नव्या वर्षात INDIA आघाडीतील मतभेदही चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. खरं तर गेल्या काही दिवसांपूर्वीच रद्द करण्यात आलेल्या दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ED) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कधीही अटक करू शकते, या आम आदमी पक्षाच्या (AAP) भीतीवर काँग्रेस आणि बहुतेक इंडिया आघाडीतील विरोधी पक्षांनी मौन बाळगणं पसंत केलं आहे. दुसरीकडे मनी लाँड्रिंग प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने वारंवार पाठवलेले समन्स आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या (JMM) आमदाराने अचानक दिलेला राजीनामा यामुळे हेमंत सोरेनही राजीनामा देऊन त्यांची पत्नी कल्पना सोरेन यांना उत्ताराधिकारी घोषित करण्याची योजना आखत आहेत, असा भाजपने दावा केला आहे.

JD(U) काँग्रेसलाच घरचा आहेर दिला आहे. युतीची “वेळ आणि कल्पना संपत चालल्या आहेत”, असं जेडीयूचे ज्येष्ठ नेते के. सी. त्यागी म्हणालेत. जुन्या पक्षाला दोलायमान स्थितीत ‘इंडिया’च्या परवानगीची गरज दाखवावी लागणार आहे. तसेच त्यांनी स्वतःहून भारत जोडो यात्रेची घोषणा करायला नको होती, असंही जेडीयूचं म्हणणं आहे. त्यामुळे इंडियाचं राजकारण एका वेगळ्याच टप्प्यावर जाऊन पोहोचले असल्याचं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

Yogendra Yadav, Bharat Jodo Andolan,
‘भारत जोडो’ आंदोलनातील सहभागी शहरी नक्षलवादी संघटनांची नावे जाहीर करा, योगेंद्र यादव यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
Sharad Pawar claims that the grand alliance plans are possible but people want change print politics news
महायुतीच्या योजनांचा परिणाम शक्य पण लोकांना बदल हवाच! शरद पवार यांचा दावा
Ramesh Chennithala
Ramesh Chennithala : “हरियाणाच्या निवडणुकीतून खूप शिकायला मिळालं, त्यामुळे ८० टक्के बंडखोरांनी…”, रमेश चेन्निथला यांचं महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत मोठं भाष्य
pm narendra modi criticized congress
PM Narendra Modi : “महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाक, ना ब्रेक, चालकाच्या सीटसाठीही…”; धुळ्यातील सभेतून पंतप्रधान मोदींचे टीकास्र!
rahul gandhi replied to devendra fadnavis
“लाल संविधान दाखवून शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देतात” म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना राहुल गांधींचं प्रत्युत्तर; म्हणाले…
Pathri Constituency, Suresh Warpudkar,
बंडखोरीवरून वरपूडकर- बाबाजानी यांच्यात कलगीतुरा

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना इंडिया आघाडीचे निमंत्रक आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याबाबत इंडियातील विरोधी पक्षांच्या गटात चर्चा सुरू असल्याचे जेडी(यू) ने गेल्या आठवड्यात चतुराईने सांगितले. परंतु काँग्रेसने हे वृत्त फेटाळून लावले. काँग्रेस पक्षातील सूत्रांनीच खरगेंना इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदात रस नाही किंवा त्यासाठी दावाही केला जात नसल्याचं सांगितलं आहे. विशेष म्हणजे त्यावेळी इतर पक्ष शांत होते. सध्या इंडिया आघाडीवरून JD(U) वर दबाव वाढत असल्याचे समजतेय. खरं तर तृणमूल काँग्रेस (TMC) खरगे यांना अध्यक्ष तर सोडाच, नितीन कुमार यांना निमंत्रक बनवण्यासही फार उत्साही दिसत नाही. दुसरीकडे इतर पक्षांमध्ये एकमत झाल्यास नितीश कुमार यांना निमंत्रक बनवण्याच्या कल्पनेला काँग्रेसचा विरोध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

