नागपूर: राजकीय जीवनात अडचणीच्या वेळी मदत करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची साथ सोडून अहेरीचे राष्ट्रवादीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी अजित पवार यांची साथ देत शिंदे-भाजप मंत्रिमंडळात स्थान मिळवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुसरीकडे शिंदे-फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड खाणीला आदिवासींचा विरोध असूनही आत्राम यांनी यासंदर्भात नरमाईची भूमिका घेतली होती. यामुळे ते पालकमंत्री व गृहमंत्री फडणवीस यांच्याजवळ गेले होते हे येथे उल्लेखनीय. विदर्भातील आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मतदारसंघाचे धर्मराव बाबा आत्राम आमदार आहेत. काँग्रेस ते राष्ट्रवादी असता त्यांचा राजकीय प्रवास आहे. ते चौथ्यांदा मंत्री झाले आहेत. आत्राम यांना त्यांच्या राजकीय जीवनात अनेक अडचणींच्या वेळी शरद पवार यांनी मदत केली होती. १९९१ मध्ये आत्राम यांचे नक्षलवाद्यांनी अपहरण केले होते. पवार यांच्या प्रयत्नानेच त्यांची नक्षल बंदिवासातून सुटका झाली होती.

हेही वाचा… देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत रवानगी?

वनमंत्री असतानाच आत्राम हे पुणे जिल्ह्यातील काळविट शिकार प्रकरणात अडकले होते. या प्रकरणात त्यांना अटकही झाली होती. यातूनही त्यांची पवार यांनीच सुटका केली होती. गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड प्रकल्प आदिवासी व नक्षलवाद्यांच्या विरोधामुळे अनेक वर्षांपासून बंद होता. राज्यात शिंदे -फडणवीस सरकार आल्यावर हा प्रकल्प सुरू करण्यात आला. आत्राम यांनी विरोधी पक्षाचे आमदार असूनही त्यांनी प्रकल्पाला पूरक भूमिका घेतली होती.

हेही वाचा… छगन भुजबळ यांचे आणखी एक बंड

पक्षात अजित पवार यांनी त्यांचा स्वतंत्र गट तयार करण्यास सुरूवात केली तेव्हा ते या गटात सहभागी झाले. यापूर्वीही पवार भाजपमध्ये जाणार व त्यांच्यासोबत अनेक आमदार जाणार अशी चर्चा सुरू होती त्यावेळीही आत्राम याचे नाव आले होते. रविवारी राजकीय भूकंपाच्यावेळी आत्राम यांनी पवार यांची साथ सोडून अजित पवार यांची साथ धरली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dharmaraobaba atram left support of sharad pawar who helped in the crisis and joined hand with ajit pawar print politics news asj
Show comments