१९९८ ते २०१३ अशी सलग १५ वर्षे दिल्लीमध्ये काँग्रेसची सत्ता होती. पण आम आदमी पक्षाच्या उदयानंतर दिल्लीमधील काँग्रेसच्या साम्राज्याला सुरुंग लागला. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने क्रमांक एकची जागा घेतली. भाजपाने ‘आप’नंतर जागा पटकावल्यामुळे काँग्रेसला क्रमांक तीनवर समाधान मानावे लागले. आता देशातील सर्वात जुना पक्ष राजधानीच्या शहरात अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे.
राजेंद्र नगर मतदारसंघात नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसला फक्त २.७९ टक्के मते मिळाली. काँग्रेसच्या उमेदवार प्रेमलता यांची अनामत रक्कमसुद्धा जप्त झाली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या ४.२६ टक्के मतांच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. सलग दोन टर्म दिल्लीमध्ये काँग्रेसचे आमदार नाहीत
पक्षाच्या सद्याच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करताना काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, “आम्हाला फक्त २ टक्के मते मिळाली आहेत. आम्हाला सोशल मीडियावर ट्रोल केले गेले नाही. मुख्य प्रवाहातील माध्यमांनी आम्हाला फारसे महत्त्व दिले नाही. ही आमच्यासाठी चिंताजनक बाब आहे. जनता आणि प्रसारमाध्यमे आता आमच्याकडून फारशा अपेक्षाही ठेवत नाहीत, हेच यातून स्पष्ट होते. जसे दिल्लीतील बसपा आणि इतर प्रादेशिक पक्षांसोबत घडते तसेच आमच्यासोबत घडत आहे.”काँग्रेस जसजशी अडचणीत येत आहे तसतसे अनेक नेते काँग्रेसचा हात सोडत आहेत.फसत आहे नुकताच तीन वेळा काँग्रेसचे आमदार राहिलेल्या तरविंदर सिंग मारवाह यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाच्या एका खासदाराने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “काँग्रेसमधून कोणाला तरी घेण्याची गरज आम्हाला वाटत नाही. काँग्रेस पक्ष दिल्लीतमध्ये आधीच कोसळला आहे”.
२०१५ ची विधानसभा निवडणूकीत पराभूत झाल्यानंतरही काँग्रेसने आपले दिल्लीमधील अस्तित्व टिकवून ठेवले होते. विधानसभा निवडणुकीच्या दोन वर्षांनंतर महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या पुनरागमनाची शक्यता निर्माण झाली. अजय माकन आणि शर्मिष्ठा मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलेल्या काँग्रेसला २१ टक्के मते मिळाली होती. या महापालिका निवडणुकीत ‘आप’ला २८ टक्के मते तर भाजपाला सर्वाधिक म्हणजे मते मिळाली होती. काँग्रेसने तिसरे स्थान मिळवले असले तरी २०१५ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसची मते सहा टक्क्यांनी वाढली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला २२.५ टक्के मते मिळाली होती. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा त्यांच्या मतांची टक्केवारी घसरली. काँग्रेसला एकूण मतांच्या ४.२६ टक्के मते मिळाली आणि पुन्हा खाते उघडण्यात त्यांना अपयश आले.