कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखाचे राजकारण कोल्हापुरात तापले असताना जिल्ह्याच्या पश्चिमेला असलेल्या किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणाला आता राजकीय रंग चढला आहे. किल्ल्यावरील वाढत्या अतिक्रमाबद्दल माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले असताना खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी हा प्रश्न संयमाने सोडवण्याची गरज व्यक्त केली असल्याने या प्रश्नावर छत्रपती घराण्यातली मतभेद असल्याचे पुढे आले आहेत. सहा वर्षे खासदार, रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष असतानाही याविषयावर संभाजीराजे यांनी मौन का बाळगले होते, अशी विचारणा करीत हिंदुत्ववादी संघटनानी त्यांची कोंडी केले आहे.

दुसरा राजा भोज यांनी राजधानी कोल्हापूर पन्हाळ्यावर हलवली. तेव्हा घाट मार्गाचे रक्षण करण्यासाठी ‘किशागिला’ हा किल्ला बांधला. पुढे तो खेळणा म्हणून ओळखला जाऊ लागला. शिवाजी महाराजांनी पन्हाळा जिंकल्यानंतर त्याचे नाव विशाळगड ठेवले. सिद्धी जोहारने पन्हाळ्याला वेढा घातल्यानंतर शिवाजी महाराजांनी रात्रीत कसे विशाळगड गाठले हा पराक्रमाचा इतिहास आहे. याच किल्ल्यावर गणपती, विठ्ठल, भगवंतेश्वर यांची मंदिरे आहेत. रहमान मलिक दर्गा असून कोंबड्या कापण्याची प्रथा आहे. त्याचे व्यावसायिकरण होऊन गडावर अतिक्रमणे, दुर्गंधी, अस्वच्छता वाढत गेली. आजवर प्रशासन हातावर घडी घालून गप्पा बसल्याने आता हा प्रश्न चिघळला आहे.

Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
akola ZP
वंचितची प्रतिष्ठा पणाला लागणार; अकोला जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध, राजकीय पतंगबाजी रंगणार
district administration decision to crack down on extortionists along with making the district industry friendly
उद्योगस्नेही जिल्हा करण्याबरोबरच खंडणीखोरांना चाप लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा ठोस निर्णय
portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
TCS , quarterly results , Infosys, Wipro,
ससा कासवाची गोष्ट : ‘टीसीएस’ला फळले… इन्फोसिस, विप्रोच्या तिमाही निकालांचे काय ?
Fund Jigyaza Wealth Creation Through SIP
फंड जिज्ञासा – ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्ती निर्मिती
बारामतीत कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून नाराजी नाट्य; खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

हे ही वाचा…. तारीख ठरली! प्रशांत किशोर स्थापणार नवा राजकीय पक्ष; दलित-मुस्लिमांना विशेष आवाहन

गडाचे मूळ स्वरूप हरवत चालले असल्याची खंत गडप्रेमींना आहे. त्यातूनच बोकाळलेली अतिक्रमणे हटवावी साठी हिंदुत्ववादी संघटनांनी तीन वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. वनमंत्री सुधीर मनगंटीवार यांच्या समवेत बैठक झाली. मात्र ती बैठक संभाजीराजे यांनी होऊ दिली नाही असा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा आरोप आहे.

दरम्यान हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले आहे. आता परस्पर काही करता येणे शक्य नाही. तरीही जाणत्यांनी त्यावरून राजकीय धुरळा उठवला आहे. विशाळगडावरील अतिक्रमण विरोधात हिंदुत्ववादी संघटनांची या आठवड्यात महाआरती केली. पाठोपाठ संभाजीराजे छत्रपती यांनी शासनावर टीकास्त्र डागले आहे. गेली दीड वर्ष विशाळगड अतिक्रमण बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दीड वर्षात काय केले, अशी विचारणा करून त्यांनी १४ जुलै रोजी गडप्रेमी विशाळगडावर जाणार आहेत. शिवभक्तांना कोणीही थांबवू शकत नाहीत, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री , दोन्ही उपमुख्यमंत्री तोफ डागली असली तरी त्यावर महायुती कडून कसलेच भाष्य केले नाही. याचवेळी हिंदुत्ववादी संघटनांनी संभाजीराजे हे सहा वर्षे राष्ट्रपती नियुक्त खासदार तसेच रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष होते. तेव्हा त्यांनी विशाळगड अतिक्रमण विषयी त्यांनी कधीच आवाज का उठवला नाही. आता ते स्वतंत्र आंदोलन का करत आहेत, असे प्रश्न उपस्थित करून ते हिंदू समाजात दुफळी माजवत असल्याचा आरोप सकल विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील यांनी केला आहे. हिंदू एकता आंदोलन ,हिंदू महासभा, शिवसेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यासह डझनभर हिंदुत्ववादी संघटनांनी विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्याचा इरादा व्यक्त करत असतानाच टीकेचे लक्ष्य संभाजीराजे छत्रपती यांना केले आहे.

हे ही वाचा… उत्तर प्रदेशमधील दलितांची गमावलेली मते पुन्हा मिळवण्यासाठी भाजपाने कशी आखली आहे रणनीती?

हा वाद वाढत असताना खासदार शाहू महाराज यांनी विशाळगडावर अतिक्रमण असेल तर प्रशासन योग्य कारवाई करेल. सर्वांनी एकत्र बसून हा विषय संवादातून, चर्चेतून सोडवला पाहिजे, अशी संयत भूमिका व्यक्त केली आहे. तर संभाजीराजे यांनी मात्र १४ जुलैला विशाळगडावर जाण्याचे आदेश शिवप्रेमींना दिले असल्याने एकाच मुद्द्यावर छत्रपती घराण्यातील मतभेदही पुढे आले आहेत.

विशाळगड प्रश्नाबाबत राज्य शासन ढिलाई करत असल्याचा आरोप करीत नेटकऱ्यांनाही समाज माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीकेचे बाण सोडले आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचे खरे वाघ असाल तर विशाळगडला मुक्ती द्या, विशाळगड टाहो फोडतो आहे, अशा टीकात्मक प्रतिक्रियांचा पाऊस पाडला जात असल्याने हा प्रश्न शासन, प्रशासन कसा हाताळणार याला महत्त्व आले आहे.

Story img Loader