हिंगोली : भाजपच्या दबावामुळे शिवसेना एकनाथ शिंदे गटाने हेमंत पाटील यांना उमेदवारी नाकारली आणि महायुतीचे पाच आमदार असतानाही शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नागेश पाटील आष्टीकर यांचा विजय झाला.

हिंगोली लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार बदलून मिळाले तरीसुद्धा सहाही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीलाच लाभ झाला. आष्टीकर यांच्या विजयामुळे भाजप, शिंदे सेनेच्या वर्चस्वाला आता सुरुंग लागला. त्याचे परिणाम आगामी विधानसभेच्या निवडणुकीत दिसतील असा दावा केला जात आहे.

Devendra fadnavis meet amit shah
नाराज एकनाथ शिंदेंची भाजपकडून मनधरणी, फडणवीस – शहा चर्चेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
shinde shiv sena door open to bjp rebels in navi mumbai
भाजपविरोधी बंडखोरांना शिंदे गटाचे दार खुले? पालिकेत वर्चस्व मिळवण्यासाठी व्यूहरचना
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : ‘मविआ’ला धक्का बसणार? “अनेकजण शिवसेना, भाजपाच्या संपर्कात”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान

हेही वाचा… तृणमूल, उबाठा सत्तास्थापनेसाठी आग्रही, काँग्रेसची सावध भूमिका; चंद्राबाबू नायडू, कुमार इंडिया आघाडीत येणार?

हिंगोली लोकसभा मतदारसंघात तीन जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या सहा मतदारसंघात भाजपचे तीन, शिंदे सेना व अजित पवार राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक असे एकूण महायुतीचे पाच आमदार आहेत. काँग्रेसचा एकमेव आमदार या मतदारसंघात आहे. एकूणच या मतदारसंघावर महायुतीचे वर्चस्व असताना विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपच्या आमदारांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला. उमेदवार बदलून देण्याची त्यांची मागणी पूर्ण झाली. मात्र, ते महायुतीचा उमेदवार निवडून आणू शकले नाही.

निवडणूक प्रचारात ठाकरे गटाच्या निष्ठावान पदाधिकाऱ्यांनी जीवाचे रान केले. त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाची साथ मिळाली. त्यांच्या एकजुटीसमोर मतदारसंघावर वर्चस्व असलेल्या महायुतीच्या आमदारांना मतदारांनी किंमत दिली नाही. कळमनुरीत वास्तव्य करणाऱ्या विधान परिषद सदस्या दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव मात्र निवडणूक प्रचारापासून अलिप्त होत्या. महाविकास आघाडी उमेदवाराच्या प्रचारात त्या कुठेही सहभागी झाल्याचे समोर आले नाही. जून २०२४ अखेर त्यांच्या आमदारकीची मुदत संपुष्टात येणार आहे. शिवेसनेच्या शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर मताधिक्य मिळवून देतील असे सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात तसे घडले नाही. कळमनुरी मतदारसंघात ठाकरे गट व काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या यशस्वी प्रयत्नामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार आष्टीकर यांना २१ हजारांहून अधिक मताधिक्य मिळाले.

हेही वाचा… भाजपाच्या ‘या’ सहकारी पक्षाचा निकालात स्ट्राईक रेट आहे १०० टक्के; काय असतो राजकीय पक्षांचा स्ट्राईक रेट?

हिंगोली लोकसभा मतदारसंघनिहाय मिळालेली मते

नागेश पाटील अष्टीकर यांना एकूण मते चार लाख ९२ हजार ५३५ मिळाली आहेत.

बाबुराव कदम यांना एकूण मते तीन लाख ८३ हजार ९३३ मिळाली आहेत.

हिंगोली कळमनुरीवसमतहदगावकिनवटउमरखेड
नागेश पाटील अष्टीकर८७,२७५८४,१२०८४,६४६७५,३८९७६,५६७८२,४३५
बाबुराव कदम५३,९२३६३,१००५४,०९६,७३,७५१६२,६३९७५,०९०

Story img Loader