मुख्यमंत्रीपदावरून राष्ट्रवादीकडून गेले दोन आठवडे सातत्याने संभ्रम निर्माण केला जात असतानाच मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हेच कायम राहतील, असा निर्वाळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने शिंदे गटातील अस्वस्थता दूर झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार यांच्या बंडानंतर गेले दोन आठवडे सतत मुख्यमंत्रीपदावरून उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. महायुतीत संशयाचे वातावरण तयार करण्याकरिता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा सुरू केली होती. त्यातच राष्ट्रवादीचे मुंबईपासून गल्लीतील नेते अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार, असे चित्र रंगवू लागले होते. अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा फलकांवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांना नवी दिल्लीत भेट दिल्यावर ही निरोपाची भेट होती, अशी चर्चा ठाकरे गटाकडून सुरू करण्यात आली होती.

हेही वाचा – जयंत पाटील विरोधी गटाला भाजपची ताकद ?

हेही वाचा – नगर महापालिकेची निवडणूक तरी मुदतीत होणार का?

शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदावरून संशय निर्माण करण्यात आल्याने शिंदे गटाचे आमदार व नेतेमंडळींमध्ये अस्वस्थता पसरली होती. विधिमंडळात आमदारांमध्ये गटागटाने हीच चर्चा सुरू होती. शिंदे यांना हटवून अजित पवार मुख्यमंत्री झाल्यास आपले काय, असा प्रश्न आमदारांना पडला होता. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील, असा निर्वाळा फडण‌वीस यांनी दिल्याने शिंदे गटातील धाकधूक दूर झाली. महायुतीतील सर्वात मोठ्या पक्षाचा नेता म्हणून आपण ही घोषणा करीत असल्याचे फडण‌वीस यांनी जाहीर केले. फडणवीस यांच्या या कृतीतून शिंदे गटातील अस्वस्थता दूर झाली तर राष्ट्रवादीमधील उत्साही नेत्यांना चपराक बसली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis said eknath shinde will continue as cm and the restlessness of the shinde group has been removed print politics news ssb
Show comments