Shiv Sena On Guardian Ministership : स्वित्झर्लंडमधील दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात नवे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करत असताना, इकडे राज्यात पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांवरून महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील ४२ मंत्र्यांपैकी फडणवीस यांच्यासह १९ मंत्री भाजपाचे आहेत. या सर्व मंत्र्यांना विविध जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद मिळाले आहे. पण, दुसरीकडे शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) भरत गोगावले, दादा भुसे आणि योगेश कदम व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (अजित पवार) धनंजय मुंडे आणि इंद्रनील नाईक यांना पालकमंत्रीपदाची संधी मिळालेली नाही. यामुळे महायुतीतील समीकरणे बिघडली आहेत. या सर्व घडामोडींमुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांना स्थगिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नाशिकवरून वाद

भाजपाचे ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन यांना नाशिकचे पालकमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले होते, परंतु यामुळे नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक दादा भुसे नाराज झाले आहेत. दादा भुसे हे एकनाथ शिंदे यांचे जवळचे मानले जातात.

दुसरीकडे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी, “नाशिकचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळायला हवे होते”, असे म्हटले आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार आहेत.

भुजबळांच्या या मताशी त्यांच्या पक्षाचे मंत्री माणिकराव कोकाटे सहमती दर्शवली आहे. ते म्हणाले की, “जिल्ह्यात पक्षाचे सर्वाधिक आमदार असल्याने नाशिकचे पालकमंत्रीपद त्यांना मिळायला हवे.” नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांपैकी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) दोन, भाजपाचे पाच, राष्ट्रवादीचे (अजित पवार) सात आणि एआयएमआयएमचा एक आमदार आहे.

२०२७ मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा भरणार असल्याने सत्ताधारी महायुतीतील तीन पक्षांमध्ये पालकमंत्रीपदासाठी संघर्ष होत असल्याच्या चर्चा आहेत. नाशिकमध्ये विविध विकास कामांसाठी १,१०० कोटी रुपयांची योजना आहे. यामध्ये पायाभूत सुविधा, निवास व्यवस्था आणि इतर संबंधित प्रकल्पांचा समावेश आहे. कुंभ मेळ्याच्या नियोजनात पालकमंत्र्यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या कार्यक्रमाचे राजकीय परिणाम लक्षात घेऊन, शिवसेनेने (एकनाथ शिंदे) महाजन यांच्या नियुक्तीला विरोध केला आहे. भाजपाचे राज्यातील अनुभवी आणि प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले महाजन हे नाशिकमध्ये पक्षाचा चेहरा आहेत.

रायगडचा वाद

दुसरीकडे रायगडमध्ये पालकमंत्रीपदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वाद आहेत. सरकारने राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना पालकमंत्री म्हणून नियुक्त केले आहे. परंतु, शिवसनेनेचे मंत्री गोगावले यांनी वरिष्ठ कॅबिनेट मंत्री म्हणून पालकमंत्रीपदावर दावा ठोकला आहे.

राजयगड जिल्ह्यात महायुतीचे ८ आमदार आहेत. यामध्ये भाजपाचे सर्वाधिक, शिवसेनेचे तीन आणि राष्ट्रवादीचा एक आमदार आहे. दरम्यान महायुती सरकारच्या विकासाचा केंद्रबिंदू रायगड आहे, जिल्ह्य़ात ७,३६० कोटी रुपयांचे बल्क ड्रग पार्क आणि बंदर असे मोठे प्रकल्प देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. याचबरोबर प्रस्तावित दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरचा रायगड हे एक प्रमुख केंद्र असणार आहे. त्यामुळे इथे पालमंत्रीपदासाठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

हा मुख्यमंत्र्यांचा विशेषाधिकार…

या सर्व घडामोडींनंतर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार म्हणाले, “पालकमंत्री ठरवणे हा मुख्यमंत्र्यांचा विशेषाधिकार आहे.” वाटाघाटींदरम्यान, पवार यांना पुणे आणि बीड जिल्ह्यांचे पालकत्व मिळवण्यात यश आले. यावेळी त्यांनी बीडमधील विविध घटनांमुळे टीका होत असलेल्या धनंजय मुंडे यांच्या जागी पालकमंत्रीपदाची जबाबदारी घेतली आहे. बीडच्या मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी संबंधित खंडणी प्रकरणात मुंडे यांचे सहकारी वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आल्यापासून मुंडे यांच्यावर टीका होत आहे.

शिवसेना, भाजपाची भूमिका

ओळख उघड न करण्याच्या अटीवर शिवसेनेच्या एका मंत्र्याने सांगितले की, “सर्वाधिक मंत्री असलेल्या भाजपाने आपल्या मित्रपक्षांना सामावून घेण्यासाठी मन मोठे करायला पाहिजे होते. गोगावले यांना संधी देण्यासाठी आदिती तटकरे यांना दुसऱ्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देता आले असते. याचप्रमाणे दादा भुसे यांच्यासाठी गिरीश महाजन यांना दुसऱ्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद द्यायला हवे होते.”

दरम्यान शिसेनेना मंत्र्याच्या या युक्तीवादाला भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने उत्तर दिले. ते म्हणाले की, “पालकमंत्र्यांची निवड विकासासाठी केली जाते. ही पक्षीय राजकारण करण्याची जागा नाही.”

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “कोणत्याही आघाडी सरकारमध्ये, घेतलेले सर्व निर्णय सामूहिक असतात. पालकमंत्र्यांची नियुक्ती ही जिल्ह्याच्या विकासाला लक्षात घेऊन केलेली व्यवस्था असते. जर शिवसेना आणि राष्ट्रवादीने काही मुद्दे उपस्थित केले असतील तर त्यावर मुख्यमंत्री एकत्रितपणे चर्चा करून त्यांचे निराकरण करतील.”