ठाणे : शिवसेना एकसंघ असताना ठाणे जिल्ह्यातील राजकीय समिकरणांची नव्याने मांडणी करत क्रमांक एकचा पक्ष बनू पहाणाऱ्या भाजपला अंतर्गत कुरबुरी, मतभेद आणि टोकाच्या स्पर्धेतून निर्माण होणाऱ्या विसंवादाने ग्रासल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात येत्या काळातही पक्षाचा दबदबा कायम ठेवण्याचे मोठे आव्हान या पक्षातील चाणक्यांना पेलावे लागणार आहे. नवी मुंबईत गणेश नाईक-मंदा म्हात्रे, मीरा-भाईदरमध्ये गीता जैन-नरेंद्र मेहता, मुरबाड-ग्रामीण पट्ट्यात किसन कथोरे-कपील पाटील, उल्हासनगरात कलानी कुटुंबियांशी जवळीकीतून निर्माण झालेल्या अस्वस्थतेमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या पक्षातच होऊ घातलेले पाडापाडीचे उद्योग निस्तरण्याची वेळ आतापासूनच नेत्यांवर आली आहे. विशेष म्हणजे, या टोकाच्या मतभेदांमुळे उद्धव ठाकरे तसेच शरद पवारांच्या पक्षांना आयते उमेदवार सापडू नयेत याची दक्षताही आता पक्षाला घ्यावी लागणार आहे.

नरेंद्र मोदी यांच्या २०१४ मधील मोठ्या विजयानंतर ठाणे जिल्ह्यातील राजकीय समिकरण देखील वेगाने बदलत गेले. एकेकाळी हा जिल्हा एकसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असे. ठाणे शहरासारखी प्रतिष्ठेची जागा भाजपने तेव्हाच्या शिवसेनेकडून हिसकावून घेतली. कल्याण डोंबिवली पट्ट्यातही मोक्याच्या जागांवर शिवसेनेला पराभवाचे तोंड पहावे लागले. पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप हे दोन्ही पक्ष एकत्र लढले. मात्र १८ जागांच्या गणितात सर्वाधिक आठ जागांवर भाजपला विजय मिळाला. ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ हा एकसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात. या दोन्ही मतदारसंघातील १२ पैकी सहा जागांवर भाजपचे तर अवघ्या तीन जागांवर शिवसेनेचे आमदार निवडून आले. मीरा-भाईदरमध्ये गीता जैन, कल्याण ग्रामीणमध्ये राजू पाटील, कळवा-मुंब्रा मतदारसंघात जीतेंद्र आव्हाड हे आमदार विजयी झाले. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कपील पाटील, किसन कथोरे, महेश चौगुले, दौलत दरोडा या खासदार-आमदारांचा दबदबा पाहायला मिळाला.

MVA allegation is that money is being distributed to the police by BJP Pune news
भाजपकडून पाेलीस बंदाेबस्तात पैशांचे वाटप? ‘मविआ’चा आरोप, महायुतीचेही प्रत्युत्तर..
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Arjuni Morgaon Constituency , Ajit Pawar, Manohar Chandrikapure,
विदर्भात अजित पवारांची भाजपकडून कोंडी
Bhosari Constituency, Mahesh Landge, Ajit Gavhane,
भोसरीत दुरंगी; पण तुल्यबळ लढत
Kothrud Assembly Constituency Assembly Election 2024 Division of Hindutva votes between BJP Shiv Sena Thackeray and MNS Pune news
‘सुरक्षित’ असूनही भाजपची कसोटी
tempo hit on Satara road, Woman died Satara road,
सातारा रस्त्यावर टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू, दाम्पत्य जखमी; अपघातानंतर टेम्पोचालक पसार
BJP counter meeting outside the Jammu and Kashmir Legislative Assembly
जम्मू-काश्मीर विधानसभेबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; मार्शलच्या सहाय्याने सभागृहाबाहेर काढल्यानंतर पाऊल

हेही वाचा – दोन आठवड्यांत उत्तर सादर करा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

सुपीक जमिनीला मनभेदांचे ग्रहण

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील भाजपचे एकमेव खासदार कपील पाटील यांचा पराभव झाला. सलग दहा वर्षे मिळालेली सत्ता कपील पाटील यांच्या पचनी पडली नाही आणि मतदारसंघात त्यांनी स्वत:च्या स्वभावामुळे गल्लोगल्ली विरोधक तयार केले. त्याचा फटका पाटील यांच्यासह भाजपलाही बसला. या मतदारसंघात कपील पाटील आणि मुरबाडचे प्रभावी आमदार किसन कथोरे यांच्यातील वादाची चर्चा अजूनही सुरु आहे. पक्षाने संमती दिली तर मुरबाडमधून मी लढण्यास तयार आहे असा आवाज नुकताच पाटील यांनी विद्यमान आमदार किसन कथोरे यांना दिला. कथोरे यांची मुरबाडमध्ये मोठी ताकद आहे. असे असताना कथोरे यांनी मुरबाड मतदारसंघातून अपेक्षित मताधिक्य आपणास मिळू दिले नाही अशी जाहीर भूमीका कपील पाटील घेताना दिसत आहेत. या दोन नेत्यांमधील वाद इतका विकोपाला गेला आहे की येत्या निवडणुकीत एकमेकांना धडा शिकविण्याची जाहीर भाषा दोन्ही बाजूंनी सुरु झाली आहे.

