धुळे – जिल्ह्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) स्वपक्षीय नाराज पदाधिकाऱ्यांमुळे त्रस्त झाली असून पक्षाच्या महेश मिस्तरी आणि हिलाल माळी या सहसंपर्कप्रमुखांनी राजीनामे दिले आहेत. कित्येक वर्षांपासून उद्धव ठाकरे यांना साथ देणाऱ्या माळी आणि मिस्तरी यांच्याबरोबर अनेक शिवसैनिक ठाकरे गटातून बाहेर पडल्याने याचा फटका धुळे शहर आणि धुळे ग्रामीण या मतदारसंघात महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे.

धुळे शहर मतदारसंघातून ठाकरे गटाशी कोणताही संबंध नसताना ऐनवेळी अनिल गोटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने ३९ वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत महेश मिस्तरी यांनी ठाकरे गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ठाकरे गटाने त्यांच्यावर धुळे आणि साक्री या तालुक्यांचे सहसंपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी सोपवलेली होती. धुळे शहर मतदारसंघातून उमेदवारीसाठी मिस्तरी हे इच्छुक होते. परंतु, त्यांना डावलून गोटे यांना उमेदवारी देण्यात आल्याने संतप्त मिस्तरी यांनी थेट पक्षातून बाहेर पडून बंड करण्याचा निर्णय घेतला.

Congress Candidate 2nd List
Congress Candidate 2nd List: मोठी बातमी! काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; कोणाला मिळाली संधी?
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024: ‘राज ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंसाठी सभा घेतली, पण माझ्याविरोधात…’, अमित ठाकरेंचं सूचक विधान
uddhav thackeray
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! मित्रपक्षाने युती तोडली, विधानसभेला स्वबळाचा नारा
uddhav thackeray eknath shinde (3)
MLA Nitin Deshmukh : “मला इंजेक्शन देऊन सुरतला नेलं, हृदयविकाराच्या झटक्याची बातमी…”, ठाकरेंच्या आमदारांचा मोठा गौप्यस्फोट
Suraj Chavan Said This Thing About His X Girl Friend
Suraj Chavan : ‘एक्स गर्लफ्रेंड परत आली तर स्वीकारणार का?’, सूरज चव्हाण म्हणाला, “बच्चाला आता…”
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची चौथी यादी जाहीर, अनिल देशमुखांच्या जागी लेकाला उमेदवारी!
Bigg Boss Marathi Winner Suraj Chavan
Bigg Boss Marathi Winner : ‘गुलीगत धोका’ म्हणत सूरज चव्हाण ठरला पाचव्या पर्वाचा महाविजेता!

हेही वाचा – पश्चिममध्ये ठाकरे विरुद्ध आता दक्षिणचे पुन्हा ‘सुधाकर’

हेही वाचा – आर्णी व उमरखेडमध्ये भाजपकडून विद्यमान आमदारांना डच्चू; रिपाईं (आ)चेही स्वप्न भंगले

मिस्तरी यांच्यानंतर धुळे तालुका सहसंपर्कप्रमुख पदाची जबाबदारी असलेले माजी नगराध्यक्ष हिलाल माळी यांनीही ठाकरे गटाचा राजीनामा दिला आहे. माळी हे ३५ वर्षांपासून शिवसैनिक म्हणून कार्यरत होते. धुळे ग्रामीण मतदारसंघातून ते अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहेत. २०१९ च्या निवडणुकीत धुळे ग्रामीणची जागा भाजपला गेल्याने धुळे शहर मतदारसंघातून माळी यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली होती. परंतु, युतीचा उमेदवार असतानाही भाजपकडून अपक्ष उमेदवारास मदत करण्यात आली. त्याचा माळी यांना फटका बसल्याने त्यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीत धुळे ग्रामीणमधून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा माळी हे बाळगून होते. परंतु, जागावाटपात धुळे ग्रामीण मतदारसंघ पुन्हा एकदा काँग्रेसला गेल्याने माळी यांनी नाराजी व्यक्त करुन ठाकरे गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. धुळे ग्रामीणमधून ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. धुळे शहर आणि धुळे ग्रामीण या दोन्ही मतदारसंघात ठाकरे गटाच्या दोन कट्टर निष्ठावंतांनी बंड करण्याचा निर्णय घेतल्याने महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. मविआकडून धुळे शहर मतदारसंघातून ठाकरे गटाचे अनिल गोटे तर, धुळे ग्रामीणमध्ये काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील हे उमेदवार आहेत.