मुंबई : Devendra Fadnavis Maharashtra CM Oath Ceremony Updates ‘मी पुन्हा येईन,’ अशी घोषणा २०१९ मध्ये केल्यानंतर मुख्यमंत्रीपद हुकलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची गुरुवारी तिसऱ्यांदा शपथ घेतली आणि आपला शब्द खरा करून दाखविला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व बहुमत मिळवून फडणवीस हे अखेर पुन्हा मुख्यमंत्रीपदी आरूढ झाले. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे व अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची गुरुवारी शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आझाद मैदानावर सायंकाळी साडेपाच वाजता शपथविधीचा दिमाखदार व आटोपशीर सोहळा पार पडला.
● फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची ईश्वराला साक्षी ठेवून शपथ घेतली. फडणवीस यांचे नाव शपथविधीसाठी पुकारताच एकच जल्लोष करण्यात आला आणि त्यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या, टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना सर्व मान्यवरांनी यशस्वी कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
● एकनाथ शिंदे यांनी शपथ घेण्यापूर्वी ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन, धर्मवीर आनंद दिघे यांचे स्मरण, देशाचे कर्तबगार व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कणखर गृहमंत्री अमित शहा यांचा पाठिंबा व आशीर्वादाने’ मी शपथ घेत असल्याचा उल्लेख शिंदे यांनी केला. त्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला व कार्यकर्त्यांनी घोषणाही दिल्या.
● अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची गांभीर्यपूर्वक शपथ घेतली. त्यानंतर उपस्थितांनी जल्लोष केला. अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन विक्रम केला.
हेही वाचा >>> Eknath Shinde : महायुतीच्या जहाजाला गती देणाऱ्या एकनाथ शिंदेंपुढे आता उपमुख्यमंत्री म्हणून कुठली आव्हानं
नेतेमंडळींकडून शुभेच्छा
● शपथविधी समारंभास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, शिवराजसिंह चौहान, निर्मला सीतारामन, पीयूष गोयल, भूपेंद्र यादव, ज्योतिरादित्य शिंदे, चिराग पासवान, रामदास आठवले, आदी मंत्री उपस्थित होते.
● भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांसह पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
● विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली. त्यात उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ, बिहारचे नितीशकुमार, आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू, आसामचे हेमंत बिश्व सरमा, उत्तराखंडचे पुष्कर धामी, राजस्थानचे भजनलाल शर्मा आदींचा समावेश होता.
विविध क्षेत्रांतील मान्यवर…
● शपथविधी समारंभाला उद्याोजक, चित्रपट, कला, क्रीडा आदी क्षेत्रांतील विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
● सलमान खान, शाहरूख खान, संजय दत्त, जय कोटक, एकता कपूर, जान्हवी कपूर, विद्या बालन, सिद्धार्थ कपूर, वरुण धवन, माधुरी दीक्षित, श्रीराम नेने, रणबीर कपूर, रणवीर सिंह, राजेश अदानी, रोहित शेट्टी, अर्जुन कपूर, सतीश मेहता, बोनी कपूर, श्रद्धा कपूर, जयेश शाह, खुशी कपूर, रूपाली गांगुली आदी सिनेकलाकार उपस्थित होते.
● उद्याोगपती मुकेश अंबानी, अनिल अंबानी, अनंत अंबानी, कुमारमंगलम बिर्ला, नोएल टाटा आदी उपस्थित होते.
● क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता यांचीही उपस्थिती होती.
सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साह
शपथविधी सोहळ्याच्या मुख्य व्यासपीठाच्या बाजूला असलेल्या व्यासपीठावर सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रमांची सुरुवातच प्रसिद्ध गायक कैलास खैर यांच्या जय श्रीराम गीताने झाली. उपस्थितांनीही प्रतिसाद देत जय श्रीरामच्या घोषणा दिल्यामुळे मैदान दणाणून गेले. खेर यांच्या नंतर अजय- अतुल यांच्या ‘शेर शिवराज है’, ‘मल्हार वारी मोतियानी द्यावी भरून’ आणि ‘लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा’, या गीतांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘महाराष्ट्र में भगवा लहराएगें…’
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अखेरीस जो राम को लाए, हम उनको लाएंगे. महाराष्ट्र में भगवा लहराएगें, या गाण्याचे सादरीकरण झाले. या सादरीकरणाला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हे गीत सुरू असतानाच आमचे भाऊ, देवाभाऊ, देवाभाऊंचा विजय असो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विजय असो, अशा घोषणा उपस्थितांनी दिल्या.
नरेंद्र मोदी, अमित शहा, योगींना जोरदार प्रतिसाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे व्यासपीठावर आगमन होताच उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी केली. मैदानावर लावलेल्या एलईडी स्क्रीनवर मोदी, शहा आणि योगींचे चेहरे दिसताच उपस्थितांमधून जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा उत्स्फूर्तपणे दिल्या जात होत्या. शहा, योगींच्या आगमनानंतर मैदानावरही उत्साह संचारला होता.
असह्य उकाड्यामुळे हैराण
मुंबईतील तापमानात उकाडा गुरुवारी जाणवत होता. शपथविधी सोहळ्याला या उकाड्याचा परिणाम जाणवला. शामीयानात पंख्यांची व्यवस्था करण्यात आली नव्हती. यामुळे उपस्थितांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागला. प्रवेशिकांचा वारा घेण्यासाठी वापर केला जात होता. भाजपच्या वतीने शपथविधी समारंभाचे मोठ्या प्रमाणावर प्रवेश पासचे वितरण करण्यात आले होते. त्यावर कोणत्या प्रवेशद्वारातून प्रवेश करावयाचा आहे, याचाही उल्लेख होता. प्रत्यक्षात मैदानावर आलेल्या सर्व लोकांना प्रवेश पासची विचारणा न करताच कोणत्याही प्रवेशद्वारे प्रवेश दिला जात होता. त्यामुळे सर्वच प्रवेशद्वारावर गर्दी झाली होती.
निमंत्रितांना मुदत संपलेले गुजरातचे पाणी
शपथविधी सोहळ्याला उपस्थित निमंत्रितांना राजकोट येथील ‘मॅनिफेस्ट द चेंज’ या ट्रेट्रापॅक कंपनीच्या पाण्याच्या बाटल्या वितरित करण्यात आल्या. या अर्धा लिटर पाण्याच्या बाटलीची किंमत ६९ रुपये होती. विशेष म्हणजे हे टेट्रापॅक ५ एप्रिल २०२२ मध्ये पॅक केले असून १९ ऑक्टोबर २०२४ ला त्याची मुदत संपली होती. त्यामुळे निमंत्रितांनी संताप व्यक्त केला. काही जणांनी ही बाब आयोजकांच्या निदर्शनास आणून दिली.