Delhi Assembly Election 2025 NCP SP MLA Uttam Jankar : दिल्ली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने आम आदमी पार्टीला पाठिंबा जाहीर केला आहे. तर, या पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी एक पाऊल पुढे जात ‘आप’ची अधिक मदत सुरू केली आहे. मतदान ते मतमोजणीदरम्यान, ईव्हीएममध्ये फेरफार कसा केला जातो याबाबत माहिती देण्यासाठी जानकर यांनी ‘आप’शी संपर्क साधला आहे. जानकर यांना वाटते की याबाबत ‘आप’ला माहिती देण्यासाठी ते योग्य व्यक्ती आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत माळशिरस मतदारसंघातून ते विजयी झाले आहेत. ते विजयी झाले असले तरी त्यांनी मतदानाच्या प्रक्रियेवर संशय व्यक्त केला होता. या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने प्रचंड मोठा विजय (२८८ पैकी २३५ जागा) मिळवला होता. तर विरोधात असलेल्या महाविकास आघाडीला केवळ ४९ जागांवर समाधान मानावं लागलं. त्यानंतर जानकर यांच्यासह विरोधी पक्षांमधील सर्वच नेत्यांनी दावा केला होता की सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएममध्ये फेरफार करून हा विजय मिळवला आहे. यानंतर विरोधी पक्षांनी मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची मागणी केली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा