Delhi Assembly Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. यापूर्वी भाजपा विरूद्ध आम आदमी पक्ष असा जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. यामध्ये दिल्लीतील नऊ मतदारसंघात तर हा संघर्ष किंचित जास्त दिसून येत आहे. कारण येथे २०२० साली झालेल्या निवडणुकीत विजयाचा फरक हा ४००० मतांपेक्षा कमी होता.

५ वर्षांपूर्वी आपने या ९ जागांपैकी आदर्श नगर, शालीमार बाग, बिजवासन, कस्तुरबा नगर, छतरपूर, पटपडगंज आणि कृष्ण नगर हा सात जागा आपने जिंकल्या होत्या. तर भाजपाने लक्ष्मी नगर आणि बदरपूर येथे विजय मिळवला तर इतर जागांवर तो दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष राहिला होता. यापैकी अनेक जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांनाही विजयाच्या फरकापेक्षा जास्त मते मिळाली होती.

BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Chhagan Bhujbal On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : “…अन्यथा दंडासह रक्कम वसूल करण्यात येईल”, लाडकी बहीण योजनेबाबत छगन भुजबळांचं मोठं विधान
भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत?
Sanjay Raut On Mumbai Municipal elections 2025
Sanjay Raut : महाविकास आघाडीत फूट? “काय होईल ते होईल, आम्ही सर्व महापालिका स्वबळावर लढवणार”, ठाकरे गटाची मोठी घोषणा
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar : ‘देवेंद्र फडणवीसांनी आता नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं’, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान
Loksatta anvyarth Lok Sabha Elections BJP Narendra Modi Chandrababu Naidu Telugu Desam Party
अन्वयार्थ: आहे ‘डबल इंजिन’ तरीही…
Bandra Bharatnagar sra action
Mumbai : “अदाणी समूहाला पैशांनी…”, मुंबईतल्या वांद्रे भागात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पाडकामाविरोधात जोरदार राडा

या नऊ जागांपैकी लक्ष्मी नगर येथे २०१५ साली देखील अटीतटीच लढत झाली होती. तेव्हा येथे आपचा उमेदवार ४,८४६ मतांनी विजयी झाला होता. तर २०२० मध्ये भाजपानेही अवघ्या ८८० मतांच्या फरकाने आपल्याकडे खेचून घेतली होती.

बदरपूर येथे भाजपा आणि आप यांच्यात लढत झाली होती, ज्यामध्ये भाजपावा विजय मिळाला. येथेही विजयी मतांचा फरक हा ३,७१९ मतांचा होता. येथे मयावती यांच्या बहुजन समाज पार्टी पक्षाने आपची मते घेतली. त्यांच्या उमेदवाराला १०, ४३६ मथे मिळाली आणि तो उमेदवार काँग्रेसला मागे सारून तिसर्‍या क्रमांकावर राहिला. २०१५ मध्ये आपने ही जागा ४७,५८३ इतक्या प्रचंड मतांनी जिंकली.

२०२० मध्ये सर्वात अटीतटीची लढत बिजवासनमध्ये झाली ज्यामध्ये आपने ७५३ मतांनी विजय मिळवला. भाजपानंतर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसला जवळपास ६ हजार मते मिळाली.

आदर्श नगरमधील चुरशीच्या लढतीत, आपने विजय मिळवला मात्र २०१५ च्या तुलनेत पक्षाच्या विजयाचे अंतर २० हजार मतां हून २०२० मध्ये १५८९ वर घसरले.

मनिष सिसोदिया देखील थोडक्यात बचावले

आपचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियाही पटपडगंज जागेवर थोडक्यात बचावले होते. २०१५ मध्ये २८ हजारांहून अधिक मतांनी विजय मिळविलेल्या सिसोदिया यांना २०२० मध्ये भाजपाविरोधात फक्त ३,२०७ मतांनी विजय मिळला. पटपडगंजमधील दोन्ही निवडणुकांमध्ये उपविजेते ठरलेल्या भाजपाने २०१५ मधील ३३ टक्क्यांवरून २०२० मध्ये ४७ टक्के मतांवर झेप घेतली.

सिसोदिया यांनी यावेळी उमेदवारीची जागा बदलली आहे आणि ते जंगपुरा या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, जो २०२० मध्ये आपने १६ हजारांहून अधिक मतांनी जिंकला होता.

शालीमार बाग आणि कृष्णा नगरमध्येही आपच्या विजयाचे अंतर कमी झाले. शालीमार बागेत २०१५ मधील १०,००० हून अधिक मतांवरून २०२० मध्ये ३,४४० वर आले. कृष्णा नगरमध्ये २०१५ मध्येही ‘आप’ने भाजपविरुद्ध केवळ ४,००० मतांच्या अल्प फरकाने विजय मिळवला होता, जो २०२० मध्ये २,२७७ मतांनी खाली आला होता.

छतरपूरमध्ये आपच्या विजयाचे अंतर २०१५ मध्ये २० हजार मतांचे होते जे २०२० मध्ये ३,७२० मतांवर घसरले. तर कस्तुरबा नगरमध्ये आपला १५ हजारांहून अधिक मतांनी विजय मिळाला होता इथेही २०२० मध्ये विजयाचे अंतर ३ हजार १६५ वर आले. काँग्रेसच्या मतांची टक्केवारी २०१५ साली असलेल्या १२ टक्क्यांवरून २०२० मध्ये २१ टक्क्यांवर गेली. याचा फटका आपला बसला असून यामुळेच आपचे विजयाचे मार्जिन कमी झाले आहे.

शालीमार बाग आणि कृष्ण नगर या जागांवर देखील आपचे विजयाचे अंतर कमी झाले आहे. शालीमार बाग येथे विजयाचे अंतर २०१५ मध्ये १० हजार मतांचे होते जे २०२० मध्ये ३,४४० वर घसरले. तर कृष्ण नगर येत आप २०१५ मध्ये भाजपाविरोधात जिंकला होता, पण तेव्हा विजयाचे अंतर ४००० मतांचे होते, ते २०२० मध्ये घसरून २,२७७ इतके कमी झाले. २०१५ आणि २०२० या दोन्ही निवडणुकीत काँग्रस तिसर्‍या क्रमांकाचा पक्ष राहिला होता.

Story img Loader