इंडिया आघाडीच्या मानचिन्हाचे अनावरण आज केले जाणार नाही, असे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत. सर्व पक्षांमध्ये या मानचिन्हावर सहमती होऊ शकली नाही, यामुळेच सविस्तर चर्चा करूनच मग त्याचे अनावरण केले जाईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंडिया आघाडीचे मानचिन्ह तयार करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला होता. इंडिया आघाडीत मतभेद निर्माण झाले आहेत, असे चित्र निर्माण होऊ नये म्हणून काँग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे वा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे खबरदारी घेत आहेत. मानचिन्हावरून रुसवेफुगवे होऊ नयेत यासाठीच अनावरणाची घाई नको, असा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा – भाजपच्या खेळीने ‘इंडिया’ बैठकीचा नूरच पालटला

हेही वाचा – दिल्ली काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी आता अरविंदरसिंग लव्हली यांच्याकडे, ‘आप’शी जुळवून घेण्यासाठी निर्णय?

मानचिन्हात भारताचे प्रतिबिंब उमटावे, असा प्रयत्न आहे. पण काही नेतेमंडळींनी सध्या तयार केलेल्या मानचिन्हावर काही प्रश्न उपस्थित केल्याचे सांगण्यात येते. यामुळेच मानचिन्हावर सहमती झाल्याशिवाय त्याचे अनावरण केले जाणार नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disagree on insignia of india alliance print politics news ssb