वाद कोणकोणत्या मतदारसंघात ?

लोकसभा निवडणुकांच्या पूर्वीपासून ठाणे जिल्ह्यातील विविध मतदारसंघात भाजपामध्ये अंतर्गत वादाच्या ठिणग्या उडताना दिसत होत्या. भिवंडी लोकसभा मतदारसंघात त्याचा फटका भाजपला बसलाच. विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच मुरबाडचे लोण जिल्ह्यातील इतर मतदारसंघातही पसरल्याचे चित्र आता दिसू लागले आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही नवी मुंबईच्या राजकारणात दुय्यम भूमीका घ्यावी लागलेले गणेश नाईक कुटुंबीय लोकसभेचे निकाल लागताच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहेत. नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांच्याविरोधात नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी शड्डू ठोकल्याचे गेल्या काही दिवसांपासून पहायला मिळत आहे. काहीही झाले तरी बेलापूरमधूनच निवडणूक लढविणार अशी भूमिका संदीप यांनी घेतली असून मंदा म्हात्रे यांच्या मुळ गावालगतच कार्यालय थाटत बैठकांचा सपाटा त्यांनी लावला आहे.

हेही वाचा – “राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरची युती भोवली”; संघाच्या ‘विवेक’ साप्ताहिकाने भाजपाला विचारले बोचरे प्रश्न

भाईदरमध्ये उमेदवारीवरुन संघर्ष ?

मिरा भाईंदार विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार गीता जैन यांच्यासमोर भाजपचे पराभूत नरेंद्र मेहता यांचे आव्हान आहे. २०१९ विधानसभा निवडणुकीत मेहता यांना उमेदवार मिळाल्यानंतर गीता जैन यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि जिंकलीही. त्यानंतर त्यांनी आधी भाजपला आणि राजकीय दिशा बदलताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. जैन या विद्यमान आमदार असल्याने ही जागा शिंदेसेनेने मागितली आहे. यामुळे हक्काच्या मतदारसंघातच भाजपची कोंडी झाली आहे. ठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय केळकर यांच्यासमोर विरोधी पक्षापेक्षा अंतर्गत स्पर्धकांचे आव्हान अधिक दिसत आहे. केळकर यांची राजकीय कार्यपद्धती मान्य नसलेला एक मोठा वर्ग ठाण्यातील नव्या भाजपमध्ये तयार झाला आहे. त्यामुळे केळकर नको अशी कुजबूज येथेही सुरु असली तरी त्यांना डावलणे पक्षश्रेष्ठींना सोपे नाही.

रविंद्र चव्हाण निष्प्रभ ?

ठाणे जिल्ह्यात रविंद्र चव्हाण हे भाजपचे एकमेव मंत्री आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात पक्षाला बळ देण्याचे मोठी जबाबदारी चव्हाण यांच्या खांद्यावर आहे. असे असले तरी चव्हाण ठाण्यापेक्षा कोकणात आणि आता पालघरात अधिक असतात अशा पक्षात तक्रारी आहेत. लोकसभा निवडणुकीत पालघर मतदारसंघात त्यांनी दाखविलेल्या ‘दातृत्वा‘ची चर्चा अजूनही सुरु असली तरी ठाणे जिल्ह्यातील मतभेद मिटविण्यात चव्हाण पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र आहे. उल्हासनगरात चव्हाण आणि पप्पू कलानी कुटुंबियांची जवळीक स्थानिक आमदार कुमार आयलानी यांच्या गटाला अस्वस्थ करु पहात आहे. मीरा-भाईदरमध्ये चव्हाण नरेंद्र मेहता यांच्या समवेत असल्याने गीता जैन यांनी शिंदेसेनेला आपलेसे म्हटले आहे. ठाणे शहरात संजय वाघुले यांना अध्यक्ष करण्यात चव्हाण यांचा वाटा असला तरी जुन्या नव्या संघटनेची मोट बांधण्याऐवजी पक्षात मतभेद वाढू लागल्याची कुजबूज सुरु झाली आहे. ठाण्याच्या ग्रामीण भागात कपील पाटील आणि चव्हाण यांचे जमत नसल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान चव्हाण भिवंडीत अपवादानेच फिरकले.