशींवर पराभवाची टांगती तलवार?
Delhi Election 2025 Arvind Kejriwal (1)
दिल्लीत दुकानदार भाजपा, तर फेरीवाले ‘आप’च्या बाजूने, कारण काय?
Delhi Assembly Election 2025
मविआचा ईव्हीएमविरोधी आंदोलनाचा चेहरा केजरीवालांच्या मदतीला, दिल्लीच्या निवडणुकीत ‘आप’ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार

हेही वाचा : Maharashtra Politics : उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक का करत आहेत?

हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या अपयशानंतर आता दिल्लीची निवडणूक पक्षासाठी महत्वाची असणार आहे, तसेच आकाश आनंद यांच्यासाठीही महत्वाची असणार आहे. कारण हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत ते पक्षाचे प्रभारी होते. पक्षाला हरियाणात अपयश आलं असलं तरी मताधिक्य वाढवण्यात यश मिळाल्याचं आकाश आनंद यांनी सांगितलं होतं. तसेच गेल्या महिन्यात आनंद यांनी दिल्लीत निषेध मोर्चाचं नेतृत्व केलं होतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर राजकीय वाद निर्माण झाला होता. तेव्हा आकाश आनंद यांनी निषेध मोर्चा काढला होता.

बसपाच्या सूत्रांनी सांगितलं की मायावती यांनी दिल्लीच्या ७० विधानसभा जागांची पाच विभागात विभागणी केली आहे. प्रत्येक विभागामध्ये दोन समन्वयक म्हणून १० वरिष्ठ नेत्यांची नियुक्ती केली आहे. झोनल समन्वयकांमध्ये सहारनपूरचे रणधीर बेनिवाल यांच्यासारख्या नेत्यांचा समावेश आहे. राजेश तंवर, सुदेश आर्य, ललित कुमार, सुजित सम्राट, रजनी, राजाराम, एसपी सिंह, धरमवीर सिंग अशोक आणि सतीश चौधरी हे गेल्या वर्षी हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा महत्त्वाचा भाग होते. या नेत्यांना उमेदवार निवडणे, संघटनात्मक बैठका आयोजित करणे आणि पक्षाच्या प्रचाराचे मार्गदर्शन करणे आणि नावांची शॉर्टलिस्ट करण्याची जबाबदारी दिली होती.

बसपा नेत्यांनी सांगितलं की, या नेत्यांना यूपी, महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडमधील निवडणूक आणि प्रचार व्यवस्थापनाचा अनुभव आहे. प्रत्येक झोनमधील तीन ते चार नेत्यांचे पॅनेल या झोन समन्वयकांना मदत करतील. ज्येष्ठ नेते नितीन सिंग हे निवडणुकीच्या तयारीवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय समन्वयक म्हणून काम करतात आणि आकाश आनंद हे राज्य युनिट आणि मायावती यांच्यातील दुवा म्हणून काम करतात.

बसपाच्या सूत्रांनी सांगितलं की, आकाश आनंद हे देखील उमेदवारांच्या निवडीत सामील होतील आणि पक्षाच्या दिल्ली युनिट आणि या झोन समन्वयकांच्या बैठकीत महत्वाची भूमिका बजावतील. बसपाने सर्व ७० जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. बसपाच्या एका नेत्याने सांगितले की, “अनेक जागांसाठी नावांचे पॅनेल आधीच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडे पाठवले असून मायावती आणि आकाश आनंद यांची चर्चा झाल्यानंतर उमेदवारांची घोषणा करतील. राष्ट्रीय राजधानीतील मागील निवडणुकीत पक्षाने अनेक महिने अगोदर उमेदवारांची घोषणा केली होती. परंतु यावेळी विलंब झाला आहे. कारण पक्षाने कॅडरमधील उमेदवारांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. असं नितीन सिंग यांनी सांगितलं. तसेच दिल्लीत आम आदमी पक्षाच्या (आप) उदयानंतर पक्षाने गमावलेला मतांचा आधार परत मिळवणे हे बसपाचे प्राथमिक उद्दिष्ट असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Story img Loader