राज्यात अजित पवार आणि छत्तीसगडमध्ये टी. एस. सिंगदेव यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याने उपमुख्यमंत्र्यांच्या यादीत भर पडली आहे. देशातील १२ राज्यांमध्ये उपमुख्यमंत्री सध्या कार्यरत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उपमुख्यमंत्रीपदाला घटनात्मक दर्जा काहीही नाही. फक्त राजकीय सोय लावण्याकरिता या पदाची निर्मिती करण्यात आली आहे. १९६०च्या दशकात बिहारमध्ये अनुराग सिन्हा हे देशातील पहिले उपमुख्यमंत्री होते. यानंतर विविध राज्यांमध्ये या पदाची निर्मिती करण्यात आली. राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघे उपमुख्यंत्रीपदी आहेत. उत्तर प्रदेशात दोन उपमुख्यमंत्री आहेत. आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डी यांच्या मंत्रिमंडळात पाच उपमुख्यमंत्री आहेत. गेल्याच आठवड्यात छत्तीसगडमध्ये टी. एस. सिंगदेव यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली.

हेही वाचा – जळगाव जिल्ह्यात तीन पक्षांचे तीन मंत्री

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरयाणा, छत्तीसगड,अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालॅण्ड, मिझोराम या राज्यांमध्ये उपमुख्यमंत्रीपद अस्तित्वात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy cm in 12 states of the country print politics news ssb
Show comments