मध्यप्रदेशमध्ये यावर्षी विधानभा निवडणूक होणार असून ही निवडणूक काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा कमलनाथ यांच्या नेतृत्वात लढणार असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे. भोपाळमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं. त्यामुळे आगामी निवडणुकीत कमलनाथ हे पुन्हा काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दरम्यान, काँग्रेसने या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून मध्यप्रदेशमध्ये काँग्रेस विजयी होईल, विश्वासही दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “भारतामुळे अमेरिकेसह यूके आणि फ्रान्समध्ये रोजगार निर्माण होईल,” रविशंकर प्रसाद यांचं विधान!

या वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेशात विधानसभेच्या २३० जागांसाठी निवडणूक होणार आहे. २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ११४ जागांवर विजय मिळवला होता. तर भाजपाने १०९ जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसने कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली सरकारही स्थापन केले. मात्र, मार्च २०२० मध्ये सत्ताधारी पक्षातील आमदारांनी भाजपात प्रवेश केल्याने हे सरकार कोसळले. त्यानंतर भाजपाने शिवराज सिंग चौहान यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा सरकार स्थापन केले.

हेही वाचा – “स्वत:ची परिस्थिती देवेगौडा आणि गुजराल यांच्यासारखी करायची आहे का?” रविशंकर प्रसाद यांचा नितीश कुमारांना खोचक प्रश्न!

विशेष म्हणजे आम आदमी पक्षाने गुजरातप्रमाणे मध्यप्रदेशमध्येही निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष असलेली काँग्रेस जनतेच्या प्रश्नांकडू दुर्लक्ष करून केवळ राजकारण करत असल्याचा आरोप आप नेते संदीप पाठक यांनी केला आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणूक आम आदमी पक्ष लढणार असून आम्ही दिल्ली मॉडेल लोकांसमोर मांडणार असल्याचं ते म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Digvijay singh statement on cm candidate for upcoming mp assembly poll spb