Delhi Election Result 2025 : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचा आज (८ फेब्रुवारी) निकाल जाहीर झाला आहे. दिल्लीत भारतीय जनता पक्षाने बहुमताचा आकडा पार केला आहे, तर आम आदमी पक्ष २२ जागा आघाडीवर आहे. दिल्तीच्या निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. भाजपा ४७ तर आप २२ जागांवर आघाडीवर आहे. तसेच या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. तसेच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया या दोन मोठ्या नेत्यांचाही पराभव झाला आहे. दरम्यान, दिल्लीत भाजपाचं सरकार स्थापन होणार आहे. मात्र, महत्वाचं म्हणजे दिल्लीत काँग्रेसला सलग चौथ्यांदा मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र, असं असलं तरी आम आदमी पार्टीचा पराभव हाच काँग्रेसला पुनरुज्जीवन करण्याचा एकमेव मार्ग आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरं तर दिल्ली एकेकाळी काँग्रेसचा गड मानला जायचा. मात्र, गेल्या काही वर्षांत काँग्रेसचा गड ढासळल्याचं दिसत आहे. दिल्लीच्या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही, याची दुसरी बाजू म्हणजे इंडिया आघाडीमधील नाराजी असल्याचं बोललं जातं. अनेकांचं असं मत आहे की भारतीय जनता पक्षाला दिल्लीच्या सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने आणि आम आदमी पक्षाने एकत्रित निवडणूक लढवायला हवी होती. मात्र, यावर काँग्रेसकडून असं म्हटलं जातं की, आम आदमी पक्षालाच काँग्रेसबरोबर युती नको होती. कारण अरविंद केजरीवाल यांनीच आपल्या आम आदमी पक्षाची ७० उमेदवारांची घोषणा केली होती.

दरम्यान, अनेक पक्षांना असंही वाटतं की दिल्लीतील भाजपाचा विजय हा हरियाणा आणि महाराष्ट्रातील विजयानंतर महत्वाचा आहे. कारण लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला कमी जागा मिळाल्या होत्या. मात्र, हरियाणा, महाराष्ट्र आणि आता दिल्लीतील विजय हा भाजपासाठी महत्वाचा मानला जात आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अजूनही तेवढेच लोकप्रिय आहेत आणि त्याचाच भाग म्हणून भाजपाला तीनही राज्यात मोठा विजय मिळाला असा संदेश यामधून विरोधी पक्षाला जाईल. विशेषत: जेव्हा विरोधकांना या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये भाजपाशी सामना करायचा आहे. राष्ट्रीय स्तरावर पुनरुज्जीवन करण्यासाठी पक्षाला राज्यांमध्ये पुनरागमन करावं लागेल असं आता बोललं जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार काँग्रेसने ‘आप’च्या उमेदवारांना किती मते मिळाली आणि काँग्रेसच्या उमेदवारांना किती मते मिळाली? हे पाहिले असता गेल्या वेळी मिळालेल्या ४.२४ टक्क्यापेक्षा वाढ झाली आहे. आता ज्या जागांवर ‘आप’चा भाजपाकडून पराभव झाला, त्या जागांवर त्यांच्या उमेदवारांना विजयाच्या फरकापेक्षा जास्त मते मिळतात का हे पक्ष पाहणार आहे. तरीसुद्धा काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांचं म्हणणं आहे की ‘आप’च्या विरोधात आक्रमक होण्याचा त्यांचा निर्णय योग्य होता. कारण आप विरुद्ध संताप वाढत असल्याचं त्यांचं मत आहे. दिल्ली निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवसांमध्ये राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांनी आम आदमी पक्षावर जोरदार हल्ला चढवला होता.

दरम्यान, राजधानीत भाजपाची कॅप्टिव्ह व्होटबँक आहे. ज्याचा मतांचा वाटा १९९३ पासूनच्या विधानसभा निवडणुकीत ३२ टक्के आणि ३८ टक्क्याच्या दरम्यान कमी-जास्त होता आणि जो मोठ्या प्रमाणात काँग्रेसशी ओव्हरलॅप होत नाही. १९९८ ते २०१३ पर्यंत दिल्लीत काँग्रेसची सत्ता होती. २००८ मध्ये जेव्हा पक्षाने सलग तिसऱ्यांदा दिल्ली जिंकली, तेव्हा मतांचा वाटा ४०.३१ टक्के होता. जो २०१३ मध्ये २४.५५ टक्के आणि २०१५ मध्ये १० टक्क्यांपेक्षा कमी झाला. २०२० मध्ये ते फक्त ४.२६ टक्के मते मिळवण्यात यशस्वी झाले.

दुसरीकडे २०१३ मध्ये आपचा मतांचा वाटा २९.४९ टक्के होता. २०१५ मध्ये ५४.३४ टक्क्यापर्यंत वाढला आणि २०२० मध्ये ५३.५७ टक्के झाला. २०१३ मध्ये भाजपाची मतांची टक्केवारी ३३ टक्के होती. जी २०१५ मध्ये थोडीशी घसरून ३२.१९ टक्के झाली. मात्र, २०२० मध्ये ती वाढून ३८.५१ टक्के झाली. यावरून असं दिसून येतं की काँग्रेसच्या मतांचा पाठींबा पूर्णपणे आपकडे वळला. त्यामुळे काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी ‘आप’ला बाहेर काढणे महत्त्वाचं असल्याचं एका काँग्रेस नेत्याने निकालापूर्वी सांगितलं होतं. दरम्यान, काँग्रेसचा असाही अंदाज आहे की आम्हाला मुस्लिमांनी मत दिले नाही. आमच्या जुन्या समर्थन बेसच्या मोठ्या वर्गाने अजूनही आपला मतदान केले नाही. आता बिहारमध्ये यावर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आता बिहारच्या निवडणुकीत आरजेडी आणि काँग्रेसमध्ये आघाडी होते की नाही? हे देखील महत्वाचं असणार आहे.