मुंबई : परभणीत दलित वस्त्यांमध्ये पोलीसांनी केलेले अत्याचार तसेच सोमनाथ सूर्यवंशी व विजय वाकोडे या कार्यकर्त्यांच्या मृत्युप्रकरणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे आंबेडकरी समाजातून जोरदार लक्ष्य झाले आहेत. महायुती सरकारविरोधात बोलता येईना आणि ‘रिपाइं’ला राजकीय लाभही मिळेना, अशी त्यांची कोंडी झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
परभणीतील संविधान पुस्तिकेच्या मोडतोडीनंतरच्या आंदोलनामुळे पोलीसांनी दलित वस्त्यांना लक्ष्य केले. आंबेडकरी आंदोलकांची धरपकड केली. घराघरात घुसून महिला, मुली व वृद्धांना मारहाण करण्यात आली. या घटनेत सोमनाथ सूर्यवंशी या कार्यकर्त्याचा कोठडीत तर विजय वाकोडे या नेत्याचा धक्क्याने मृत्यु ओढावला.
हे ही वाचा… अब्दुल सत्तारांच्या सर्वपक्षीय सत्काराकडे महायुतीतील नेत्यांची पाठ
केंद्रात मोदी सरकारमध्ये सामाजिक न्याय राज्यमंत्री असलेल्या रामदास आठवले यांनी १४ तारखेला परभणी भेट दिली. मात्र महायुती सरकारविरोधातला संताप थांबला नाही. दुसरीकडे ‘वंचित’चे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नेटाने प्रकरण लावून धरले. सूर्यवंशीचा मृत्यु पोलीस मारहाणीमुळे झाल्याचे जाहीर आरोप आंबेडकरांनी केले. सूर्यवंशीच्या अंत्ययात्रेत आंबेडकर सहभागी झाले. ‘वंचित बहुजन आघाडी’ने राज्यभर मोर्चे, निर्दशने करत महायुती सरकारचा निषेध केला. काँग्रेस नेते राहूल गांधींनी परभणीला भेट दिली.
प्रकरण गंभीर बनल्याने आठवलेंनी पुन्हा ३० डिसेंबरला परभणीला भेट दिली. सूर्यवंशी कुटुंबिय उपोषणाला बसलेल्या स्थळी भेट दिली. ‘रिपाइं’तर्फे पाच लाखाची मदत जाहीर केली. दरम्यान, केंद्रीय मंत्री अमीत शाह यांनी आंबेडकरांचे नाव घेणे फॅशन झाल्याचे वक्तव्य केले. शाह यांंच्या वक्तव्याने देशभर संतापाची लाट उसळली. वंचित बहुजन आघाडीने मुंबईत ‘सीएसटी’समोर निदर्शने केली. शाह यांच्या वक्तव्याचा आठवले कार्यर्त्यांनी तोंडदेखला निषेध केला.
हे ही वाचा… वर्धा : भाजपसाठी ‘ ५ ‘ तारीख महत्वाची; नेते, पदाधिकारी कामाला लागले
आठवले १९ डिसेंबरला दुबईला निघून गेले. २५ डिसेंबर हा दिवस आंबेडकरी कार्यकर्ते ‘मनुस्मृती दहन दिवस’ पाळतात. हा दिवस महिला मुक्ती दिन असतो. याच दिवशी आठवले यांचा वाढदिवस असतो. यंदा वाढदिवस करु नका, असे कार्यकर्त्यांचे आवाहन होते. आठवले यांनी दुबईतील मरिना समुद्रकिनारी वाढदिवस केला. समाज माध्यमांवर त्याची छायाचित्रे झळकली. आठवले पुन्हा लक्ष्य झाले.
भाजपसोबत गेल्यापासून बौद्ध समाजातून आठवलेंचा जनधार झपाट्याने घटला आहे. या विधानसभेला महायुतीने ‘रिपाइं’ला दोन मतदारसंघ जाहीर केले. प्रत्यक्ष भाजप आणि शिवसेनेनेच (शिंदे) त्या जागा लढवल्या. महायुतीचे सरकार बनले पण ‘रिपाइं’ला मंत्रीमंडळात स्थान नाही. विधान परिषदही नाही. त्यामुळे ‘रिपाइं’मध्ये नाराजी आहे. शेवटी भाजपला वैतागलेल्या आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायचेच नाही, असा निर्णय घेतल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.
मी दोन वेळा परभणीला गेलो. भीमानुयांवर अत्याचार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबीत केले. मी हे प्रकरण गांभीर्याने घेतलेले आहे. पुढील कारवाईसंदर्भात समाजाने थोडी वाट पाहायला हवी. – रामदास आठवले, ‘रिपाइं’ नेते व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री