नागपूर : नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवन परिसरातील कार्यालयासाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात जुंपली. जुने कार्यालय एकनाथ शिंदे गटाला मिळाल्यावर उद्धव ठाकरे गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे असलेले दुसरे कार्यालय देण्यात आले. दरम्यान, मूळ शिवसेनेच्या व नंतर शिंदे गटाला मिळालेल्या कार्यालयातून जुन्या कर्मचाऱ्यांनाही बाहेर काढल्यावर या कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा… ‘लढण्यासाठी रणांगणात उतरलो’

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवन परिसरात सुरुवातीला शिवसेनेच्या एकाच कार्यालयात उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाचे कार्यालय असल्याचे दृश्य दिसत होते. यावेळी एका खोलीत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेसह उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचेही चित्र लागले होते. दरम्यान, दुपारी जुने कार्यालय एकनाथ शिंदे गटाला मिळाले, तर उद्धव ठाकरे गटाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागील भागातील दुसरे कार्यालय देण्यात आले. या कार्यालयातील जुने कर्मचारी दरवर्षीप्रमाणे जुन्या कार्यालयात आपले काम करत होते. नेहमीप्रमाणे यंदाही हे कर्मचारी शिवसेनेच्या कार्यालयात काम करीत होते. मात्र या कार्यालयावर शिंदे गटाने ताबा घेतला व या कर्मचाऱ्यांनाही कार्यालयातून बाहेर काढले.

हेही वाचा… अग्रलेख : ‘संघटना’ राहिल्याची शिक्षा!

त्यात दोन महिला व चार पुरुष कर्मचाऱ्यांचा समावेश होता. शेवटी हे कर्मचारी उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या कार्यालयात आले. येथे आमदार रवींद्र वायकर यांची भेट घेतली. यावेळी कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. त्यांनी या कर्मचाऱ्यांचे सांत्वन केले. नंतर पत्रकारांशी बोलताना रवींद्र वायकर म्हणाले, गेल्या तीस वर्षांपासून या कर्मचाऱ्यांनी एकनाथ शिंदेसह सर्व सेना आमदारांची सर्व कामे केली. आता शिंदे यांनी वेगळी चूल मांडल्यावर त्यांना रडवून बाहेर काढणे कुणालाही शोभणारे नाही. ही मानवी वृत्ती नाही, असे वायकर म्हणाले. यावेळी त्यांनी सहाही कर्मचाऱ्यांच्या जेवणाची सोय ठाकरे गटाला मिळालेल्या नवीन कार्यालयात करण्याची सूचना केली. यादरम्यान एकनाथ शिंदे गट कार्यालयात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे छायाचित्र काढून तेथे आनंद दिघे यांचे छायाचित्र लावण्यात आले.