लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. हरियाणातील कर्नालमध्येही राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दुष्यंत चौटाला यांनीसुद्धा प्रचाराचा धडाका लावला आहे. दुष्यंत चौटाला यांच्या नव्याने तयार झालेल्या जननायक जनता पक्षाने (JJP) ऑक्टोबर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १० जागा जिंकल्या होत्या, तेव्हा ते भाजपाला धडा शिकवतील, असं कर्नालमधील तरुणांच्या गटाने प्रतिक्रिया दिली होती. पाच वर्षांहूनही कमी कालावधीत भाजपाने त्यांना धडा शिकवल्याचे दिसून आले. ज्या वर्गाने या पक्षाला पहिल्यांदाच १० विधानसभेच्या जागा देऊन आपल्या नेत्याला ‘किंग मेकर’ केले होते, तोच वर्ग आता त्याचे प्रमुख नेते दुष्यंत चौटाला यांना विरोध करीत आहे. काळे झेंडे दाखवून प्रश्न विचारले जात आहेत. विरोधाची ठिणगी इतकी पसरली आहे की, आता दुष्यंत चौटाला यांच्या आमदार आई नयना चौटाला यांना पुढे येऊन शेतकऱ्यांची माफी मागावी लागली आहे. पक्षातही बंडखोरी सुरू झाली आहे.

हेही वाचाः भाजपमधून प्रवेश केलेल्या श्रीराम पवार यांना रावेरमध्ये राष्ट्रवादीची उमेदवारी

Manmohan Singh resume dr Manmohan Singh CV
Manmohan Singh Resume : प्राध्यापक, आरबीआय गव्हर्नर, अर्थमंत्री ते पंतप्रधान…; मनमोहन सिंग यांचा बायोडाटा होतोय व्हायरल, नेमकं त्यात लिहिलंय काय, वाचा
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
how many press conference taken by dr manmohan singh
Dr. Manmohan Singh Death: डॉ. मनमोहन सिंग यांनी १० वर्षांत किती पत्रकार परिषदा घेतल्या? पंतप्रधान मोदींशी याची तुलना का केली जाते?

परंतु शेतकरी त्यांच्यावर का नाराज आहेत, ते दुष्यंतला माफ करणार का हा मोठा प्रश्न आहे. देशाचे माजी उपपंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी देवी लाल यांचे दुष्यत चौटाला पणतू आहेत. दुष्यंत २०१४ मध्ये खासदार झाले तेव्हा त्यांचे वय फक्त २५ वर्षे होते. ते देशातील सर्वात तरुण खासदार असल्याचे बोलले जात होते. त्या काळात ते स्वतःला देवी लाल यांच्या राजकीय वारशाचे सर्वात मोठे दावेदार म्हणवत होते. आपल्या कुटुंबाचा पक्ष असलेल्या इंडियन नॅशनल लोक दल (INLD) पासून फारकत घेतल्यानंतर त्यांनी वडील अजय चौटाला आणि भाऊ दिग्विजय चौटाला यांच्याबरोबर मिळून जननायक जनता पक्षाची स्थापना केली.

हेही वाचा: मोदींना पाठिंबा ही भाजपपेक्षा मनसेची राजकीय गरज ?

पक्ष स्थापन केल्यानंतर पहिल्याच विधानसभा निवडणुकीत (२०१९) १० जागा जिंकल्या. विशेष म्हणजे दुष्यंत आणि त्यांच्या पक्षाने भाजपाविरोधात निवडणूक लढवली होती. निवडणुकीत ६५ चा आकडा पार करण्याचा नारा देणारा भाजपा ९० सदस्यांच्या विधानसभेत केवळ ४० वर घसरला. दुष्यंत आणि त्यांच्या पक्षाने निवडणुकीत अर्थमंत्री कॅप्टन अभिमन्यू आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री कृष्णा बेदी आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला या दोन मोठ्या मंत्र्यांचा पराभव केला.

