Devendra Fadnavis : महाराष्ट्राची निवडणूक पुढच्या आठवड्यात होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारात भाजपाने दोन घोषणा आणल्या आहेत. एक है तो सेफ है आणि दुसरी घोषणा आहे बटेंगे तो कटेंगे. या दोन्ही घोषणांबाबत देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी लोकसत्ता लोकसंवाद या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली होती त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रात आमची कामगिरी चांगली नव्हती. याचं कारण आम्ही काऊंटर नरेटिव्ह सेट करण्यात कमी पडलो. संविधान बदलणार हे फेक नरेटिव्ह पसरवण्यात आलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रात आम्हाला त्याचा फटका बसला. आम्ही लोकसभा निवडणुकीत फक्त पक्षांशी नाही तर भारत जोडो सारख्या फोर्सशी लढत होतो. यामध्ये डाव्या विचारांचे लोक होते ज्यांनी एक चुकीचं नरेटिव्ह सेट केलं. आम्हाला वाटलं लोक आमच्या कामांकडे पाहतील. पण लोकांमध्ये भीती पसरवण्यात आली. संविधान बदलतील म्हणून घाबरवण्यात आलं. विधानसभेची गोष्ट मात्र वेगळी आहे. विधानसभेला हे फेक नरेटिव्ह आणि त्याचा परिणाम बऱ्यापैकी कमी झाला आहे. लोकांना समजलं आहे की त्यावेळी त्यांना कसं भडकवलं, घाबरवलं गेलं असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले.

deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “सुन लो ओवैसी…”, देवेंद्र फडणवीस यांचा एमआयएमला इशारा; म्हणाले, “काहीही झालं तरी…”
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”
Ajit Pawar on Amit Shah
‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “निवडणूक झाल्यावर…”
What Nana Patole Said About Devendra Fadnavis ?
Nana Patole : “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री कसे होतील? ते निवडून येणारच नाहीत..”; नाना पटोले काय म्हणाले?

फेक नरेटिव्हला उत्तर देणं आवश्यक होतं-फडणवीस

यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, विधानसभेला आम्ही डाव्या विचारांच्या शक्तींशी लढण्यासाठी आमच्या संघ परिवार आणि त्यासारख्या असंख्य संघटनांकडे गेलो. त्यांना हे सांगितलं की तुम्ही यावर आम्हाला उत्तर शोधून द्या. फेक नरेटिव्हला काऊंटर कसं करायचं ते सुचवा. त्यामुळेच मी व्होट जिहादचा विरोध हा धर्मयुद्धाने केला पाहिजे असं म्हटलं होतं. आम्हाला त्यांची चांगली मदत झाली. त्यामुळे भारत जोडो सारख्या फोर्सशी आम्ही लढू शकतो. भारत जोडो हे फक्त नाव आहे. त्यांची नीती विभाजनाची आहे. त्यांनी धर्मांमध्ये, जातींमध्ये विभाजन करायचं आहे असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- Devendra Fadnavis : “महायुतीसमोरची एकमेव समस्या म्हणजे ‘व्होट जिहाद’ कारण..”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य

३० हून अशा संघटना आहेत ज्यांच्यामुळे आम्हाला सहकार्य मिळालं

RSS ने थेट आमच्यासाठी काही केलं नाही. मात्र ३० हून अशा संघटना आहेत ज्या संघाची विचारधारांवर चालतात. त्यांना राजकारणात येण्याची गरज नाही. त्यांनी लोकांना हेदेखील सांगितलं नाही की भाजपाला मतदान करा. पण त्यांनी उजव्या विचारसरणीच्या लोकांना उत्तर देण्याचं काम केलं. त्यामुळे चुकीच्या नरेटिव्हशी लढण्यात आम्हाला नक्कीच फायदा झाला असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले.

बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है यात गैर काय?

निवडणुकीच्या तोंडावर बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है या घोषणा देण्यात आल्या त्यावर टीका होते आहे. याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “एक है तो सेफ है असेल किंवा बटेंगे तो कटेंगे असेल या घोषणांमध्ये चुकीचं काय आहे? लोकसभा निवडणुकीत व्होट जिहाद झाला. धुळ्यासारख्या मतदारसंघात आम्ही १.९ लाख मतांनी पुढे होतो. या मतदारसंघातल्या फक्त मालेगाव या ठिकाणी ४ हजार मतांनी आम्ही मागे पडलो आणि आमचा पराभव झाला. अशा पद्धतीने इतर ११ मतदारसंघातही गोष्टी घडल्या. मुस्लिम मतं इतक्या मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीला मिळाली. कारण मुस्लिम धर्मगुरुंनी धर्मस्थळांवर पोस्टर लावले होते, तसंच मविआला मतदान न करणं ही अल्लाशी बेईमानी आहे हे सांगण्यात आलं. हा व्होट जिहादच नाही का? आम्ही काय म्हणत आहोत. एक राहा, कारण जेव्हा जेव्हा विभाजन झालं आहे आपल्याला गुलामीचं संकट सहन करावं लागलं आहे. फोडा आणि राज्य करा ही काँग्रेसची नीती आहे. त्यामुळे हिंदूंमध्ये वाद घडवले जात आहेत. जातींमध्ये भांडणं लावली जात आहेत. अशा परिस्थितीत आम्ही जर बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है सारखे नारे दिले तर त्यात चुकीचं काय? या दोन्ही घोषणा सकारात्मक आहेत.” असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे.