नागपूर : महायुतीतमध्ये झालेली बंडखोरी भारतीय जनता पक्षाने गांभीर्याने घेतली असून विदर्भातील बंडोबांना शांत करण्यासाठी फडणवीस समर्थक नेत्यांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याला कितपत यश येते हे पाहणे औत्युक्याचे ठरणारआहे.

बंडखोरी टाळा अशा सक्त सूचना केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांना दिल्या आहेत. मात्र अनेक मतदारसंघात अधिकृत उमेदवारांविरुद्ध पक्षाच्या नेत्यांनी अर्ज भरले. काही ठिकाणी मित्र पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध भाजप नेत्यांनी अर्ज दाखल केले. विदर्भातील १२ जागांवर झालेली बंडखोरी भाजपने गांभीर्याने घतली असून तेथील बंडोबांना शांत करण्याची जबाबदारी नागपूरच्या फडणवीस कट्टर समर्थक एका नेत्यांवर सोपवण्यात आली. आर्वीमध्ये सुमित वानखेडे यांच्या विरोधात विद्यमान आमदार दादाराव केंचे यांनी बंड केले. वानखेडे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. ही जागा भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे पक्ष येथे कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही. मध्य नागपूरमध्ये भाजपचे विधान परिषद सदस्य प्रवीण दटके रिंगणात आहे. हा हलबाबहुल मतदारसंघ असून भाजपने १५ वर्षांनंतर येथे गैरहलबा उमेदवाराला संधी दिली. त्याविरोधात या समाजाने नाराजी दर्शवली. भाजप कार्यकर्ते दीपक देवघरे यांनी अर्ज दाखल केला. ते निवडणुकीत कायम राहिल्यास होणाऱ्या मतविभाजानाचा फटका भाजपला बसू शकतो. चंद्रपूरमध्ये पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा विरोध पत्करून भाजपने अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी दिली. त्यामुळे नाराजी आहे. ही जागा २०१९ मध्ये भाजपने गमावली होती.

Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Amit Thackeray Code of Conduct
Shivsena UBT Letter : मनसेविरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेची खेळी, दीपोत्सवावरून थेट निवडणूक आयोगाला पत्र; अमित ठाकरे अडचणीत येणार?
Phadke Rasta Diwali Pahat, Diwali Pahat Eknath Shinde,
दिवाळी पहाटला राजकीय प्रचाराचे ‘फटाके’
North Maharashtra, Eknath Shinde group,
उत्तर महाराष्ट्रात शिंदे गटाला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर

हेही वाचा – अशोक चव्हाणांच्या पत्नीकडील हिऱ्याचे मूल्य ९३ लाख!

लोकसभा निवडणुकीत पूर्व विदर्भात भाजपला फक्त एक (नागपूर) जागा मिळाली होती. नागपूरमध्येही विजयी उमेदवाराच्या मताधिक्यात घट झाली होती. या भागात विधानसभेचे ३२ मतदारसंघ आहे. त्यामुळे भाजप कुठलाही धोका पत्करण्याच्या स्थितीत नाही. साधारणपणे एकूण १२ मतदारसंघात भाजपला बंडखोरानी अर्ज दाखल केले आहे. या सर्व मतदारसंघातील नाराजी दूर करण्यासाठी भाजपने त्यांच्या नेत्यांना कामी लावले आहे.

ठाकरे गटाची रामटेकमध्ये अडचण

लोकसभा निवडणुकीत रामटेकची जागा काँग्रेसला सोडताना शिवसेना ठाकरे गटाने आढेवेढे घातले नव्हते. मात्र विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघात काँग्रेसने बंड केले. ही बंडखोरी ठाकरे गटाच्या जिव्हारी लागली आहे.

हेही वाचा – भाजप, शरद पवारांचे उमेदवार मराठवाड्यात सर्वत्र; काँग्रेस, अजित पवारांची पाटी काही जिल्ह्यांमध्ये कोरी

‘बंडखोरांची समजूत घालण्याचे प्रयत्न पक्षातर्फे सुरू आहे. काही जण माघार घेणार आहे. जे माघार घेणार नाही, त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल.” – चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी

Story img Loader