दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीश सिसोदियांना ‘सीबीआय’ने कथित मद्यधोरणातील घोटाळ्याप्रकरणी अटक झाल्यामुळे दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारवरच नव्हे तर, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या महत्त्वाकांक्षांनाही खीळ बसणार आहे. मुख्यमंत्रीपदी अरविंद केजरीवाल असले तरी, दिल्ली सरकारमधील महत्त्वाची मंत्रिपदे सिसोदिया सांभाळत होते. सिसोदिया दिल्ली सरकारचे अर्थमंत्री, शिक्षणमंत्री आहेत. उत्पादनशुल्क विभाग यासह ३३ पैकी १८ विभागांचे ते प्रमुख आहेत. या जबाबदाऱ्यामुळे दिल्लीचे प्रशासन चालवण्याचे प्रमुख काम सिसोदिया करत होते.

हेही वाचा- मनिष सिसोदियांच्या अटकेनंतर विरोधकांची एकजूट, काँग्रेस मात्र गप्प; जाणून घ्या कोणत्या पक्षाची काय भूमिका?

accountability of devendra fadnavis declined due to his divisive politics says supriya sule
फोडाफोडीच्या राजकारणामुळे फडणवीसांची विश्वसनीयता कमी; सुप्रिया सुळे
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “…तर मविआचे कार्यकर्ते फडणवीस, अजित पवारांच्या बॅगा तपासतील”, निवडणूक अधिकाऱ्यांनी बॅगेची तपासणी केल्यानंतर उद्धव ठाकरेंचा इशारा
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
Uddhav Thackeray On Jay Shah :
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं जय शाह यांना खुलं आव्हान; म्हणाले, “गावातील कोणत्याही तरुणाबरोबर क्रिकेट खेळून दाखवावं, मग…”
devendra fadnavis, public rally, nagpur west assembly constituency
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही पाकिस्तानमधून उमेदवार…”
uddhav thackeray shiv sena leader ex mla rupesh mhatre join eknath shinde shiv sena
ठाकरे गटाचा माजी आमदार शिंदे गटात; उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा घणाघात, “छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा मावळ्यांच्या हाती शोभून दिसतो, दरोडेखोरांच्या…”

दिल्ली राज्याची जबाबदारी सिसोदियांनी सांभाळायची आणि ‘आप’च्या राज्या-राज्यांतील विस्ताराचे काम केजरीवालांनी करायचे असा अलिखित नियम झालेला होता. सिसोदिया हे केजरीवाल यांचे अत्यंत निष्ठावान असल्यामुळे दिल्ली राज्याची सत्ता सिसोदियांवर सोपवण्यात केजरीवाल यांनाही अडचण आली नाही. केजरीवाल सरकारचे प्रमुख म्हणून सिसोदिया वावरत होते. पण, त्यांच्या अटकेने केजरीवाल यांना जबरदस्त धक्का बसला आहे.

हेही वाचा- मुश्रीफ विरुद्ध भाजपामधील वाद वैयक्तिक पातळीवर

आगामी लोकसभा निवडणूक १४ महिन्यांवर आली असताना भाजपविरोधात फक्त ‘आप’च उभा राहू शकतो, असे वारंवार केजरीवाल सांगत आहेत. मोदी विरुद्ध राहुल गांधी नव्हे तर, केजरीवाल असे दाखवण्याचा प्रयत्नही केला जात आहे. त्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून केजरीवाल यांनी ‘आप’च्या विस्ताराचे धोरण राबवले आहे. त्याचाच भाग म्हणून ‘आप’ने गोवा आणि गुजरातमधील विधानसभा निवडणुका लढवल्या होत्या. दिल्ली पाठोपाठ पंजाब ‘आप’ने काबीज केले. ‘आप’ला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी अधिकाधिक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय केजरीवाल यांनी घेतला होता. गुजरातनंतर आता मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ या राज्यांमध्येही यावर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. शिवाय, आगामी लोकसभा निवडणुकीसाठीही ‘आप’ला तयारी करावी लागणार आहे. ‘आप’च्या या वाढत्या प्रपंचाचे धोरण केजरीवाल यांनी सिसोदिया यांच्या भरवंशावर आखले होते. पण, सिसोदियांच्या अनुपस्थितीत केजरीवाल यांना दिल्लीच्या राज्य सरकारचे प्रशासन हाताळावे लागणार आहे. त्यामुळे केजरीवाल यांच्या भारत भ्रमणामध्ये काही प्रमाणात अडथळा निर्माण होऊ शकतो.

हेही वाचा- अरविंद केजरीवाल यांचे साथीदार, दिल्ली सरकारमध्ये सांभाळली अनेक महत्त्वाची खाती; अटक झालेले मनिष सिसोदिया कोण आहेत?

मनीष सिसोदिया हे आम आदमी पक्षाचे सहसंस्थापक आहेत. पण, केजरीवाल व सिसोदिया या दोघांची मैत्री पक्षसथापनेच्याही आधीपासून होती. ‘आप’मधून योगेंद्र यादव, प्रशांत भूषण आदी नेते तीव्र मतभेदानंतर बाहेर पडले, त्या काळात झालेल्या पक्षांतर्गत संघर्षामध्ये सिसोदिया हे केजरीवाल यांच्या पाठीशी उभे राहिले. तेच केजरीवालांचे राजकारणातील एकमेव विश्वासू मित्र असल्याचे मानले जाते. सिसोदियांनी शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल करून दाखवले. त्यांनी उभे केलेले सरकारी शाळांचे प्रारुप देशभर वाखाळले गेले. दिल्लीच्या सरकारी शाळा हा ‘आप’ सरकारचा ‘यूएसपी’ ठरला. आता सिसोदियांना मद्यधोरणातील कथित घोटाळ्यात अटक झालेली आहे. या प्रकरणातील चौकशीमुळे केजरीवाल सरकारची प्रतिमा मलिन करण्याची संधी भाजपला मिळालेली आहे. आत्तापर्यंत भ्रष्टाचारमुक्त सरकार चालवल्याचा दावा करणाऱ्या केजरीवालांना भाजपने राजकीय नैतिकतेच्या कोंडीत पकडले आहे. बिगरभाजप पक्षांमध्ये प्रमुख राष्ट्रीय नेता ही प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केजरीवाल जाणीवपूर्वक करत होते. मात्र, सिसोदियांच्या अटकेने केजरीवाल यांची राजकीय लढाई आणखी कठीण झाली आहे.