नागपूर : अल्पसंख्याकांची मते मिळणार नाहीत, या भीतीने उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणणे बंद केले आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फडणवीस यांनी मंगळवारी दक्षिण-पश्चिम मतदारसंघात प्रचार मिरवणूक काढली. यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. फडणवीस म्हणाले, माझ्यापासून कोणाला तरी धोका वाटत असल्यामुळे मला लक्ष्य केले जात आहे. राज ठाकरे यांनी धनुष्यबाण ही कोणाची प्रॉपर्टी नसल्याची टीका केली आहे. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले. कोणत्याही राजकीय पक्षाचे चिन्ह कोणाचीही मालमत्ता नाही. धनुष्यबाण अधिकृतपणे शिंदेंना मिळाले आहे. महाविकास आघाडी हे विभाजित घर आहे. राहुल गांधी यांची नागपुरात संविधान सभा होणार असली तरी खोट्याचे वय अत्यंत अल्प असते. लोकसभा निवडणुकीच्या काळात पसरवलेला भ्रम आता दूर झाला आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसचे नाटक जनता आता चालू देणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.