नीलेश पानमंद / भगवान मंडलिक

ठाणे : शिवसेनेतील फुटीचे आणि राज्यातील सत्ता बदलाचे केंद्रबिंदू असलेल्या ठाणे जिल्ह्यात दिवाळी पहाट कार्यक्रमावरून शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना गेल्या काही दिवसांपासून रंगला असतानाच, सोमवारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने तरुणाईला आकर्षित करण्यासाठी दोन्ही गटांमध्ये चढाओढ दिसून आली. आपला कार्यक्रम कसा जोरदार होईल आणि त्याला कशी गर्दी होईल, यावरच दोन्ही गटाने लक्ष केंद्रीत केले होते आणि यातूनच राजकीय शक्ती प्रदर्शनासाठी दहीहंडीप्रमाणे बक्षिसांचे पहिल्यांदाच वाटप होताना दिसून आले.

Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
washim assembly constituency dispute within mahayuti
महायुतीमध्ये असंतोषाची दरी, बंडखोरीमुळे वाशीम जिल्ह्यात वाद वाढले; कारवाईत पक्षपातीपणा?
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
dcm devendra fadnavis praise obc community
भाजपच ओबीसींच्या पाठीशी!, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

हेही वाचा >>> अतिवृष्टीग्रस्तांसाठी शरद पवारांचा पुढाकार; ऐन दिवाळीत दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कार्यक्रमाच्या ठिकाणी हजेरी लावली. त्याचबरोबर ठाण्यातील राम मारुती रोडवर भाजपने, डोंबिवलीमध्ये फडके रस्त्यावर खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने तर कल्याणमध्ये केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील फाऊंडेशनतर्फे साई चौकात दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामुळेच ठाणे जिल्ह्यात यंदा दहीहंडीच्या धर्तीवर राजकीय दिवाळी साजरी होत असल्याचे दिसून आले.

हेही वाचा >>> निवडणूक अजून लांब मग दिवाळीत खर्च कशाला? कोल्हापुरातील नेत्यांचे धोरण

ठाण्याच्या तलावपाळी भागातील एकाच जागेवर शिंदे आणि ठाकरे गटाने दिवाळी पहाट कार्यक्रम घेण्याचा आग्रह धरला होता आणि त्यासाठी महापालिकेनेही परवानगी देऊ केली होती. परंतु पोलिसांनी मात्र दोन्ही गटांना परवानगी दिली नव्हती. यामुळे राजकीय वातावरण तापले होते. या संदर्भात ठाकरे समर्थक खासदार राजन विचारे यांचे पुतणे मंदार विचारे यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन कार्यक्रमासाठी परवानगी देण्यासंबंधी याचिका दाखल केली होती. ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. यामुळे या जागेवर शिंदे गटाला दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी परवानगी मिळाली होती. तर, या कार्यक्रमस्थळापासून काही अंतरावरच असलेल्या गडकरी रंगायतन चौकाजवळ राजन विचारे यांना दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे सोमवारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने तरुणाईला आकर्षित करण्यासाठी दोन्ही गटांमध्ये चढाओढ दिसून आली. या दोन्ही गटांनी ध्वनीक्षेपक आणि ढोल-ताशांची व्यवस्था ठेवली होती. त्यावर तरुणाई थिरकताना दिसली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कार्यक्रमाच्या ठिकाणी हजेरी लावून तरुणाईशी संवाद साधला. तर, राजन विचारे यांच्याकडून पेहराव, केशभूषा, नृत्य करणाऱ्या तरुणांना बक्षिसांचे वाटप करण्यात येत होते. यातूनच आपला कार्यक्रम कसा जोरदार होईल आणि त्याला कशी गर्दी होईल, यावरच दोन्ही गटाने लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून आले.

हेही वाचा >>>जळगाव : दिवाळीच्या किराणा वाटपावरून बच्चू कडू-रवी राणांमध्ये राजकीय फटाकेबाजी

तलावपाळी येथे आयोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी शिंदे गटाचे पदाधिकारी सकाळपासूनच ठाण मांडून होते. याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हजेरी लावली. तर, ठाकरे समर्थक खासदार राजन विचारे यांच्यासह जिल्ह्याचे पदाधिकारी त्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी सकाळपासूनच उपस्थित होते.  याशिवाय, राम मारूती रोड येथेही भाजपचे माजी नगरसेवक संजय वाघुले, स्वामी प्रतिष्ठानचे प्रमुख आणि भाजपचे पदाधिकारी शिवाजी पाटील तसेच काही आयोजकांकडून कार्यक्रम आयोजित केले आहेत. यामुळे दिवाळी पहाट निमित्ताने हा संपूर्ण परिसर राजकीय आखाडा झाल्याचे चित्रही दिसून आले. डोंबिवली मध्ये फडके रस्त्यावर खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने तर कल्याणमध्ये केंद्रीय पंचायत राजमंत्री राज्यमंत्री कपिल पाटील फाऊंडेशनतर्फे साई चौकात दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन केले होते.