नागपूर : विधानसभा निवडणुकीत १३२ जागा जिंकून भारतीय जनता पक्ष राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. २०१९ च्या तुलनेत या पक्षाच्या २८ जागा वाढल्या. यात सर्वाधिक ९ जागा विदर्भातील आहेत. काँग्रेसचा विचार केला तर पडझडीच्या काळातही काँग्रेसने जिंकलेल्या १६ पैकी ९ जागा विदर्भातील आहेत. त्यामुळे या भागाने मतांचा कौल जरी भाजपला दिला असला तरी काँग्रेसची लाजही राखली आहे.

२०१९ मध्ये भाजपने १०५ जागा जिंकल्या होत्या. २०२४ च्या निवडणुकीत ही संख्या २८ ने वाढून १३२ वर वर गेली. वाढीव २८ जागांमध्ये सर्वाधिक ९ जागा या विदर्भातून, ८ जागा पश्चिम महाराष्ट्रातून , पाच जागा ठाणे-कोकणातून व प्रत्येकी तीन जागा मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील आहेत. भाजपची एक जागा मुंबईत कमी झाली आहे. विदर्भात ६२ जागा आहेत.भाजपने ४७ जागी उमेदवार दिले होते. त्यापैकी ३८ जागा जिंकल्या. २०१९ मध्ये या पक्षाकडे २९ जागा होत्या. पूर्व विदर्भात भाजपकडे १४ जागा होत्या आता ही संख्या सातने वाढून २१ वर गेली तर पश्चिम विदर्भात १५ जागा होत्या त्यात दोनने वाढ होऊन ती १७ वर गेली.

political journey Devendra Fadnavis, Mayor, Chief Minister
फडणवीसांचा थक्क करणारा राजकीय प्रवास, महापौर ते मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता, उपमुख्यमंत्री आणि पुन्हा मुख्यमंत्री
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
Eknath Shinde News
Eknath Shinde : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार का? उदय सामंत यांनी दिलं उत्तर; म्हणाले, “त्यांनी…”
devendra fadnavis nitin gadkari
फडणवीसांच्या निवडीवर गडकरींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राज्याच्या विकासाला …”
New CM of Maharashtra Devendra Fadnavis| BJP announced Maharashtra New Chief Minister
Devendra Fadnavis : मुख्यमंत्रि‍पदाचा मार्ग मोकळा होताच देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “एक है तो सेफ है…”
mahayuti vidhan sabha result
कलंकितांवरून कोंडी; शिवसेनेच्या मंत्र्यांची नावे भाजपने ठरविण्यावर आक्षेप; राष्ट्रवादीसमोरही पेच
Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!

हेही वाचा : राजुऱ्यात काँग्रेस, शेतकरी संघटनेला नव्या नेतृत्वाची गरज! अरुण धोटे, ॲड. दीपक चटप यांची नावे चर्चेत

विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता, त्यामागे या भागातील ओबीसी मतपेढीवर भाजपने वर्चस्व मिळवले होते. लोकसभा निवडणुकीत हा मतदार या पक्षापासून दूर गेला व त्याचा फटका या पक्षाला बसला होता. विधानसभा निवडणुकीत भाजपने विशेषत: देवेंद्र फडणवीस यांनी ही मतपेढी पुन्हा पक्षासोबत जोडण्यासाठी केलेले ‘ डॅमेज कंट्रोल’ यशस्वी झाल्याचे निवडणूक निकालातून दिसून येते.

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला फटका

२०१९ च्या निवडणुकीत राज्यात काँग्रेसकडे ४४ जागा होत्या. या निवडणुकीत ही संख्या १६ वर आली. म्हणजे तब्बल २८ जागांचा फटका पक्षाला बसला. गमावलेल्या जागांपैकी सर्वाधिक १० जागा या पश्चिम महाराष्ट्रातील आहे.मराठवाड्यात सात तर विदर्भातसहा जागा गमावल्या. विदर्भात पूर्वी काँग्रेसकडे १५ जागा होत्या आता ही संख्या ९ वर आली. तरी काँग्रेसला मिळालेल्या एकूण जागांचा विचार करता त्यात विदर्भाचे योगदान सर्वाधिक ठरते. मुंबईत काँग्रेसला एक जागा मिळाली, मागच्या निवडणुकीत ही संख्या शुन्य होती.

हेही वाचा : फडणवीसांचा थक्क करणारा राजकीय प्रवास, महापौर ते मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता, उपमुख्यमंत्री आणि पुन्हा मुख्यमंत्री

शिवसेनेच्या दोन्ही गटाला समान जागा

२०१९ मध्ये एकसंघ शिवसेनेला चार जागा मिळाल्या होत्या. पक्षात फूट पडल्यावर दोन्ही सेनेला प्रत्येकी चार -चाम्जागा मिळाल्या. दोन्ही गटांमिळून शिवसेनेच्या आठ जागा होतात. ठाकरे गटाला मिळालेल्या चार जागांपैकी बाळापूरची जागा त्यांच्याकडे होती ती त्यांनी कायम राखली, एक जागा (मेहकर) शिंदेसेनेकडून तरे एक जागा (दर्यापूर) मैत्रीपूर्ण लढतीत काँग्रेसकडून हिसकावून घेतली. आर्णीची जागा पहिल्यांदाच जिंकली.

लोकसभेच्या अगदी उलट निकाल

लोकसभा निवडणुकीत विदर्भात भाजपचा धुव्वा उडाला होता. फक्त दोन जागा त्यांना मिळाल्या होत्या. विधानसभा निवडणुकीचे निकाल अगदी त्या उलट लागले. शेतमालाच्या भावातील दरघसरणीपेक्षा लाडकी बहीण हा मुद्दा भाजपला साथ देऊन गेला.

हेही वाचा : राज्याच्या इतिहासात सात जणांनी भूषविले एकापेक्षा अधिक वेळा मुख्यमंत्रीपद !

भाजपच्या वाढलेल्या जागा

विभागजिंकल्यावाढ
पश्चिच महाराष्ट्र२८०८
विदर्भ३८०९
मराठवाडा१९०३
ठाणे१६०५
उत्तर महाराष्ट्र१६०३
मुंबई१५-१ घट
एकूण१३२२८

Story img Loader