बिपीन देशपांडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सहकारमंत्री अतुल सावे यांच्या वाढदिवसामुळे विद्यार्थ्यांसाठी टॅबचे वितरण पुढे ढकलले या ‘लोकसत्ता’च्या बातमीचा मंत्र्यानी इन्कार केला आहे. महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या अर्थात महाज्योतीमधील विद्यार्थ्यांना द्यावयाच्या टॅबचे वितरण रोखण्याचे आरोप फेटाळले आहेत. ‘मी काही एवढा छोटा माणूस आहे का वाढदिवसासाठी टॅब वाटेन. वाटलीच तर गाडी देईन. रुग्णवाहिका देईन. टॅबची तांत्रिक तपासणी बाकी होते. आता टँब आले आहेत. त्याचे वितरण होईल.’असा दावाही सावे यांनी केला.

हेही वाचा >>>काँग्रेस कार्यकारिणी समितीची निवडणूक होणार नाही; रायपूरमधील अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निर्णय

टॅब ही वैयक्तिक लाभाची योजना असून आचारसंहिता आणि मॅक क्रमांकामुळे टॅबचे वितरण मध्यंतरी थांबले होते. सुरुवातीला पाच हजार टॅब होते, आतापर्यंत आठ हजार टॅब वाटप झाले आहे. अमरावती आणि यवतमाळमध्ये वाटप झाले. समाजकल्याण विभागच्या वतीने टँब वाटप होणार असून वाढदिवसादिवशी कार्यक्रम घडवून आणण्यासाठी हे सारे सुरू असल्याचा आरोप महाज्योतीचे माजी संचालक प्रा. दिवाकर गमे यांनी केला हाेता. त्यावर विचारले असता काहीसे चिडून टॅबसाठी असे काही करणार नाही. मी छोटा माणूस नाही, असे सहकार मंत्री सावे यांनी म्हटले आहे. महाज्योतीकडून १८ महिन्यांचे ऑनलाईन प्रशिक्षण मोफत दिले जाते. महाविकास आघाडीच्या काळात टॅबसाठी ८२४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. टॅब वितरमाबबात ‘लोकसत्ता’मध्ये या अनुषंगाने आलेल्या वृत्तानंतर भाजपच्या गोटात अस्वस्थता होती.

हेही वाचा >>>कसबा पेठ आणि चिंचवडमध्ये काय होणार?

इतर मागासवर्गीय मंत्रालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध निर्णयांमुळे स्पर्धा परीक्षा व परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा लाभ होत असून गेल्या आठ महिन्यांत बहुजन कल्याण मंत्रालयास दीड हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहितीही सावे यांनी दिली.‘ओबीसी’ श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतिगृहं बांधली जाणार असून परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती आता १० वरून १०० विद्यार्थ्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे. व्यावसायिक वैमानिक तयार करण्याचे प्रशिक्षणही २० विद्यार्थ्यांना देण्याचे नियोजन असून हवाईसुंदरीचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. यासाठी राज्य सरकारने ९०० कोटी रुपयांचा निधी वाढवून दिला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या ९०० विद्यार्थ्यांना दिल्ली येथे तर ६०० विद्यार्थ्यांना पुणे येथे शिक्षणासाठी मदत केली जात असून त्यासाठी ६०० कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने दिला आहे. वसतिगृहांसाठी सात जिल्ह्यांत जागा उपलब्ध झाल्या असून उर्वरित जिल्ह्यात वसतिगृहे बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना महसूलमंत्र्यांनी दिल्या आहेत. विविध कार्यकारी सोसायट्यांचे पुनरुज्जीवन करून त्यांना २०० प्रकारचे व्यवसाय करता येतील, असेही आदेश राज्य सरकारने काढले आहेत. त्यामुळे बहुजन कल्याणाच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे, हा आरोपच मुळात चुकीचा असल्याचे सावे म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Distribution of tabs to students on the occasion of cooperation minister atul save birthday print politics news amy