२२ जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटनासाठी निमंत्रण मिळाल्याचे काँग्रेसचे खरगे आणि पक्षाचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी मान्य केलंय, परंतु ते उपस्थित राहणार की नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहे. काँग्रेसमध्येच आमंत्रण स्वीकारणे किंवा नाकारणे यावर दोन गटांत मतभेद असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील २३ जागांवर शिवसेनेने उघड उघड दावा केला आहे. तर पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या इंडियातील वाढत्या दरीवरही काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्वही मौन बाळगून आहे. खरं तर जागा वाटपाची चर्चा प्रसारमाध्यमांद्वारे नव्हे, तर बंद दाराआड होईल, असं सांगितलं जात आहे. कदाचित जागावाटपाच्या त्रासदायक मुद्द्यावर इंडिया आघाडीतील पक्षांना समन्वयाने घ्यावे लागणार आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीसाठी गुजरातमधील भरूच मतदारसंघातून आपला उमेदवार जाहीर केला आहे. एका सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, आम आदमी पक्षाचे आमदार चैत्रा वसावा भरूच लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. ही घोषणा अशा वेळी झाली आहे, जेव्हा इंडिया आघाडीतील जागांचे वाटपही झालेले नाही. दुसरीकडे अरुणाचल पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी JD(U) ने त्यांच्या उमेदवाराची घोषणा केली आहे. या सर्व परिस्थितीत इंडियामध्ये जागावाटपाची चर्चा सुरू झाली आहे. इंडिया आघाडीतील काँग्रेसच्या पॅनेल सदस्यांनी राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि AAP च्या नेत्यांची औपचारिक भेट घेतली आणि राहुल गांधींच्या दुसऱ्या यात्रेसाठी काँग्रेस पक्ष दिवसरात्र काम करीत असल्याचं सांगितलं. परंतु यात्रेमुळेच इंडिया आघाडीतील मतभेद आणखी चव्हाट्यावर येऊ शकतात.

हेही वाचाः ईडीचा ससेमिरा, शरद पवारांचे नातू अन् राष्ट्रवादीचे उदयोन्मुख स्टार; कोण आहेत रोहित पवार?

ममता बॅनर्जी काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेत सामील होतील का? हा प्रश्न बंगालला ओलांडताना राहुल गांधींना नक्कीच विचारात घ्यावा लागेल. तसेच ही यात्रा बिहार आणि उत्तर प्रदेशातून जात असताना नितीश कुमार आणि अखिलेश यादव हेसुद्धा यात्रेत सहभागी होतील का याबाबत साशंकता आहे? ही यात्रा इंडिया यात्रा असायला हवी होती, ज्यात आघाडीचे सर्व नेते सहभागी होऊ शकले असते, असंही आता इंडिया आघाडीतील नेते खासगीत म्हणत आहेत. काँग्रेसने यात्रेची घोषणा करण्यापूर्वी त्यांच्या कोणत्याही मित्रपक्षांशी सल्लामसलत केली नसल्याचंही बोललं जातंय.

हेही वाचाः पांचजन्यमधून गंभीर आरोप; तरीही अयोध्या कार्यक्रमासाठी मूर्तींना विशेष आमंत्रण, कारण काय? 

राम मंदिर उघडल्यानंतर लवकरच लोकसभेच्या निवडणुका जाहीर केल्या जातील आणि त्यानंतर संसदेचे छोटे बजेट अधिवेशनही बोलावले जाईल, असा काही विरोधी पक्षांचा विश्वास आहे. विरोधक जागा वाटपाच्या बाबतीत किंवा अजेंडा तयार करण्याच्या बाबतीत तयार नसल्याचं समजतंय. हिंदी भाषक राज्यातील पक्ष राम मंदिराच्या उद्घाटनाच्या राजकीय आणि निवडणूक परिणामांबद्दल घाबरलेले दिसतात, परंतु भाजपच्या हिंदुत्वाचा धक्का कमी करण्यासाठी ते स्पष्टपणे धडपडत आहेत. राहुल गांधींच्या यात्रेमुळे बेरोजगारी आणि महागाई यांसारख्या मुद्द्यांवर आवाज उठवण्यास मदत होणार आहे, परंतु इंडियातील इतर पक्ष आणि नेत्यांना त्याची खात्री नाही. जागावाटपाच्या चर्चेचा परिणाम लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी करत असलेल्या संयुक्त प्रचार कार्यक्रमांवर ठरणार असल्याचं आता जवळपास बोललं जातंय.