संतोष प्रधान
बिहार विधान परिषदेच्या सभापतीपदी नुकतीच निवड झालेले देवेशचंद्र ठाकूर हे अस्खलित मराठी बोलणारे आहेत. अनेक वर्षे मुंबईत वास्तव्य तसेच पुणे आणि नाशिकमध्ये शिक्षण झालेले ठाकूर मूळचे बिहारी असले तरी त्यांच्यावर मराठीचा पगडा आहे.
बिहार विधान परिषदेच्या गेल्याच आठवड्यात झालेल्या सभापतीपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी जनता दलाचे (यू) देवेशचंद्र ठाकूर यांची बिनविरोध निवड झाली. ठाकूर गेली २० वर्षे बिहार विधान परिषदेचे आमदार आहेत. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्यांच्यावर ही मोठी जाबदारी सोपविली आहे.
देवेश ठाकूर यांचा जन्म बिहारमधील सीतामढी व शालेय शिक्षण हजारीबागमध्ये झाले. पुढे नाशिकच्या सैनिकी शाळेत त्यांनी प्रवेश घेतला होता. पदवीपर्यंतचे शिक्षण हे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून झाले. कायद्याची पदवी त्यांनी पुण्याच्याच प्रसिद्ध ‘आयएलएस’ महाविद्यालयातून घेतली होती. पुण्यात शिक्षण घेत असताना त्यांनी पुणे विद्यापीठाची निवडणूकही लढविली होती. पुण्यात शिक्षण घेत असतानाच त्यांची माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी मैत्री झाली. राज्याच्या राजकीय वर्तुळात तसेच मंत्रालयात ठाकूर हे विलासरावांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात असत. मुंबईत त्यांचे वास्तव्य कुलाब्यात आहे. प्रदेश युवक काँग्रेसचे ते काही वर्षे उपाध्यक्ष होते.
हेही वाचा… अकोला राष्ट्रवादीत खदखद; मिटकरींच्या अडचणी वाढल्या
राज्याच्या राजकारणात पद भूषविण्याची त्यांची इच्छा काही पूर्ण झाली नाही. १९९०च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस उमेदवार म्हणून बिहारमधून निवडणूक लढविली पण त्यात त्यांचा पराभव झाला. विलासरावांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मंत्रालयात देवेश ठाकूर यांचा चांगलाच दबदबा होता. राजकीय महत्त्वाकांक्षा राज्यात पूर्ण होत नसल्याने ठाकूर यांनी बिहार गाठले.
बिहार विधान परिषदेच्या तिरहत पदवीधर मतदारसंघातून २००२ मध्ये ठाकूर हे अपक्ष म्हणून निवडून आले. अनेक वर्षे मुंबईत वास्तव्य करूनही ठाकूर यांनी अपक्ष निवडणूक लढवून यश संपादन केले. २००८ मध्ये नितीशकुमार यांच्या जनता दल (यू) च्या वतीने पुन्हा ते निवडून आले. २०१४ मध्ये अपक्ष तर २०२० मध्ये जनता दलाच्या वतीने निवडून आले. जनता दलाचे (यू) प्रवक्ते म्हणून पक्षाची भूमिका मांडत असत. आतापर्यंत चार वेळा तिरहत पदवीधर मतदारसंघातून विजयी झालेल्या ६९ वर्षीय ठाकूर यांची गेल्याच आठवड्यात विधान परिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली.
हेही वाचा… मुरलीधर मोहोळ प्रदेश पातळीवरील राजकारणात ? नेता प्रवास योजना समितीमधील समावेशामुळे चर्चा
पुण्यात शिक्षण आणि मुंबईत वास्तव्य असल्याने बिहारी असलो तरी मराठी चांगले बोलू वा लिहू शकतो. आपल्याला हिंदीबरोबरच इंग्रजी, मराठी, मैथिली, बंगाली या भाषा चांगल्या येतात. अजूनही आपल्यावर मराठीचा पगडा आहे. महाराष्ट्र आणि बिहारमधील संबंध अधिक दृढ करण्याचा आपला प्रयत्न राहिल. – देवेशचंद्र ठाकूर, सभापती, बिहार विधान परिषद