दीपक महाले

जळगाव : जिल्ह्यातील भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. यापूर्वी माजी मंत्री एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या रूपाने पक्षांतर्गत कलह जळगावकरांनी अनुभवला होता. त्यानंतर खडसे भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर खडसे-महाजन वादाला चांगलीच धार चढली आहे. आता सहकार क्षेत्रातील शिक्षण संस्थेच्या माध्यमातून भाजपचे खासदार उन्मेष पाटील आणि भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यातील राजकीय मतभेद वारंवार उघड होत आहेत.

अग्रलेख : आहे बहुमत म्हणून…?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
BJP benefits from governments decision workers will become SPOs
सरकारच्या ‘या’ निर्णयाचा भाजपला फायदा, कार्यकर्ते होणार ‘एसपीओ’
congress government analysis Telangana caste Survey
अन्वयार्थ : जनगणना कधी?
controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
घरगड्यांच्या गर्दीत सामील भाजपाई
घरगड्यांच्या गर्दीत सामील भाजपाई
Like Congress BJP in district faces factionalism highlighted during Guardian Minister Ashok Uikes first tour
पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात भाजपमधील गटबाजी उघड
BJP boycotts visit of Buldhana Guardian Minister and Rehabilitation Minister Makarand Patil
बुलढाणा : पालकमंत्र्यांच्या दौऱ्यावर भाजपचा बहिष्कार! युतीत विसंवाद

चाळीसगावसह भडगाव आणि पाचोरा या तीन तालुक्यांत कार्यक्षेत्र तसेच चाळीसगाव तालुक्यातील सर्वांत मोठी शिक्षण संस्था असलेल्या राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक यंदा आरोप- प्रत्यारोपांमुळे चांगलीच गाजली. संस्थेच्या संचालक मंडळाची मुदत २०२० मध्ये संपलेली असताना आधी करोनामुळे, नंतर राज्य सरकारने निवडणुका पुढे ढकलल्याने संस्थेची निवडणूक दोन वेळा पुढे ढकलली गेली. २०१५ च्या निवडणुकीत विजयी ठरलेल्या परिवर्तन आणि आताच्या निवडणुकीत विकास पॅनल म्हणून आखाड्यात उतरलेल्या सत्ताधार्यांना तब्बल सात वर्षे सत्ता मिळाली. या सात वर्षांच्या काळात राष्ट्रीय कन्या विद्यालयाच्या जागेचा प्रश्न तसेच नोकरभरती व त्यांना टीईटी घोटाळ्यात संस्थेच्या काही शिक्षकांची पुढे आलेली नावे, यावर विरोधकांनी चांगलेच ताशेरे ओढले. संस्थेच्या सर्वसाधारण सभाही जागेच्या प्रश्नावर गाजल्या होत्या. यंदाची निवडणूक चाळीसगाव तालुक्यासाठी चांगलीच वादळी ठरली.

हेही वाचा… शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख वादातून कायम चर्चेत

निवडणुकीत विकास पॅनल, नानासाहेब चव्हाण स्मृती पॅनल आणि परिवर्तन पॅनल यांच्यातील लढत चुरशीची झाली. १९ जागांसाठी ५१ उमेदवार निवडणूक आखाड्यात होते. निवडणुकीत भाजपचे खासदार उन्मेष पाटील आणि भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले. भाजपचे हे दोन्ही नेते एकमेकांविरोधात आखाड्यात होते. शिक्षण संस्थेतील भाजपच्या आमदार-खासदारांच्या लढाईत खासदार गटाचा विजय झाला. चव्हाण स्मृती पॅनलकडून भाजप खासदार उन्मेष पाटील, तर विकास पॅनलकडून भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी एकमेकांसमोर शड्डू ठोकला होता. राष्ट्रीय विद्यालयाच्या जागेच्या मुद्द्यावरून आमदार चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली. खासदार पाटील यांचे वडील भय्यासाहेब पाटील हे सर्वसाधारण गटातून रिंगणात होते. यामुळे साहजिकच खासदार पाटील यांनी निवडणुकीची धुरा सांभाळली होती. त्यांनी वैयक्तिक भेटीगाठी घेत चव्हाण स्मृती पॅनलच्या विजयासाठी हाक दिली होती. मतदानाच्या दिवशीही ते दिवसभर मतदान केंद्रात थांबून होते. चव्हाण स्मृती पॅनलने विकास पॅनलचा दारुण पराभव केला. तो आमदार चव्हाण यांना मोठा धक्का मानला जात आहे.

हेही वाचा… शिवसेना पक्षप्रमुखपद वाचविण्यासाठी उद्धव ठाकरे यांची धडपड सुरु

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मंगेश चव्हाण यांच्या पराभवासाठी पक्षाचे खासदार उन्मेष पाटील यांनी षडयंत्र रचल्याचे आरोप झाले होते. दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीवेळीही खासदार पाटील अलिप्त होते. मात्र, राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीत दोघेही एकमेकांसमोर आखाड्यात उतरले. या दरम्यान खासदार पाटील यांची माजी मंत्री सुरेश जैन यांच्याशी भ्रमणध्वनीवर झालेल्या संभाषणाची ध्वनिफीतही समाजमाध्यमात प्रसारित झाली होती. कारण नसताना आमदार चव्हाण आपणास राष्ट्रीय विद्यालयाच्या जागा विक्री प्रकरणात गोवत असल्याचा आरोप खासदार पाटील यांनी केला होता. या स्थानिक पातळीवरील निवडणुकीतून जिल्ह्यातील भाजपमधील अंतर्गत कलह मात्र चव्हाट्यावर आला आहे. भाजपच्या खासदार-आमदारांतील या कलहाबाबत आता भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन हे काय निर्णय घेतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Story img Loader