गुरूवारी लोकसभेची कार्यपद्धती आणि कामकाजासंदर्भातील नियम ३४९चा वापर करत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज तहकूब केले. यावर विरोधी पक्षाने आक्षेप घेत सदस्यांच्या पोशाखाबाबत कोणत्याही नियमांचा उल्लेख नसल्याचे अध्यक्षांना सांगितले. यापूर्वी काँग्रेस खासदारांनी संसदेत ‘मोदी अदानी एक’ असा मजकूर लिहिलेली काळी जॅकेट्स परिधान केलं होतं याचीही आठवण करून दिली.

गदारोळाचा मुद्दा काय?
गुरूवारी तामिळनाडूमधील डीएमकेच्या सदस्यांनी एक विशिष्ट संदेश लिहिलेली टी-शर्ट्स परिधान करत संसदेत प्रवेश केला. मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून या सदस्यांनी निषेध व्यक्त करण्यासाठी ही टी-शर्ट्स परिधान केली होती. यावरून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज स्थगित केले. अध्यक्षांच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत लोकसभेतील काँग्रेसचे व्हीप माणिकम टागोर यांनी म्हटले की, “या सरकारला सभागृह चालवायचे नाही. त्यांना काँग्रेस आणि विरोधक पंजाब शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करतील याची भीती वाटत आहे. या प्रश्नावरून पंजाब काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी आणि अमरिंदर सिंग यांनी सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी केली आहे. हे ज्वलंत प्रश्न टाळण्यासाठीच ड्रेस कोड हा नवा मुद्दा सभागृहात उपस्थित करण्यात आला आहे”.

नियम ३४९ काय आहे?

खासदारांचे वर्तन आणि सभागृहाचे कामकाज यासाठी विशिष्ट नियमावली आहे.नियम ३४९ सभागृहातील सदस्यांनी पाळावेत यासाठी आहेत.

काय सांगतो नियम ३४९?
नियम ३४९ हा २३ उपनियमांमध्ये विभागला गेला आहे. सभा सुरू असताना कोणत्याही सदस्याने सभागृहाच्या कामकाजाव्यतिरिक्त कुठलेही पुस्तक, वर्तमानपत्र किंवा पत्र वाचू नये. किंवा कोणताही सदस्य बोलत असताना त्यात इतरांनी व्यत्यय आणू नये.

सभागृहात प्रवेश करताना किंवा बाहेर पडताना खासदारांनी अध्यक्षांना अभिवादन करावे. अध्यक्ष बोलत असताना सदस्यांनी त्यात अडथळा आणू नये. अध्यक्ष बोलत असताना सदस्यांनी सभागृह सोडू नये आणि अध्यक्षांच्या आगमनापासून ते, अध्यक्ष जाईपर्यंत सभागृहात शांतता राखावी.

कोणत्याही कामकाजात खुसपूस करून किंवा व्यत्यय आणू नये. खासदारांनी दुसरे सदस्य बोलत असताना त्यावर कोणतेही वक्तव्य करू नये.

खासदारांनी सभागृहात कोणत्याही प्रकारचे प्रदर्शनाचे फलक लावू नयेत किंवा संसदेच्या आवारात कामकाजाशी संबंधित नसतील असे कोणतेही साहित्य, प्रश्नावली, पत्रकं, प्रसिद्धी पत्रकं वितरित करू नये.
निषेध व्यक्त करण्यासाठी कागदपत्रे फाडणे, रेकॉर्डर आणणे किंवा वाजवणे यावरही प्रतिबंध आहे. सभागृहात मोठ्या आवाजात बोलणे किंवा हसणे टाळावे.

याआधी हा नियम लागू केलेला आहे का?
२०२४मध्ये, संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ सुरू झाला त्यावेळेस त्यांनी लोकसभाध्यक्षांना हा नियम लक्षात आणून दिला. कोणत्याही खासदाराचे भाषण सुरू असताना सदस्यांनी हावभावातून किंवा आवाजातून व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करू नये.

काही महिन्यानंतर, राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष भारताची अर्थव्यवस्था ढासळण्यात आणि लोकशाहीत व्यत्यय आणण्याचे सहभागी असल्याचा आरोप भाजपाने हिवाळी अधिवेशनात केला होता.

काँग्रेस खासदार इंडिया आघाडीमधील पक्षांच्या नेत्यांसह ‘मोदी अदानी एक है’, ‘अदानी सेफ है’ असा मजकूर लिहिलेले काळे जॅकेट परिधान करून संसदेत आले होते. यावरून भाजपाने इंडिया आघाडी पक्षांवर आगळावेगळा निषेध असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे व्हीप यांनी या निषेधामुळे संपूर्ण भाजपा आणि सरकारी यंत्रणा बेकायदेशीर आरोप करत असल्याचा दावा केला.

दरम्यान, या सगळ्यावर ओम बिर्ला यांनी टीका करत नियम ३४९ च्या आधारे खासदारांना तिरंग्याव्यतिरिक्त कोणतेही लेपल पिन किंवा फलक आणू नये असे आवाहन केले.

Story img Loader