मुंबई : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) महाराष्ट्राने थेट विदेशी गुंतवणुकीत पहिले स्थान कायम राखले आहे. या तिमाहीत ७० हजार ७९५ कोटींची गुंतवणूक झाली असून, एकूण गुंतवणुकीत हे प्रमाण ५२.५६ टक्के आहे, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केला. मात्र, ही आकडेवारी खोटी असून गुंतवणूक वाढली तर रोजगार का नाही वाढले, असा सवाल विरोधी पक्षांनी केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी एका ट्ीवटद्वारे राज्यात आलेल्या विदेशी गुंतवणुकीविषयी माहिती दिली. एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत देशात एकूण १ लाख ३४ हजार ९५९ कोटींची गुंतवणूक झाली. त्यापैकी ७०,७९५ कोटींची गुंतवणूक ही महाराष्ट्रात झाल्याचे ते म्हणाले. राज्याने गेली दोन वर्षे सातत्याने विदेशी आर्थिक गुंतवणूक आकर्षित करण्यात देशात पहिल्या क्रमांकाचे स्थान कायम राखले आहे. देशातील एकूण विदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राचा वाटा ५२ टक्के इतका असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या उद्याोग विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक (१९ हजार ५९ कोटी रुपये), तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली (१० हजार ७८८ कोटी रुपये), चौथ्या क्रमांकावर तेलंगणा (नऊ हजार २३ कोटी रुपये), पाचव्या क्रमांकावर गुजरात (आठ हजार ५०८ कोटी रुपये), सहाव्या क्रमांकावर तामिळनाडू (आठ हजार ३२५ कोटी रुपये), सातव्या क्रमांकावर हरयाणा (पाच हजार ८१८ कोटी रुपये) आठव्या क्रमांकावर उत्तरप्रदेश (३७० कोटी रुपये) आणि नवव्या क्रमांकावर राजस्थान (३११ कोटी रुपये) आहे. या सर्व राज्यांमध्ये झालेल्या गुंतवणुकीपेक्षाही अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात झाल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.
हेही वाचा >>>नंदनवनातील निवडणूक: निवडणुकीचे ‘इंजिनीअरिंग’ कोण करतेय?
मॉरिशस, सिंगापूरमधून सर्वाधिक
या गुंतवणुकीपैकी मॉरिशसकडून (२५ टक्के), सिंगापूर (२४ टक्के), अमेरिका (१० टक्के), नेदरलँड्स (७ टक्के), जपान (६ टक्के), ब्रिटन (५ टक्के), संयुक्त अरब अमिरात (३ टक्के), केमन बेट, जर्मनी व सायप्रस (प्रत्येकी दोन टक्के) इतकी गुंतवणूक झाली आहे. तर क्षेत्रनिहाय विचार करता १६ टक्के गुंतवणूक सेवा क्षेत्रात झाली असून त्याखालोखाल संगणक सॉफ्टवेअर व हार्डवेअर क्षेत्रात १५ टक्के गुंतवणूक झाली आहे. व्यापार व दळणवळण (प्रत्येकी ६ टक्के), वाहने व बांधकाम (प्रत्येकी ५ टक्के), औषधे, रसायने व अपारंपरिक ऊर्जा ( प्रत्येकी ३ टक्के) अशी गुंतवणूक झाली आहे.
गुंतवणूक नव्हे, सामंजस्य करार!
विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मात्र फडणवीस यांचा दावा फेटाळून लावला आहे. ‘ही थेट विदेशी गुंतवणूक आहे की नुसतेच सामंजस्य करार झाले आहेत ? हे राज्य सरकारने स्पष्ट करावे. ही गुंतवणूक राज्यात कुठे झाली आहे, ते समजले पाहिजे. मला तर कुठेही गुंतवणूक झाल्याचे आणि नोकऱ्या वाढल्याचे दिसत नाही,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही ‘फडणवीसांनी केलेली आकडेमोड कागदावरच आहे. सर्वाधिक उद्याोग महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेले आहेत. महाराष्ट्राला केवळ कागदावरच पहिल्या क्रमांकावर दाखवले जात आहे’ असा आरोप केला.
आधीची गुंतवणूक
●२०२२-२३ मध्ये एक लाख १८ हजार ४२२ कोटी रुपये
●२०२३-२४ मध्ये एक लाख २५ हजार १०१ कोटी रुपये
●२०२४-२५ (पहिल्या तिमाहीत ७०,७९५ कोटी)