मुंबई : टाटा एअरबससह काही प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळातच राज्याबाहेर गेले आहेत. ‘बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप’ सरकार सत्तेवर आल्यानंतर एकही प्रकल्प राज्याबाहेर गेलेला नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना मंगळवारी येथे केले.

काही ‘एचएमव्ही’ पत्रकार आणि राजकारणी मिळून ‘अपप्रचार (फेक नरेटिव्ह)’ सिंडीकेट चालवित आहेत आणि त्यातून महाराष्ट्राची बदनामी केली जात आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला. जयराम रमेश आणि शरद पवार यांनी केलेले आरोप निखालस खोटे असून ‘या वयात एवढे खोटे बोलायचे नसते,’ असा टोला फडणवीस यांनी लगावला.

हेही वाचा ; आपटीबार: काका-पुतण्याचे प्रेम!

उद्याोगपती रतन टाटा हे टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातच सुरू करणार होते. पण भाजप आणि राज्य सरकारने हे प्रकल्प गुजरातमध्ये नेल्याचा आरोप पवार आणि रमेश यांनीही केला आहे. त्याला फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. ज्यांच्या कार्यकाळात गुजरात व कर्नाटक औद्याोगिक गुंतवणुकीत प्रथम क्रमांकावर होते, ते नेते आज महाराष्ट्र देशात औद्याोगिक गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर गेल्याने अधिक अस्वस्थ झाले आहेत. त्यांचा अपप्रचार सुरू असल्याने राज्यापुढे वास्तव मांडत असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. प्रत्येक प्रकल्पनिहाय तारखा आणि त्यासंदर्भातील बातम्यांची कात्रणे फडणवीस यांनी पत्रकारांपुढे सादर केली.

हेही वाचा ; घर फोडण्याचे पाप कधी केले नाही! अजित पवारांच्या आरोपाला शरद पवारांचे उत्तर

विरोधकांकडून महाराष्ट्राची बदनामी

महायुती सरकारच्या कार्यकाळात एकही प्रकल्प राज्याबाहेर गेलाच नाही, उलट राज्यात २५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. राज्यात उद्याोगवाढ आणि रोजगारनिर्मितीसाठी नवे सरकार पूर्ण प्रयत्न करेल आणि राज्याला उद्याोगात पहिल्या क्रमांकावर नेईल. विरोधकांनी महाराष्ट्राची बदनामी करू नये, ते राज्यहिताचे नाही, असे फडणवीस म्हणाले.