…म्हणून दुष्यत चौटाला यांची विश्वासार्हता गोत्यात आली

मात्र, नंतर दुष्यंत यांनी भाजपाबरोबर सरकार स्थापन केले. त्यांनी स्वतः उपमुख्यमंत्री पद स्वीकारले आणि सर्व फायदेशीर खाती त्यांच्याकडे आली. हरियाणात दुष्यंत चौटाला आणि त्यांच्या पक्षाविरुद्धची ही पहिली नाराजी होती. जेजेपीला भाजपाच्या विरोधात असलेल्यांची मते मिळाली, तर दुष्यंत चौटाला भाजपाबरोबर सरकार कसे बनवू शकतात, असे सांगून लोकांनी त्यांची विश्वासार्हता गोत्यात आणली. यानंतर सुमारे १३ महिने चाललेल्या शेतकरी आंदोलनात हरियाणातील शेतकरी आणि जाट समाजाने दुष्यंतवर भाजपा सोडण्यासाठी खूप दबाव आणण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकारला तिन्ही कृषी कायदे मागे घेण्यास भाग पाडले जावे, असाही शेतकऱ्यांचा आग्रह होता. परंतु दुष्यंतने शेतकऱ्यांचा दबाव गांभीर्याने घेतला नाही. त्यांच्या राजवटीत कुरुक्षेत्रात दोनदा शेतकऱ्यांवर लाठीचार्ज झाला. पोलिसांनी वृद्ध शेतकऱ्यांना मारहाण केली, पण दुष्यंत चौटाला डगमगले नाहीत. दुष्यंत विरुद्ध हरियाणातील शेतकऱ्यांचा दुसरा मोठा रोष इथूनच उगम पावला. एवढेच नाही तर आता त्यांचा पक्ष जेजेपीमध्येही बंडखोरी सुरू झाली आहे. प्रदेशाध्यक्ष निशान सिंह यांनी पक्ष सोडला आहे. अनेक आमदार नाराज असल्याचे बोलले जात आहे. कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या ७५० शेतकऱ्यांसाठी चौटाला यांनी कधीही आवाज उठवला नाही, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यावेळी जेजेपी हा हरियाणातील सत्ताधारी भाजपाचा सहयोगी पक्ष होता.

१३ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांनी १२ मागण्यांसह आंदोलन सुरू केले, तेव्हा दुष्यंत यांच्याविरोधातील तिसरा मोठा संताप समोर आला. हरियाणा सरकारने रस्त्यांवर कायमस्वरूपी नाकेबंदी आणि कुंपण घातले होते, ज्यामुळे शेतकरी दिल्लीला जाऊ शकत नाहीत. त्यावेळी मनोहर लाल खट्टर मुख्यमंत्री होते आणि दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्री होते. हरियाणा पोलिसांनी शंभू बॉर्डर आणि खनौरी बॉर्डर येथे शेतकऱ्यांवर अश्रुधुराचे असंख्य नळकांडे फोडले. जर हरियाणा सरकारने त्यांना एमएसपीच्या हमीभावाच्या मागणीसाठी दिल्लीला जाण्याची परवानगी दिली नाही, तर ते भाजपा आणि जेजेपीच्या नेत्यांना गावात जाऊ फिरू देणार नाहीत, असंही तेव्हा शेतकऱ्यांनी सांगितले होते. यानंतर १२ मार्च रोजी भाजपाने जेजेपीबरोबरची युती तोडून सरकारपासून वेगळे झाले. सरकारपासून वेगळे होताच दुष्यंत चौटाला यांना शेतकऱ्यांची आठवण येऊ लागली. त्यानंतर ते स्वत:ला शेतकऱ्यांचा हितचिंतक म्हणू लागले, शेतकऱ्यांनीही त्यांना जुन्या गोष्टींची आठवण करून दिली. हरियाणातील शेतकरी कोणाला सर्वात जास्त विरोध करीत असतील तर ते दुष्यंत चौटाला आहेत. त्यांचे वडील अजय चौटाला यांनाही विरोध केला जात असून, त्यांच्यावर शेतकरी आंदोलनाविरोधात वक्तव्ये केल्याचा आरोप आहे.

खासदार असताना ते संसदेत ट्रॅक्टर घेऊन गेले

दुष्यंत चौटाला आणि वडिलांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या सततच्या आंदोलनांवरून त्यांची आई नयना चौटाला त्यांच्या बचावाच्या पवित्र्यात आहेत. दिल्लीला जाण्यापासून रोखण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये भाजपाबद्दल नाराजी आहे. साडेचार वर्षे एकत्र राहिल्याने दुष्यंतला विरोध होत आहे. दुष्यंत यांनी नेहमीच शेतकऱ्यांचा आवाज उठवला. खासदार असताना ते संसदेत ट्रॅक्टर घेऊन गेले आणि ट्रॅक्टरवरचा कर हटवला. हरियाणामध्ये १४ पिके एमएसपीवर खरेदी केली गेली आणि पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले गेले. तरीही शेतकरी नाराज असतील तर मी माफी मागतो. लोकांनी दुष्यंतचा निषेध करू नये, तर एकत्र बसून आपला राग दूर करावा, असंही दृष्यंतची आई सांगत आहे.

Story img Loader