दिगंबर शिंदे

सांगली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सांगली दौर्‍यामध्ये झालेल्या भाजपच्या जिल्हा सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्या गैरहजेरीत नाराजीचा सूर आळवला गेला. त्यातून भाजपमध्येही सर्व काही अलबेल नसल्याचा संदेश गेला आहे. तरीही पक्षाच्या नेतृत्वाने मतभेद म्हणजे मनभेद नसून समन्वयाने यापुढे कार्यरत राहण्याचा सल्ला देत बैठकीची औपचारिकता पूर्ण केली. दुसर्‍या बाजूला सांगलीत प्रबळ एकसंघ विरोधकही दिसत नाही हेच भाजपचे बलस्थान ठरण्याची शक्यता आहे.

BCCI Vice President Rajeev Shukla statement on Gautam Gambhir Rohit Sharma sports news
गंभीर, रोहितमध्ये मतभेद नाहीत!‘बीसीसीआय’चे उपाध्यक्ष राजीव शुक्लांचे वक्तव्य
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
shetkari kamgar paksh break in alibaug
मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; अलिबागमधील ‘शेकाप’च्या पाटील कुटुंबात फूट
Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत?
committee has been formed under chairmanship of sub-divisional officer of Daryapur to investigate after Kirit Somaiyas allegations
किरिट सोमय्यांच्‍या आरोपानंतर खळबळ… अमरावतीत आता बांगलादेशींच्या…
bjp membership registration campaign target to add 50 lakh new members in maharashtra
भाजप सदस्यनोंदणी ! ‘ हे ‘ आमदार अव्वल तर ‘ हे ‘ पिछाडीवर
dhananjay munde
मुंडेंच्या बंगल्यावर खंडणीसाठी बैठक; भाजप आमदार सुरेश धस यांचा आरोप

सांगली लोकसभा मतदार संंघातील राजकीय स्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि पक्ष ताकदीने कार्यप्रवण करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा सांगली दौरा पक्षाने आयोजित केला होता. या दौर्‍यामध्ये पक्षाच्या जिल्हा पातळीवरील नेत्यांची एक बैठक तर दुसर्‍या व तिसर्‍या फळीतील पदाधिकार्‍यांची स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात आली होती. राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस खासदार पाटील विलंबाने उपस्थित झाले. त्यांच्या अनुपस्थितीत खासदारांबाबत नाराजी पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली. तर त्यांचे आगमन झाल्यानंतर मोदींचे नेतृत्व, आश्‍वासक चेहरा, पक्ष शिस्त या बाबींची चर्चा होउन बैठकीची औपचारिकता पार पाडण्यात आली.

हेही वाचा >>> माजी आमदार आशीष देशमुख यांचे तळ्यात-मळ्यात

मात्र, खासदार पाटील यांच्या समोर या नाराजीचा फारसा उहापोह झाला नसल्याचे सांगण्यात येत असले तरी नाराजी लपूनही राहिलेली नाही. जिल्ह्यातील वाळवा, शिराळा हे दोन विधानसभा मतदार संघ हातकणंगले लोकसभा मतदार संघामध्ये येतात. याठिकाणी शिराळ्यात एक जिनसीपणा करण्यात पक्षाला सध्या तरी यश आले असले तरी इस्लामपूरमध्ये बाजार समितीच्या माध्यमातून एकसंघ भाजप असल्याचे दर्शविण्याचे प्रयत्न पक्षिय पातळीवर दिसत आहेत. मात्र, मैदानात एकमेकांमध्ये अविश्‍वासाचे वातावरण आजही कायम आहे. सांगली मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघात व्यासपीठावर एकत्र असलेल्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांची तोंडे चार दिशांना आहेत. यातून कधी काँग्र्रेसशी तर कधी राष्ट्रवादीशी, तर कधी शिवसेनेशी मैत्री आणि पंगा घेतला जात असल्याचे सुरू असलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीवरून दिसून येते. या पार्श्‍वभूमीवर केंद्रिय मंत्री राणे यांचा झालेला सांगली दौरा पक्षांतर्गत दुही दूर करण्यात फारसा यशस्वी झाला असे म्हणता येणार नाही. या मतभेदाचे दुखणे दूर करण्यासाठी राज्यातील वरिष्ठ नेत्यांनीच एखादी शस्त्रक्रिया करण्याची गरज या निमित्ताने अधोरेखित होते.

हेही वाचा >>> नगरमध्ये बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये विखे-पाटील आणि थोरात आमनेसामने

देशाच्या विकासाला गती देण्याचे काम मोदी करीत असून त्याला पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून साथ देण्याची गरज असल्याचे राणे यांनी आवाहन केले आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका आणि नगरपालिका व नगरपंचायती यांच्या निवडणुका होणार आहेत. यापैकी जिल्हा परिषद व नगरपालिकांची मुदत संपून एक वर्षाहून अधिक काळ झालेला आहे. तर महापालिकेची मुदतही येत्या दोन महिन्यात संपणार आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्येही एकप्रकारची अस्वस्थता आहे. कार्यकर्त्यांना उमेदवारीचे आमिष दाखवून फार काळ बांधून ठेवता येणार नाही याची जाणीवही नेतृत्वाने ठेवायला हवी, तरच लोकसभेच्या मैदानासाठी नव्या उमेदीची कार्यकर्ते उपयुक्त ठरतील, अन्यथा पक्षाला जसा पक्षांतूनच धोका असल्याचे चित्र निर्माण होत आहे ते सत्यात उतरण्यास वेळ लागणार नाही.

Story img Loader