भाजपच्या पहिल्या यादीत गडचिरोलीचे नाव नसल्याने विद्यमान आमदाराच्या गोटात अस्वस्थता?

भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत गडचिरोलीचे नाव नसल्याने भाजपचे विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांच्या गोटात चिंता वाढली आहे.

discomfort for the existing MLA dr devrao holi due to Gadchirolis name not in the BJPs first list
गडचिरोलीची उमेदवारी लांबल्याने विद्यमान आमदार होळी यांच्या गोटात अस्वस्थता वाढली आहे.(संग्रहित छायाचित्र)

गडचिरोली : भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत गडचिरोलीचे नाव नसल्याने भाजपचे विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांच्या गोटात चिंता वाढली आहे. आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असलेले आमदार होळी यांच्या उमेदवारीला पक्षातील पदाधिकारी आणि संघ परिवाराचा विरोध असल्यामुळे या ठिकाणी उमेदवार बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभेत कृष्णा गजबे आणि गडचिरोलीत डॉ. देवराव होळी हे दोन भाजपचे आमदार आहेत. त्यापैकी आरमोरी येथे कृष्णा गजबे यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. मात्र, गडचिरोलीची उमेदवारी लांबल्याने विद्यमान आमदार होळी यांच्या गोटात अस्वस्थता वाढली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिवासी समाजाची नाराजी आणि लोकसभेत पक्षविरोधी कारवाया केल्याच्या तक्रारीमुळे भाजप नेतृत्व होळी यांच्यावर नाराज आहेत. त्यात पक्षातील महत्वाचे पदाधिकारी आणि संघातील नेत्यांनी डॉ. मिलिंद नरोटे यांच्या नावासाठी आग्रह धरला आहे. यामुळे पाहिल्या यादीत गडचिरोलीची जागा राखून ठेवण्यात आल्याची माहिती आहे.

आणखी वाचा-सपाची हुकमी चाल! मविआच्या साथीने MIM व महायुतीला शह? पाच मतदारसंघात लोकसभेची पुनरावृत्ती होणार?

आरमोरीत कृष्णा गजबे वगळता भाजपकडून कुणीही इच्छुक उमेदवार नव्हते. परंतु गडचिरोलीत आमदार होळींसह, डॉ. मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. चंदा कोडवते हे इच्छुक आहेत. उमेदवारी मिळविण्यासाठी सर्वांनीच आपली राजकीय शक्ती पणाला लावली आहे. त्यामुळे येथील उमेदवारीचा पेच अडकला आहे. यादीत नाव नसल्याचे माहिती होताच आमदार होळी आपल्या समर्थकांसह मुंबईला रावना झाले आहे. त्यामुळे गडचिरोलीची उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता राजकीय कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांमध्येही आहे.

आणखी वाचा-मेरिटच्या आधारावर उमेदवारी – बावनकुळे

अहेरी राष्ट्रवादी काँग्रेसकडे?

जिल्ह्यातील अहेरी विधानसभेत देखील भाजपने दावा केला आहे. त्याठिकाणी भाजपचे माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम इच्छुक आहेत. पण महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार तथा मंत्री धर्मरावबाबा यांच्यासाठी अहेरी अजित पवार गटाला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाहिल्या यादीत अहेरीचेही नाव नसल्याने दुसऱ्या यादीकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Discomfort for the existing mla dr devrao holi due to gadchirolis name not in the bjps first list print politics news mrj

First published on: 20-10-2024 at 21:34 IST
Show comments