दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीने एकहाती सत्ता मिळवली आहे. मात्र सभागृहातील गदारोळ आणि भाजपा-आप पक्षाच्या नगरसेवकांमधील वाद यामुळे अद्याप दिल्लीला महापौर तसेच उपमहापौर मिळू शकलेले नाहीत. मंगळवारीदेखील फक्त नगरैवकांचाच शपथविधी सोहळा पार पडला. याच कारणामुळे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी भाजपाने आपला पराभव स्वीकारावा आणि महापौरपदाच्या निवडणुकीसाठी सहाय्य करावे, असे आवाहन केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> नाना पटोलेंची काँग्रेसला सावरण्यासाठी तर सत्यजीत तांबेंची सहानुभूतीसाठी धडपड; नाशिक पदवीधर मतदारसंघात चुरस

सभागृहात ‘मोदी-मोदी’ अशा घोषणा दिल्या

सभागृहात काही नगरसेवकांनी गदारोळ केल्यामुळे मंगळवारीदेखील दिल्लीच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक होऊ शकली नाही. सभागृहातील वरीष्ठ सदस्य तसेच निवडून आलेल्या नगरसेवकांच्या शपथविधीनंतर सभागृह १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते. यावेळी भाजपाच्या काही नगरसेवकांनी सभागृहात ‘मोदी-मोदी’ अशा घोषणा दिल्या. तसेच आप पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात घोषणा दिल्या.

हेही वाचा >> वंचित व शिवसेना युतीमुळे पश्चिम वऱ्हाडात राजकीय समीकरणे बदलणार

भाजपा महापौरपदाच्या निवडणुकीपासून दूर पळत आहे

या सर्व गदारोळानंतर मनिष सिसोदिया यांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. “भाजपा महापौरपदाच्या निवडणुकीपासून दूर पळत आहे. भाजपाचे नाटक प्रत्येकजण पाहतो आहे. लोक त्यांच्या राजवटीला कंटाळले होते. भाजपाने दिल्लीला फक्त कचऱ्याचे ढिगारे दिले. त्यांनी संपूर्ण राजधानी उद्ध्वस्त करून टाकली आहे,” अशी टीका मनिष सिसोदिया यांनी केली.

भाजपा महापौरपदाच्या निवडणुकीपासून पाळ काढत आहे

“प्रथम त्यांनी दिल्ली महापालिकेची निवडणूक टाळण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता भाजपा महापौरपदाच्या निवडणुकीपासून पाळ काढत आहे. भाजपाने त्यांचा पराभव स्वीकारला पाहिजे. तसेच महापौरपदाच्या निवडीसाठी त्यांनी सहकार्य केले पाहिजे,” असे आवाहनही मनिष सिसोदिया यांनी केले.

हेही वाचा >> पक्ष वाढीची चंद्रशेखर राव यांची सुरुवात महाराष्ट्रातून

दरम्यान, आम्ही जे करू शकलो नाही, ते आप पक्षाचे महापौर करू शकतात; याची भाजपाला कल्पना आहे, अशी खोचक टीकादेखील सिसोदिया यांनी केली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi mayor elections row manish sisodia urges bjp to accept defeat in delhi mcd election prd