नागपूर : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा घोळ अजून सुरू असतानाच भारतीय जनता पक्षाने रविवारी एकूण ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून आघाडी घेतली आहे. पहिल्या यादीत नागपूर जिल्ह्यातून भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह चार जागांवरील उमेदवारांचा समावेश आहे. अजून सहा जागांची घोषणा व्हायची आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण १२ जागा आहेत. महायुतीत भाजपने रामटेक ही शिवसेनेसाठी (शिंदे) सोडली आहे. उर्वरित ११ पैकी पाच जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे. दक्षिण-पश्चिममधून अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा निवडणूक लढणार आहे. या मतदारसंघातील ही त्यांची चौथी निवडणूक असणार आहे. दक्षिण नागपूरमध्ये विद्यमान आमदार मोहन मते यांच्याबाबत प्रचंड नाराजी होती. तेथे या भागाचे माजी आमदार सुधाकर कोहळे इच्छुक होते. त्यामुळे भाजप भाकरी फिरवणार का ? याकडे लक्ष लागले होते. पण अखेर पक्षाने मोहन मते यांच्या पारड्यात उमेदवारी टाकली.

आणखी वाचा-कर्नाटकात भाजपमध्ये घराणेशाहीला प्राधान्य, येडियुरप्पानंतर बोम्मई पुत्राला उमेदवारी

मते हे देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक मानले जातात तर कोहळे हे गडकरी समर्थक आहेत..पूर्व नागपूरमधून चौध्यांदा या भागाचे विद्यमान आमदार कृष्णा खोपडे यांच्यावर विश्वास टाकण्यात आला आहे. ते गडकरी समर्थक आमदार आहेत. मध्य नागपूर, उत्तर आणि प श्चिम नागपूर या तीन मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा झाली नाही. मध्यमध्ये विद्यमान आमदार विकास कुंभारे यांच्याविषयी नाराजी आहे. तेथे विधान परिषद सदस्य प्रवीण दटके इच्छुक आहेत. पश्चिममध्येही रस्सीखेच आहे. उत्तर नागपूरमध्ये भाजपकडून नवीन चेहऱ्याचा शोध सुरू आहे. माजी आमदार मिलिंद माने हे येथून इच्छुक आहे.

ग्रामीणमध्ये दोनच जागा जाहीर

नागपूर ग्रामीणमध्ये एकण सहा जागा आहेत. त्यापैकी रामटेकची जागा भाजपने शिवसेने(शिंदे) साठी सोडली आहे. उर्वरित पाच पैकी दोनच जागी उमेदवार घोषित केले. कामठीतूनचंद्रशेखर बावनकुळे आणि हिंगण्यातून विद्यमान आमदार समीर मेघे निवडणूक लढणार आहे. मेघे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. तेथे महिलांना संधी द्यावी, अशी मागणी होती.

आणखी वाचा-Satyendar Jain : सत्येंद्र जैन १८ महिन्यानंतर तुरुंगामधून बाहेर; दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ला बळ मिळेल का?

सावरकरांना डच्चू, बावनकुळेंना संधी

नागपूर ग्रामीणमध्ये कामठीचे विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांना पक्षाने डच्चू दिला असून तत्यांच्या जागेवर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे बावनकुळे यांनी स्वत: आपण निवडणूक लढणार नाही, कामठीतून उमेदवारी मागितली नाही, असे जाहीर केले होते. मात्र दोनच दिवसांनंतर त्यांना दिल्लीतू निवडणूक लढवण्याबाबत निर्देश देण्यात आल्याची बातमी आली होती. पहिल्या यादीत त्यांचे नाव असल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. बावनकुळे यांनी कामठीतून २००४ ते २०१४ अशा सलग तीन निवडणुका जिंकल्या आहेत. २०१४ मध्ये त्यांना पक्षाने उमेदवारी दिली नव्हती. त्यांच्याऐवजी टेकचंद सावरकर यांना संधी मिळाली ते निवडून आले होते. २०२२ मध्ये बावनकुळे यांना विधान परिषदेवर पाठवून त्यांचे पुनर्वसन करण्यात आले होते. त्यांचा कार्यकाळ शिल्लक असल्याने सावरकर यांनाच पुन्हा संधी मिळेल, असे बोलले जात होते. पण पक्षाने त्यांना डच्चू दिला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis chandrashekhar bawankule and four other seats are included in first list of bjp from nagpur print politics news mrj